सलज्ज निर्लज्जता - Part 1

25.1K 34 7
                                    


" चारू.. काल त्या वऱ्हाडेंचा कॉल आला होता." सकाळी घाईची वेळ असून पण मी वऱ्हाडेंचे नाव घेतल्यावर चारू थोडी सावध झालीच. मी चहा घेत होतो.

"ह्म्म्म... काय म्हणत होते." तिचा स्वतःचा डबा भरत ती म्हणाली.

२-३ दिवस कोकणात जाऊयात का फॅमिली ट्रिप करायला असे विचारत होते."

"मग तू काय म्हणालास?" तिने विचारले.

"हरकत नाही बोललो. एकदा आपल्या सगळ्यांची सवड निघू देत जाऊ म्हणालो." मी तिला सांगितले.

"ह्म्म्म... ठीके असे पण खूप दिवस झाले आउटिंग नाही झाले. जाऊन येऊ कुठे तरी. मी पण संगीताशी बोलते आज भेटली की?" चारू मला बोलली.

"चला म्हणजे बनला प्लॅन. वऱ्हाडे असे पण बऱ्याच वेळा मला विचारत होते." मी म्हणालो.

"हा तुझी कंपनी आवडते त्यांना. संगीता म्हणत होती. तू डॅशिंग आहेस आणि उत्साही पण असे त्या दोघा नवरा बायकोचे तुझ्या बाबतीत मत आहे." चारू मला म्हणाली.

"कोकणात माझ्या डॅशिंग पणा आणि उत्साहाचे काय करणारे? खरे कारण तर तू आहेस. वऱ्हाडे तुझ्या आजूबाजूला राहायची एकही संधी सोडत नाही. मला कळत नाही असे वाटते का तुला?" मी बोललॊ आणि चहाचा सिप मारून चारुच्या प्रतिक्रियेची वाट पहात थांबलो.

चारुला एखादे उत्तर पटकन सुचत नसेल तर ती गालात मंद हसत माझ्याकडे जसे पाहायची आत्ताही तिने तसेच पहिले.

"किशॊर आज सकाळच काय शिरलंय तुझ्यात?" ती चहाचा कप घेऊन माझ्याकडे आली आणि शेजारी बसली. तिच्या शाम्पूने स्वच्छ धुतलेल्या केसांमधून सुगंध येत होता. बसल्याबसल्या तिने पायावर पाय ठेवत तिच्या नेहमीच्या शैलीत पोज घेतली. मला माझ्या सुंदर बायकोचे नेहमीच कौतुक वाटत आले होते. तिची सुंदरता नुसती तिच्या शरीरात किंवा चेहऱ्यात नव्हती तर ती तिच्या वागण्यात बोलण्यात वावरण्यात सगळ्यातुनच दिसायची.

"काही नाही. सत्यशोधक आत्मा आहे माझी. मी कधी खोटे नाही बोलत." मी म्हणालो.

सलज्ज निर्लज्जताDonde viven las historias. Descúbrelo ahora