भाग २

9.7K 26 4
                                    

"योग्या .. अरे मला तहसिलातून जे पत्र हवं आहे ते मिळालय. पण त्यावर सही शिक्का द्यायला तहसीलदार जागेवर कुठाय...?" मामा योगेशला एका सकाळी सांगत होते.

"मग? काय करायचे आता?" योगेशने विचारले.

"तेच तुला सांगतोय. तहसीलदारांच्या गावाला जायला लागेल. कारण ते आहेत सुट्टीवर. मी माहिती काढली आहे. त्यांच्या गावीच माझा एक मित्र आहे. त्याला सोबत घेऊन गेलो तर लगेच सही मिळेल. पण कसंय ना तिकडे जायचे आणि परत इथे येऊन घराच्या परतीचा प्रवास करायचा. झेपेल कि नाही कळत नाही." मामा म्हणाले.

"हो ते आहे.. दगदग जाम होईल." योगेशची आई म्हणाली.

"असं करतोस का? तू जाऊन येशील का तहसीलदारांच्या घरी. माझ्या मित्राचा पत्ता देतो. त्याच्याकडे थांब. तो येईल तुझ्यासोबत पत्रावर सही घे आणि परत ये." मामा एका दमात त्याला सांगून मोकळा झाला.

योगेशने एकवेळ स्वयंपाक करणाऱ्या आपल्या बायकोच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहिले. मामाचे काम महत्वाचे होते. मामा तसा जमीनजुमला असलेला आणि सधन होता. शिवाय त्याला मुलबाळ नव्हते. साहजिकच स्वार्थी योगेशच्या मनात आर्थिक विचार तरळून जात असे. तरीपण शुभदाकडे पाहून त्याला जावे वाटत नव्हते. मामाच्या स्वभावाबद्दल त्याला खात्री वाटत नव्हती.

"अरे तिकडे काय पाहतोस शिंच्या. एका रात्रीची तर गोष्ट आहे. बायको पळून चालली कि काय तुझी? " मामा योगेशला म्हणाले. तसा तो वरमला.

"आज दुपारची एष्टी आहे. ती पकड आणि जा. उद्या सकाळी काम झाले कि निघ संध्याकाळ पर्यंत घरी पोहोचशील." मामा त्याला रेटून म्हणाले. योगेशला काही पर्याय उरला नाही. त्याने शाळेमध्ये २ दिवसांच्या रजेचा अर्ज दिला. जेवण वैगरे आटोपून तो एसटी स्टॅण्डवर बस पकडायला निघून गेला.

इकडे संध्याकाळी जेवणे उरकली. बाहेर जरा पावसाचे वातावरण झाले होते. कुठेतरी पाऊस पडला असावा. हवेत जरा गारवाच होता.

झोपायची तयारी करताना मामा योगेशच्या वडिलांना म्हणाले, "भावोजी तुम्ही असे करा आत किचनमध्ये अक्कासोबत झोपा. बाहेर थंडी आहे. आजाराला कारण होईल. मी ओसरीमध्ये झोपतो. मला जर काही लागले तर मी दार वाजवीन. सुनबाई आहेच. उगाच तुमची झोपमोड नको. कसे?"

मास्तरOnde histórias criam vida. Descubra agora