भाग - ७

6.9K 32 14
                                    

झपझप चालत भोजने मास्तर निम्म्या रस्त्यात येऊन पोहोचला. एका लाईटच्या खांबाला त्याने हाताने आधार देत स्वतःला उभे केले. त्याच्या डोळ्यासमोर घैसास मास्तरांच्या शर्टमध्ये दारात उभी असलेली शुभदा तरळत होती. तिच्या शुभ्र गोऱ्या मांड्या. मोकळे केस. घैसास मास्तरांसोबत खाटेवर लवलवणारे कामुक शरीर. त्याला गोविंदमामाचे शब्द आठवले.

आयुष्यात त्याने काय गमावले त्याला आता नक्कीच कळले होते. शुभदाच्या स्त्रीत्वाला आलेला भयानक मादकपणा त्याने गमावला होता. तिच्या सौंदर्यप्रमाणेच वृद्धिंगत झालेल्या बुद्धी आणि आत्मविश्वासाने वागणाऱ्या व्यक्तिमत्वाचा स्वतःच्या आयुष्यातला सहभाग गमावला होता. त्याला आता शुभदा क्षणाक्षणाला हवी होती. तिच्यासाठी त्याच्या मनात तीव्र आकर्षणाची भावना उमटली होती. तिला पहिल्यांदा पहिली होती त्याही पेक्षा जास्त ओढ त्याला वाटत होती. पण आता ती त्याच्यापाशी वळणे अशक्यच होते. मामा म्हणाला त्याप्रमाणे ती मुक्त झाली होती. भोजने मास्तर आता मत्सराने जाम पेटला होता. त्याला असह्य होत होते. त्याच्या समोर शुभदाने घैसास मास्तरांसोबत ज्या उत्कटतेने प्रणय केला होता. त्याच उत्कटतेने तिने मामालाही साथ दिली होती. पण त्याच्यासोबत मात्र अगदी थंड शवासारखा तिचा प्रतिसाद असायचा. ते आठवून हळूहळू त्याचा मत्सर रागात परावर्तित होऊ लागला. काहीतरी करून तिच्या मार्गात खो घालायचे त्याने ठरवले. त्याचा विचार करत करत तो घरी गेला.

असेच २-३ आठवडे गेले असतील. तो त्या महिन्यात एकदा मुलीला भेटायला जाऊन आला. तिकडे गेल्यावर त्याला वाटले कि शुभदाच्या वडिलांना एकदा सांगावे तुमची मुलगी तिकडे काय रंग उधळत आहे. पण त्याला माहित होते. असे केल्यावर ते विश्वास तर ठेवणार नाहीत पण शुभदा सावध होईल. मग त्याने एक निनावी पत्र मुद्दाम जरा वाकड्या तिकड्या हस्ताक्षरात लिहून काढले.

मथळा असा होता कि, "तुमच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू असणारे श्री घैसास सर आणि श्रीमती शुभदा पेडणेकर ह्यांमधे जरा जास्तच उथळ प्रकारात मोडणारे संबंध आहेत असे निदर्शनास आले आहे. मी तुमच्या शाळेचा शुभचिंतक आणि विद्यार्थ्यांच्या जडघडणीकडे राष्ट्रहित म्हणून पाहणारा एक सुजाण नागरिक असून अशी गोष्ट तुमच्या संस्थेमध्ये घडते हे लांच्छनास्पद आहे हे तुम्हाला सांगू इच्छितो. तेव्हा सदर प्रकारची चौकशी करून योग्य ते पाऊल वेळीच उचलावे. आपल्यास सावध करण्याप्रीत्यर्थ हा पत्र प्रपंच केला." असे लिहून त्याने ते पत्र हेडमास्तरांना पाठवले.

मास्तरDove le storie prendono vita. Scoprilo ora