फ्रेंड्स विथ बेनेफिटस् CHAPTER -8

6.9K 12 6
                                    

रविवारची सकाळ उजाडली. केतकी "पॅराडाईस टॉवर" च्या गेट पाशी पोचली. सकाळीच नेहा ने तिच्या मोबाईल वर ऍड्रेस पाठवला होता. काळ्या रंगाच्या ऍक्टिव्हा वर एक सुंदर स्त्री पाहून गेट चा वाचमन धावत धावत पुढे आला. केतकी ने आपला चेहरा स्टोल ने पूर्णपणे झाकुन डोळ्यावर गॉगल चढवला होता. वाचमनने गेट चे दार उघडून तो तिला काही विचारनार तिच केतकी ऍक्टिव्हा सरळ पार्किंग लॉट मध्ये घेऊन गेली. वाचमन तिला अडवू शकला नाही. तिच्या परफ्युम च्या सुगंधाने तो मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे बघत स्तब्ध उभा होता. ऍक्टिव्हा पार्किंग मध्ये लावत ती लिफ्ट कडे वळली. बाराव्या मजल्यावर ती रूम नंबर १२०८ च्या समोर उभी राहून पुढे काय होणार याचा विचार करत तिचे पाय लटपटत होते. थरथरत्या हाताने दाराची बेल वाजवली. नेहाने दरवाजा उघडताच केतकीकडे पाहून तिचे डोळे लुकलुकले. तिला हॉस्टेल मधली साडी डे च्या दिवशी तैयार झालेली कोमल लुसलुशीत केतकी आठवली. केतकी ने काळ्या रंगाची चीफन साडी आणि त्यावर लाल बॉर्डर असलेला मॅचिंग ब्लाउज घातला होता. मागे ब्लाउज ची जाड शी पट्टी हुकाने जोडली गेली होती. तिचा पाठीचा मधला भाग बराचसा उघडा आणि कामुक प्रेरक होता. एखाद्या कामातूर शिल्पकाराने आपल्या कल्पनेतुन एक मादक स्त्रीचे शिल्प बनवावे तशी केतकी भासत होती.

केतकी :"आता अशीच बघत राहणार आहेस की आतमध्ये पण बोलवणार आहेस. केतकी ने तिला न्याहळणाऱ्या नेहा ला चुटकी मारत म्हटले.

नेहा: "ओह ..अग ..येना ..प्लिज कम ..नेहा ने तिचा मार्ग मोकळा करत दरवाजा लावून घेतला. केतकी आत हॉल मध्ये मध्यभागी असणाऱ्या सोफ्यावर बसली. नेहा ने टेबलावर ठेवलेल्या मगातुन ग्लासत पाणी ओतून तिच्या पुढ्यात ठेवले. आणि उजव्या बाजूच्या खुची वर जाऊन बसली.

केतकी: घर छान आहे ग..मस्त सजवलंयस..पाण्याचा घोट घेत चारीबाजूने तिची घरामध्ये नजर फिरली.

नेहा: छे.. ग ..मला कुठं आहे एवढ डोकं ...मंदारची चॉईस आहे सर्व ....तुला ऍड्रेस शोधायला काय त्रास नाही झाला ना.

फ्रेंड्स विथ बेनेफिटस्Opowieści tętniące życiem. Odkryj je teraz