काका आज थोडे लवकर घरी जायचे आहे , मी आपली तिकीटाची बॅग सरळ करत सतिश काका यांना म्हटले . आरे पण कायले रे बुवा , आज लवकर घरी . काका हसत मला म्हणाले , मग मी सुध्दा लगेच त्यांना म्हटले . अहो आज बायकोचा भाऊ आणि त्याची बायको येत आहेत , म्हणून बाकी काही विशेष नाही . आज तर मग बाप्पा गोड धोड असेल नाही का ??? हो यात मात्र काही शंका नव्हती , बायकोचा भाऊ आला असेल आणि तिने काही मजेशीर नाही बनवले असे तर होऊ शकत नाही . मी लगेच काकांना म्हणालो , अहो तो खूप दिवसांनी माझ्या घरी येत आहे . त्यामुळे त्याची खातिरदरी करणे आपले काम नाही आहे का ??? मी थोडे प्रश्नार्थक मुद्रेने काकांना विचारले . अरे तसे नाही आहे , पण या बायका ना आपल्या माहेरील लोकांची खूप कायजी घेतात अन आपले आले की त्याईच्या नाका दोयाले वया पडतात बाबू . या बाबत मी सुध्दा काही प्रमाणात त्यांच्या सोबत होतो , काही प्रमाणात बरं . जाऊद्या ते सोडा चला निघुयात सकाळचे सात वाजत आले आहेत , आपला वेळ झाला आहे . मी आणि काका लगेच बस घेऊन बसस्थानक येथे हजर झालो .
नेहमी प्रमाणे सकाळची वेळ असल्याने खूप कमी लोक होते . नाही म्हणजे ते दररोज जे चेहरे असतात तेच होते . अकोला मार्केट होत , त्यामुळे सकाळी काही लोक भाजीपाला विकत घेऊन आपल्या गावी विकत असत . आज सुध्दा त्यांच्या पैकी दोन लोक मला कमी दिसत होते . मला काही राहवले नाही , शेवटी मी एका काका जवळ गेलो आणि त्यांना म्हटले . अहो काका आज ते तुमच्या सोबत टक्कल झालेले आजोबा दिसत नाही आहेत . (( मला त्यांचे नाव माहीत नव्हते , त्यामुळे टक्कल हा शब्द वापरला . )) आबे तो तुक्या का ??? तो तर लेका त्याच्या नातेवाईकात लग्न आहे , तिथे गेला असेल . बरं बरं ठीक आहे काका , मी लगेच तेथून काढता पाय घेतला . अहो ते तुकाराम काका मला खूप सज्जन माणूस वाटतात . नाही म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर असे हास्य राहते , ते फक्त एक कष्ट करणाऱ्या आणि त्यात समाधान मानणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसते .
बस बाभुळगाव ( जहा ) येथे आली , ज्यांना उतरायचे होते ते लोक खाली उतरले . मी घंटी वाजवू काकांना चालण्याचा इशारा केला . तेवढ्यात भर धाव वेगात एक मोटर सायकल वाला आमच्या बस जवळून गेला . नाही येथे भरधाव या करिता कारण तो इतक्या कर्कश आवाजात हॉर्न वाजवत गेला , ज्या मुळे बस मधील लोक त्याला शिव्या देऊ लागले . तो तर केव्हाच आमच्या पुढे गेला होता . मी एक वेळ बस मध्ये बघितले , तर अजून पण लोक त्याला शिव्या देत होते .