माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. मनात काही 'सुप्त इच्छा' असणे ह्यात काही गैर नाही. पण त्या सुप्त इच्छा पुऱ्या होतीलच किंवा व्हायलाच पाहिजे असेही काही नाही. तरी पण जर त्या पुर्ण झाल्या तर त्याला काय म्हणायचे? मी नेहमी विचार करते की त्या दिवशी मी सोनालीकडे जर गेले नसते तर जे काही घडले ते घडले असते का?
सोनाली माझी जिवलग मैत्रिण! अगदी शाळेत असल्यापासून आमची गटटी जमली ती आजपर्यंत कायम आहे. वयाने आम्ही दोघी सारख्याच आहोत आणि आमचे जीवनही पहिल्यापासून सारखेच आहे. आमचा स्वभाव मिळता-जुळता आहे, आमच्या आवडी-निवडी सारख्या आहेत. मी जितकी मनमिळाऊ स्वभावाची होते त्यापेक्षा सोनाली थोडी जास्तच खुल्या स्वभावाची होती. शाळा आणि नंतर कॉलेज आम्ही एकत्रच केले. स्टडी, स्पोर्ट्स, पिकनिक, सिनेमा, पार्टी वगैरे सगळे आम्ही दोघी एकत्रच करत असे. आयुष्यातल्या अनेक पहिल्या गोष्टी आम्ही एकत्रच केल्या आहेत. डिग्री घेतल्यानंतर आम्ही दोघी एकाच कंपनीत जॉब करायला सुरुवात केली.
बाय द वे... माझे नाव मृणाल आणि मी ३२ वयाची जॉब करणारी एक गृहिणी आहे. माझ्याच नावाची जी एक मराठी अभिनेत्री आहे तिच्यासारखीच मी दिसायला आहे. गोरा रंग, गोल चेहरा आणि किंचीत भरलेली अंगकाठी असे बरेचसे साम्य त्या अभिनेत्रीत आणि माझ्यात आहे.
आणि योगायोग पहा की सोनाली सुद्धा तिचेच नाव असलेल्या सिनिअर मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्साणी सारखीच दिसायला आहे.
YOU ARE READING
मृणाल ची'सुप्त इच्छा' ( मनातली इच्छा )
Romanceहि कथा माझे मित्र लेखक - सागर मंथन यांनी लिहली आहे मला खूप आवडली तुम्हला हि आवडेल अशी अशा आहे माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल ते सांगता येत नाही. मनात काही 'सुप्त इच्छा' असणे ह्यात काही गैर नाही. पण त्या सुप्त इच्छा पुऱ्या होतीलच किंवा व्हायलाच पाह...