भाग :- ०४

426 1 0
                                    

मला कंडक्टर म्हणून जवळपास आठ महिने झाले होते . त्यामुळे आता मला काही अडचणी येत नव्हता . म्हणजे कसे असते एक वेळ पाण्यात पडल्यावर पोहणे येते ना बरोबर तसे . मात्र मला एक थोडा कडू अनुभव आला तो मी आज सांगतो .

मी आणि सतिश काका निघालो , रात्रीचे आठ वाजले होते . गाडी अकोला येथे परत येत होती . साधारण आज गर्दी कमी होती , त्यामुळे साहजिकच माझे डोळे लागले . मी डोळे उघडले तर बोरगाव मंजू आले , मी लगेच तयार झालो . ज्यांना बोरगाव येथे उतरायचे होते ते झाली उतरले . मी घंटी वाजवली आणि काका बस सुरू करणार तितक्यात एक कपल आत येऊन बसले .

साधारण सत्तावीस वर्षाचा मुलगा आणि वीस एक वर्षाची मुलगी असेल असा माझा अंदाज होता . बस सुरू झाली आणि त्यांनी आपले तिकीट काढले . काका अकोला द्या , त्या मुलाने भारी आवाजात मला म्हटले . मला वाटले तो दारू पिऊन होता . मी काही न बोलता त्यांना तिकीट दिले .

माझी झोप तर केव्हाची गेली , त्यामुळे बसच्या आत निरीक्षण करू लागलो . बस मध्ये सर्वात मागे ते कपल बसले होते आणि हो त्यांचे काहीतरी बिनसले आहे . हे मला त्यांच्या हालचाली वरून वाटतं होते . मी समोर बघू लागलो तर दोन काका बसले होते , म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाचे असतील . त्यांच्या समोर एक नवरा आणि बायको होते आणि हो सोबत त्यांचे दोन कार्टी . त्यांच्या कडे बघून मला वाटले , अव्या लेका टूये बी असेच हाल होणार आहेत बे . मनात हसू सुध्दा आले , कुठे माझे लग्न होऊन तीन महिने झाले आहेत . मी मात्र आता पासून असे विचार करत आहे .
तर एकूण आठ लोक होते , कसे आहे ना ही गाडी हल्टींग टाईम आहे . त्यामुळे या गाडीत सहजा सहजी कोणी बसत नसते .

काही वेळात आम्ही अकोला येथे पोहचलो , प्रवासी सारेच खाली उतरले . मी आणि काका गाडी आत लावली . मी पैसे जमा करायला आत गेलो आणि काका आपल्या ड्रायव्हर मित्रा सोबत गप्पा मारत बसले . हे म्हणजे त्यांचे स्वर्ग होते की काय , हे त्यांचं त्यांनाच माहीत . एकदा ते त्यांना मिळाले की त्यांच्या डोक्यातील सारे तान कमी होतात , असे एकदा मला त्यांनी सांगितले होते .

कंडक्टर ...Where stories live. Discover now