प्रत्येक महासागर व तेथील जीवशास्त्रीय परीस्थिती तसेच विविध जीवांच्या भौगोलिक वाटणीची कारणे यांचा आभ्यास करणे, हा या मोहिमेचा उद्देश होता... हा अभ्यास करण्यासाठी पाण्याचे नमुने घेणे, पाण्याचे पृष्ठालगतचे व तळालगचे तापमान मोजणे, सागरी प्रवाहांचे व हवेच्या दाबाचे मापन करणे, सागराच्या तळावरील गाळाचे नमुने घेऊन त्यांचे विश्लेषण करणे जीवांच्या नव्या जातींचा शोध घेणे वगैरे कामे करण्यात आली...
नान्सेन हा १८९३ मध्ये 'फ्राम' या जहाजातून जास्तीत जास्त उत्तरेस गेला होता...१९२५ ते 19२७ या काळात 'मिटिअर' या जर्मन जहाजाने दक्षिण अटलांटिकचे भौतिकीय व रासायनिक दृष्टींनी अध्ययन केले व तेथील गाळाचा अभ्यास केला... 'डिस्कव्हरी-१' व 'डिस्कव्हरी-२' या इंग्लंडच्या जहाजांतून पहिल्या महायुद्धांनंतर करण्यात आलेल्या मोहिमेतून विशेषतः दक्षिण गोलार्धातील महासागराची, बरीच माहिती उपलब्ध झाली...१९२७-२९ या काळात 'कार्नेगी' हे अमेरिकन जहाज, दुसऱ्या महायुद्धात आणि नंतरच्या काळात नाविक दलाची जहाजे तसेच आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्षात अनेक वैज्ञानिक जहाजे यांतून महासागराची महत्त्वपूर्ण निरीक्षणे करण्यात आली...३ अॉगस्ट १९५८ रोजी अमेरिकेच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीने भौगोलिक उत्तर धृवाच्या बर्फाखालून प्रवास केला...''
अभिजीत, ''ठिक आहे, सध्या इतकी माहिती ठिक आहे...''
जेन, ''पण एडव्हान्स माहिती तर मी आता सांगणारच होते...''
अभिजीत इशाऱ्याने तिला ब्रुसकडे बघायला सांगतो. त्यामुळे थोडा वेळ शांतता असते. मेजर रॉजर्ड यांना ब्रुस झोपी गेला ही गोष्ट माहित नसते म्हणून ते बोलू लागतात,
''जेनने दिलेली माहिती ऐकल्यानंतर तुमची टीम प्रत्येक गोष्टीचा चांगला अभ्यास करुन जाणीवपुर्वक मोहिमेची आखणी करते... खरंच, माझ्या मनात तुमच्या जॉर्डन सरांविषयी सन्मानाची भावना आता आणखीच वाढली आहे.'' जेन अभिजीतला डोळा मारते आणि ब्रुसशेजारी आपल्या जागेवर जाऊन बसते. नंतर कोपरखळी मारुन ती त्याला उठवते.
VOCÊ ESTÁ LENDO
Punha Navyane Suruvaat
Ficção Científicaएक अशी कथा, जिथे सर्व काही संपतं आणि सर्वांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. ही सुरुवात नव्या जगाची आहे, नव्या जगण्याची आहे, जगण्याची नाही तर नव्याने जगवण्याची आहे, नव्याने घर शोधण्याची आहे, गमावलेल्या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने कमावण्याची आहे...