यज्ञ... भाग १

13.4K 24 0
                                    

एक प्रसन्न सकाळ. पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झालेली. घरी एकटीच असलेली नयना कडक अश्या कॉफीचा झुरका घेत आपला आयफोन पाहत होती. पंकज ने तो ह्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट दिलेला.

नयना वाळवेकर. एका उपसभापतीची कन्या. तिचे माहेर मोहिते हे राजकारणातील एक मातब्बर घराणे. नयनाही घरच्या राजकीय वातावरणात वाढल्याने तिच्यातहि ते नेतृत्व गुण आलेले. तरुण, गोऱ्या रंगाची, उंचपुरी अशी नयना चटकन लोकांचे लक्ष वेधून घ्यायची. कॉलेज मध्येही हुशार, बुलेट, चार चाकी गाड्या ड्रायव्ह करणे हा तिचा छंद, अगदी स्वच्छंद जगत होती ती आपले आयुष्य, घरची श्रीमंती कळसाला भिडलेली असताना देखील तिचा स्वभाव नम्र असाच होता. त्यामुळे लहान थोरांना ती आपलीशी वाटायची. तारुण्यात आलेल्या नयनाच्या मनातही प्रेमाच्या भावना उमलू लागलेल्या. वाळवेकरांचा पंकज तिला आवडू लागलेला. वाळवेकर हे त्या गावचे एक मोठे घराणे होते. अंतस्थ जरी ते मोहित्यांचे समर्थक असले तरी त्यांच्यात थोड्या बहुत प्रमाणात वितुष्ट हे होतेच. तरीही ह्या गोष्टींना बगल देत नयना आणि पंकज एकत्र झाले. त्यांचे प्रेम दिवसेंदिवस खुलतच होते. ह्याचा थांगपत्ता दोघांच्याही घरच्यांना नव्हता.

दरम्यानच्या काळात एक दुःखद घटना घडली. पंकजच्या वडिलांचे निधन झाले. आता त्या मोठ्या घरात त्याची विधवा आई अन् तो दोघेच राहू लागले. पंकजला दोन चुलते पैकी अशोक काकाला राहुल आणि प्रसाद हे दोन चिरंजीव तर थोरल्या एकनाथ काकांना सचिन आणि सतीश हे दोन चिरंजीव. पंकज हा त्याच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याच्या वडिलांकडेच इतर भावांपेक्षा जास्त संपत्ती होती. शिवाय ते राजकारणातहि अग्रेसर होते. वडिलांच्या सर्व संपत्तीचा ताबा पंकजने घेतला. इतकेच काय इतर चुलत भावांच्या नावावर वडिलांनी केलेल्या जमिनी देखील त्याने आपल्या नावावर करून घेतल्या. अशोकची बायको जरा खमकी असल्या कारणाने थोडी संपत्ती त्यांच्याकडे राहिली. पण थोरला एकनाथ मात्र दरिद्री झाला. थोरला सचिन ड्रायव्हिंग च्या कामावर जाऊ लागला, त्याची बायको सारिका ही शेती, जनावरे सांभाळू लागली.

वडिलांच्या जाण्याने पंकजच्या लग्नाचा मार्गही मोकळा झाला. वडील असते तर नयनाशी त्याचे लग्न झालेच नसते हे विशेष. दोघांच्या घरी रीतसर बोलणी झाल्यावर अखेर नयना आणि पंकजचा विवाह धूमधडाक्यात झाला. नयना वाळवेकर घराण्याची सून झाली.

दिवस सरत होते. लग्नाला सात वर्षे झाली. पण ह्या सात वर्षात अजुन त्यांच्या घरी पाळणा हलला नव्हता. राहुल आणि प्रसादचे लग्न मागून झाले तरी त्यांना एक एक मूल झालेले. पण नयनाची कुस अजुन उजली नव्हती. ती मातृत्वाला अजुन पारखी होती.

मगातील कॉफी संपली होती. ती आता फेसबुक चाळत बसलेली. नयना सोशल मीडियावर तशी बरीच अॅक्टिव असायची. अचानक तिला मेसेंजर वर मेसेज आल्याचे दिसले. मेसेज केलेल्याचे नाव वाचून तिची भुवयी उंचावली. तिच्या दिराने प्रसादने तिला Hi टाकला होता. तोच तीला सारिकाचा कॉल आला.
सारिका - " हॅलो, नयना....? "
नयना - " हा सारिका ताई, बोला "
सारिका - " माझं अंग जरा दुखत आहे ग, कण कण ही आहे. जरा घरात येतीस काय..? "
नयना - " हो ताई, आलेच..."
स्वयंपाक तयार झालेला सासूबाई वाढून घेतील. असे म्हणत नयना बाहेर आली तोच प्रसाद तिला दिसला. दिसायला काळा, उंचापुरा शरीर कमावलेला प्रसाद कामुक होता. ह्याची कल्पना नयनाला होती. त्याच्या अनेक लढतरी तिच्या कानावर ह्याआधी येऊन गेलेल्या. हा वासनांध सारिका ताईलाही मागणी घालतो. दोन तीन वेळा तर त्याने अतिप्रसंग करायचाही प्रयत्न केलाय म्हणे. पण बिचारी सारिका, सांगेल तरी कोणाला. जो तो ह्याच्या बाजूनेच बोलायचा. शिवाय पैश्यासाठी बाई ह्याच्यावर आरोप करत आहे असा बोभाटा व्हायचा. नयना तिची मैत्रीण आणि जाऊ दोन्ही असल्याने ती तिच्याजवळ आपले मन मोकळे करायची.

बाहेर येऊन फाटक लावताना नयना किंचित वाकल्यावर प्रसाद तिचे नितंब न्याहाळत होता. नयनाच्या नजरेतून हे सुटले नाही. तिने मनातल्या मनात शिवी हासडत तिथून रागाने निघाली. प्रसाद आपला निर्लज्जपणे हासत होता.

घर जवळ असल्याने नयना पटकन तिथे आली. सारिकाची मुले शाळेला गेलेली. नवरा भाडे घेऊन दूर गेलेला. खाटावर सारिका विव्हळत पडलेली. तिने दडपून घेतलेले. नयना तिच्या जवळ जाताच तिने अश्रूंना वाट मोकळी केली. अजुन एकदा प्रसादने तसा प्रयत्न केलाय हे नयनाला कळून चुकले. सारिका शांत होताच सांगू लागली.

क्रमशः

यज्ञWhere stories live. Discover now