जवळजवळ दोन तासांनंतर अभिजीत तिथून बाहेर येतो आणि त्या दोघांकडे बघतो.
स्टिफन, ''काय झालं?''
अभिजीत, ''आपल्याला लगेचच कामाला लागलं पाहिजे. अल्बर्ट, अंटार्क्टिका खंड आणि महासागराबाबत आपल्या कामी येईल अशी सर्व प्रकारची माहिती, नकाशे, छायाचित्रे मला हवी आहेत.''
अभिजीतच्या बोलण्यात उत्सफुर्तता होती. जनू काही त्याला सर्व कळलं आहे. संपुर्ण मोहिमेची लगाम त्याच्याच हातात आहे. अंटार्क्टिकावर जायचं नक्की आहे आणि फक्त झालेलं नियोजन इतर साथीदारांना सांगायचं आहे. थोडक्यात सांगायचं तर अभिजीत नेहमीसारख्या चपळाईने कामाला सुरुवात करत होता.
अल्बर्ट, ''ओ.के. सर, लगेच कामाला लागतो.''
अभिजीत, ''स्टिफन, आपली टीम डेन्मार्कमधून निघाली आहे... उद्यापर्यंत ते सगळे इथे पोहोचतील... अमेरिकी नौसेनेतील अधिकाऱ्यांसोबत लगेचच चर्चा कर आणि परिस्थिती नक्की काय आहे याची आहे तितकी माहिती मला मिळवून दे...''
स्टिफन, ''बरं, आणि हे लॅबमधलं काम?''
अभिजीत, ''ते आपल्यासाठी काही महत्त्वाचं नाही... इथल्या कर्मचाऱ्यांना लेक्चर रुमची स्वच्छता करायला सांग... उद्या आपल्याला तिथेच बसायचं आहे... तू आत्ताच निघू शकतोस... जाताना श्रेयाला सांग, आज मला घरी यायला उशीर होईल आणि कुणालातरी सांगून इथे कॉफीचं यंत्र बसव...''
स्टिफन लगेच कामाला लागतो. अभिजीत एकटाच प्रयोगशाळेमध्ये काम करत असतो. सॅटेलाईटद्वारे तो महासागरातील लहरींचा अंदाज घेतो. कागदावर पृथ्वीवरील आकृत्या काढू लागतो. प्रयोगशाळेमध्ये असलेली पुस्तके उघडून त्यातील शास्त्रीय अंदाज लिहून घेतो. गणिताची आकडेमोड करत कितीतरी पानं तो नुसती फाडून फेकून देतो. स्टिफनने लगेचच कॉफीची व्यवस्था केली असल्याने अभिजीत दिवसभर बारा-चैदा कप कॉफी संपवतो. दुसरीकडे अल्बर्ट 'स्क्रिप्स इन्स्टिट्यूट'च्या ग्रंथालयामध्ये महासागरावरील आवश्यक असणारी माहिती एकत्र करण्याचं काम करतो. मोठमोठ्या संशोधकांनी महासागरावर केलेलं संशोधन तो त्याच्या नोंदीमध्ये लिहून घेतो. इथे स्टिफन अमेरिकी नौसेनेच्या अधिकाऱ्यांना आपण लवकरच अंटार्क्टिका खंडावर जात असल्याचे सांगतो. सध्या तिथे नक्की कोणत्या हालाचली होत आहेत याबाबत अमेरिकी नौसेनेचे अधिकारी त्याला माहिती देतात, तसेच ही मोहिम धोक्याची आहे, म्हणून अमेरिकी नौसेनेतील पाणबूडीचा विशेष अनुभव असलेले मेजर रॉजर्ड यांना आपण आपल्यासोबत पाठवत आहोत असे सांगतात.
VOCÊ ESTÁ LENDO
Punha Navyane Suruvaat
Ficção Científicaएक अशी कथा, जिथे सर्व काही संपतं आणि सर्वांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. ही सुरुवात नव्या जगाची आहे, नव्या जगण्याची आहे, जगण्याची नाही तर नव्याने जगवण्याची आहे, नव्याने घर शोधण्याची आहे, गमावलेल्या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने कमावण्याची आहे...