ब्लॅक इन गोवा भाग- २

4.8K 15 6
                                    

गाडीचा वेग आता ऐंशीच्या सुमारास होता. सूर्य ही जरासा पश्चिमेकडे कलला होता. आतापर्यंत ऊबदार वाटणारा वारा हळूहळू गरम झळा देऊ लागला होता. नेहा तुफान वेगाने गाडी चालवत होती. तिच्या पोटात मात्र कावळे ओरडत होते. कमरेभोवती केतकीच्या हातांचा विळखा जरासा सैल झाल्यासारखा तिला जाणवला. तिच्या खांद्यावर डोकं टेकवून भुर्रर्र वाऱ्यासोबत केतकी मात्र डुलक्या घेत होती.

"च्यायला, २०-२० किमी कापलं तरी साधी टेकायला मोकळी जागा नाही. फिर हॉटेल किस झाड की पत्ती..सॉरी.. किस जमिन की मिट्टी!! वैतागून नेहा स्वतःशीच म्हणाली.

"जरा हळू बोल ना, तुझ्या पाठीवर कान लावल्याने मला सगळं लाऊडस्पीकरमधून ऐकल्यासारखं वाटतंय" जरा ही डोळा न उघडता केतकीने तक्रार केली.

जिकडे पाहावं तिकडे झाडीच झाडी. जीवघेण्या कडक उन्हाचा जरासाही परिणाम हिरव्या गर्द ताग्यावर झाला नव्हता. झाडी इतकी घनदाट होती. की रस्त्याच्या कडेला एक माणुसभर लांबी- रुंदीची रिकामी जागा नेहाला सापडेना. तिच्या पोटातले पाणी खाली सरकून ओटीपोटीत दुखायला लागले. पाण्याचा फोर्स जलदगतीने सुसुवाहिनी तुन टोकापर्यंत पोचू पाहत होता. एकांत जागेसाठी तिचा शोध चालू होता.

अवघड नागमोडी वळण घेत गाडी उताराला लागली. प्रेशर वाढत जात होते आणि नेहाच्या नजरेत मोक्याची जागा भरली. भल्यामोठया डेरेदार वडाखाली सावली अंथरून ती जागा जणू या जोडगोळीची वाट बघत होती. त्या जागेजवळ येताच अत्यानंदाने तिने करकचुन ब्रेक दाबला. नेहाच्या अचानक ब्रेक दाबण्याने केतकीचा थोडासा तोल गेला आणि ती झोपेतुन जागी झाली.

"कोणाला ठोकलंस??" केतकीने डोळे किलकिले करत प्रश्न केला.

"छान!! तु तर त्याचीच वाट बघ" नेहा गॉगल काढत म्हणाली.

"ए नेहा ..झोपु दे ना यार ..मस्त स्वप्न पडलं होतं. आणि तू...

"नेचर कॉल आला यार..उतर खाली.. नेहा गाडीचा तोल सांभाळत म्हणाली.

" एक की दोन नंबर???

"मूर्ख.. एक नंबर..उतर खाली..अगदी टोकाशी आलीय..एक मिनिट तरी झाला ना पाणी डायरेक्ट पेट्रोलच्या टाकीत घुसेल. नेहा ला प्रेशर असह्य करत हॉते.

ब्लॅक इन गोवा Nơi câu chuyện tồn tại. Hãy khám phá bây giờ