"मला काय म्हणायचे आहे तुला कळले असेलच?" गोविंदमामाने योगेशला विचारले.
"चाललंय. ठीक चाललंय." योगेश म्हणाला.
"प्रश्न नाही पडत का तुला? तुझी बायको तुझ्या शाळेत कशी लागली. चौकशी केली असशील ना?" मामा.
"नाही. मला नाही माहित. मी नाही केली चौकशी." आपली हतबलता दाखवत योगेश म्हणाला.
"अरे योग्या... तुला कधीच काही कळणार आहे कि नाही. लेका. तुला काय वाटते? तुला नोकरी पण हि आपण होऊनच मिळाली कि काय? आमदाराकडे शब्द टाकला होता मी तुझ्यासाठी." मामा म्हणाला.
योगेशला हे काहीच माहित नव्हते.
"आणि आता शुभदासाठी टाकला. तुला घटस्फोट दिल्यावर बाहेरून शिक्षण केले तिने. माझ्या संपर्कात होतीच तशी ती." मामा त्याला खिजवत होता.
योगेशची चहाच्या ग्लासावरची पकड टाइट झाली.
"राग आला का? मला कळले होते तुला माहित झाले आहे ते. स्वतःच्या बायकोबद्दल शंका घेऊन तू त्या रात्री पळून आलास त्यावरूनच मला कळले. तू सर्व काही पहिले असणार. तू विरोध करणार नाहीस हे पण मला कळले. कारण तुझी तेवढी क्षमता नाही. तुला माहित असुन पण तू काही बोलला नाहीस हे शुभदाला पण कळले आणि तुझा असला कणाहीन स्वभाव तिला समजला. तू तिचा नवरा म्हणून तिच्यावर हक्क गाजवतोस. पण त्या हक्कामध्ये प्रेम कुठे होते. ती झोपेत असताना मी तिच्यावर थोडी बळजबरी केली हे तू पाहिलेस. पण तू काहीही न करता गप्प राहिलास. शिवाय त्याचा शुभदावर सूड म्हण किंवा तुझ्या पुचाट पौरुषाची गरज म्हणून तू सरळ शुभदाच्या बहिणीवर हात टाकलास आणि त्याचे शुभदाला निमित्त मिळाले. मला म्हणालीच होती ती. तुझ्यासोबत नाही राहायचे म्हणून. कारण तुझा पुचाटपणा आणि तिला समजलेली एका खऱ्या पुरुषाची चव तीला ह्या निर्णयापर्यंत घेऊन आले." मामा म्हणाला.
"माझ्यात काय कमी आहे. ती हलक्या वृत्तीची बाई आहे." योगेश छद्मी हसत म्हणाला.
"नको थापा मारू. तुझी लायकीपण माहित आहे मला. पाहिलंय मी." मामा म्हणाला.