ब्लॅक इन गोवा भाग- ९

5.7K 29 13
                                    

"केतु, काय पण म्हण, जेम्सचा दांडा सॉलिड होता यार" लॉक अप मध्ये भिंतीला पाठ टेकवत नेहा म्हणाली.

"ये बाई, त्या दांड्यामुळेच आता पोलीसांचे दांडके खायाची आपल्यावर पाळी आली आहे." केतकी जरा चिडूनच म्हणाली.

"हो यार, नशीबच गांडू आहे आपलं. पहिले त्या सौऱ्याने आपल्याला गंडवल, नंतर तो ट्रक ड्राइवर त्या माणसाला उडवून गेला आणि नाव आपल्यावर आलं. आता तर काय आपण ड्रुग्स डीलर सुद्धा झालोय."

आदल्या दिवशीच्या रात्रीचा उजाळा देत केतकी आणि नेहा आपल्या नशिबाला दोष देत बसल्या होत्या. दोघीनी मजा तर मारली होती. पण त्याचा आपल्याला एवढा भुदंड भोगायला लागेल हे त्याला माहिती नव्हते. नेहाला मात्र हळूहळू सर्व घटनाक्रम लक्षात आले होते. तेवढ्यात तिला काहीतरी आठवले.

"आयला केतू, तुला बोलले होते ना त्या हॉटेलच्या मालकीण बाई ला मी कुठे तरी पाहिलंय म्ह्णून" नेहा केतकीला उद्देशून म्हणाली.

"अगं त्याने इथे काय फरक पडणार आहे. ती गोव्यातली नामी व्यक्ती असणार, हॉटेल मध्येच पाहिली असशील तिला तू" केतकीला सुटण्याचा काहीच मार्ग दिसत नव्हता. आपण पुरते फसलो आहोत तिला कळून चुकले होते.

"अगं हा आपल्या विरुद्ध रचलेला प्लॅन आहे, तुला कळत कस नाही" नेहा तिला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होती.

"तुला नक्की काय म्हणायचय नीट सांग मला" केतकी सुद्धा नेहाचे बोलणे ऐकण्यास आतुर झाली.

"काल रात्री मी आणि जेम्स हॉटेल आलो वर तेव्हा ती बाई रिस्पनीस्ट काउंटर ला होती. तिनेच आम्हाला जेम्सच्या रूमची चावी दिली. नेहा हळू आवाजात केतकी बरोबर बोलत होती.

"काही काय, मालकीण रिसेप्नीस्ट काउंटर ला कशी असेल, दुसरं कोणी तरी असेल, काल रात्री तुला शुद्ध तरी होती का" केतकीला नेहाच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. कारण नेहा कालचा अवतार असा होता की तिच्या बघण्यात काही तरी चुकी झाली असेल असे तिला वाटले.

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Nov 16, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

ब्लॅक इन गोवा Where stories live. Discover now