ब्लॅक इन गोवा भाग- १

11.1K 30 7
                                    

एके काळी सायकलीचे शहर म्हणून ओळखणारे पुणे शहर हे अत्यंत बेशिस्त वाहतूक असणारे शहर म्हणून सध्या ओळखले जात आहे. त्यामध्ये सिग्नलला लागणाऱ्या वाहनाच्या लांबच्या लांब रांगा!! क्रिकेटच्या फलकावर दिसणारे तिन अंकी आकडे ट्रॅफिक सिग्नलवर दिसत होते. उतारत्या क्रमाने सेकंद सेकंदाला खाली येत होते.

" ३६७.....३६६.... ३६५.... ३६४.....३६३ " नाही हो ..हा क्रिकेटचा स्कोर नाही. हे तर आहे चक्क ट्राफिकचे सिंग्नलचे काउंटडाऊन.

चुकन जर ही वेळ शाळा- ऑफिसात पोहचायची असती ना, तर तुम्हा आम्हा कोणालाच साधी कल्पनाही नाही करता येणार एवढा मोठा प्रचंड गदारोऴ त्या चौकात झाला असता.

'३५७.....३५६....३५५.....३५४.....३५३...' इतके केविलवाणे आकडे बघुन गाड्याही जांभया देत बसल्या होत्या. एव्हाना गारेगार झालेल्या आलिशान ऑडी मध्ये ड्राइवर निवान्तपणे पेपर वाचत बसला होता. फटफटी, होंडा, करीझ्मा, पलसर, टूरटूरी, पिरपिरी, कीरकीरी सगळ्या सगळ्या गाड्या चक्क स्टॅन्ड लावुन रस्त्यावर दिवस कठंत बसल्या होत्या.

'३४३...३४२....३४१....३४०....३३९..' एरवी सिंग्नलच काय सिग्नलचा खांबही तोडून जाण्यात सरावलेल्या या गाड्या आज मात्र पेट्रोल गिळूनही गप्प बसल्या होत्या. खरं तर रस्त्यावर म्हणावी तितकी गर्दी नव्हतीच मुळी, पण तरीही स्वतः घामाने अंघोळ करीत आपल्या लाडक्या गाड्यांना भाजक्या उन्हात कडकडीत वाळवण्यापलीकडे एकाही वाहनचालकाला पर्याय नव्हता.

'३३५...३३४....३३३....३३२ .....३३१' इतक्या रटाळ रस्त्यावर बहुदा सिग्नलच तेवढा कार्यरत होता.

पण असं नेमक का झालं होतं बरं??

एक रस्ता कात्रजकडे घेऊन जाणारा चौक होता. चौकातल्या तिन्ही रस्त्यावर वाहनं खोळंबली होती. कारण सफेद कपडे घातलेल्या एका प्रचंड मोठ्या जमावाचा कसलासा मुक मोर्चा ऐन चौकात येऊन थडकला होता. अत्यंत शांतपणे आणि धीमी पावले टाकत मोर्चा मंद गतीने पुढे सरकत होता. ना कसल्या घोषणा ना निषेध!! त्यामुळे बघ्यांच्या नजरांना किंचितही विरंगुळा उरला नव्हता. उलट सारा वाहता चौकच पेंगुळला होता.

ब्लॅक इन गोवा Where stories live. Discover now