नेहाचे परिश्रम सर्व वाया गेले. ट्रकवाला अंधारात कुठे गायब झाला ते कळलेच नाही. शेवटी वैतागून नेहाने गाडी हॉटेलच्या दिशेने वळवली. हॉटेल राजहंसच्या गेट मधून एंटायसर आत घुसुन पार्किंग लॉट मध्ये पार्क झाली.
"नेहा, जाऊ दे ना.. कुठे त्या ट्रकवाल्याला शोधत बसणार" केतकीने गाडी वरून उतरत सॅक पाठीला लटकवली.
"नाही.. मी त्याला सोडणार नाही. नेहा अजून चिडलीच होती.
"बरं..तो भेटल्यावर बघु आपण, आधी चेक-इन तर करून घेऊ. केतकी आणि नेहा रेसिप्शन काउंटरवर जाऊ लागल्या.
रेसिप्शनवर केतकीने ओळखपत्र दाखवून चेक-इन करून घेतले. दोघीना कमालीची भुक लागली होती. त्यामुळे रूमवर जाण्याआधी त्यांनी जेवायचं ठरवले. हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये त्यांनी प्रवेश केला. एका टेबलावर स्थित होत त्यांनी जेवणाची ऑर्डर केली.
दिवसभराच्या प्रवासाने दोघींचा अवतार अगदी बघण्यासारखा होता. केस अस्ताव्यस्त झाले होते. केतकीने मरगळत मान टेबलावर टाकली. नेहा रेस्टॉरंटचे आजूबाजूचे दृश्य न्याहळत होती. तेव्हा तिला एक काळा आफ्रिकन माणुस डायनिग टेबलावर येताना दिसला. चांगला धष्टपुष्ट, उंची ६ फूट. एखाद्या ऑलिम्पिकमधल्या धावपटुसारखी त्याची शरीरययष्टी होती. त्याच्या पांढऱ्या सॅन्डोमधून छातीचे भरीव स्नायू बाहेर डोकावत होते. काळ्या चड्डीमधून गडद मांड्या लोखंडासारख्या मजबूत दिसत होत्या. नेहाची नजर त्याच्यावरच खिळली. त्या माणसाची नजर पण दोन्ही पोरींवर पडली. त्याने काही सेकंद त्यांच्याकडे पाहिले.
"केतु, कसला भारी माल आहे बघ" नेहाने केतकीला हलवून जागे केले.
"अं..म्म्म्म..काय गं.. तुच बघ... मला नाही इंटरेस्ट कोणामध्ये. केतकी डोकं वर करायला तयार नव्हती.
"अगं.. बघ तरी" नेहा पुन्हा एकदा उठवण्याचा प्रयत्न केला.
"काय यार ..कुठे आहे ..दाखव" केतकी मागे वळून इकडे तिकडे पाहु लागली.
रेस्टॉरंटमध्ये ऑफ सीजन असल्यामुळे तुरळक गर्दी होती. नेहमीपेक्षा माणसे कमी होती. ह्यावेळेस हॉटेल सर्व रिकामी पाहायला मिळतात. त्यामुळे पुर्ण रेस्टॉरंट मध्ये ह्या जोडगोळी व्यतिरिक्त तो एकटाच आफ्रिकन काळा माणूस बसला होता. केतकीने त्याच्याकडे पाहिले. तो माणूस पण दोघीकडे कुतूहलाने पाहत होता.
YOU ARE READING
ब्लॅक इन गोवा
Mystery / ThrillerMATURE CONTENT 18+ मैत्री ही फक्त मैत्री असते. ओढून ताणुन पांघरलेला बुरखा मैत्री ठरत नाही. मैत्रीच्या परीकक्षा विस्तिर्ण असतात. तो एक अति तेजस्वी झरोखा आहे. एका मनात उमटुन दुसऱ्या मनापर्यंत पोहचण्याचा त्याचा प्रवास अनोखा आणि अद्भुतरम्य आहे. तो अनुभव...