प्रकरण 15

226 4 0
                                    

आशिया आणि युरोप खंडातील अनेक जानकारांचा अभिजीत आणि जॉर्डन सरांवर विश्वास होता. अगदी पणजी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओशनोग्राफी च्या अधिकाऱ्यांचा देखील अभिजीतला पाठिंबा होता. पण म्हणतात ना, 'वेळ आली की गाढवाला सुध्दा बाप बनवावं लागतं.' तशीच अवस्था जगातील जनतेची झाली होती. इथे त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता ते गाढव म्हणण्यासारखे मुळीच नव्हते. पण ते आपला सिध्दांत इतरांसमोर उघडपणे मांडत देखील नव्हते. त्यामुळे संपुर्ण जगाकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांना व्यक्त होऊन अभिजीतला समर्थन देखील देता येत नव्हते. मृत्यूला झुंज देत संपुर्ण जगाचं लक्ष भारत आणि चीन येथील संशोधकांच्या संशोेधनावर लागले होते.

भारतामध्ाील दिल्ली येथे संयुगे बनविण्याचं आणि चीनमध्ाील बिजिंग मोहीम आखण्याचं काम सुरु होतं. दोन्ही देशांना संपूर्ण जग आर्थिक आणि लष्करी मदत करतं. रशिया, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स असे युरोपीय देश आपल्या ताफ्यातील लढाऊ जेट विमानं या मोहीमेसाठी देतात. पाकिस्तान, अफगानिस्तान, आफ्रिका येथून अणुविस्फोटासाठी लागणारा कच्चा माल आणला जातो. प्रत्येक देश या मोहीमेसाठी काही ना काही मदत करतो. जवळपास 150 लढाऊ विमाने अंटार्क्टिका खंडावर पाठवण्याची तयारी सुरु होते. ही विमानं पृथ्वीच्या वर्तुळाकार भागातून अंटार्क्टिकाच्या सर्व बाजूंनी एकाच वेळी अणुविस्फोट घडवून आणणार होती.

परिस्थितीचा विचार करायला गेलं तर वेळ अशी होती की, जगात सर्वांत पहिले अणुविस्फोट घडवणारा अमेरिका या सर्वात शक्तीशाली अणुविस्फोट मोहीमेपासून अलिप्त होता. खरं तर सर्व देशांमध्ये पुन्हा अणुविस्फोट घडवून न आणण्याचे ठरले होते, पण या मोहीमेशीवाय इतर देशांसमोर पर्याय नव्हता. 1942 साली हिरोशिमा आणि नागासाकी या ठिकाणी जेव्हा अणुविस्फोट झाला तेव्हा ही प्रणाली नवीनच आणि अत्यंत लहान होती. तिचा परिणाम मोठा असला तरी ती प्रणाली तेव्हा तितकीशी विकसीत नव्हती. मात्र आजच्या युगात अणुविज्ञानामध्ये अनेक क्रांतीकारी बदल घडले. आण्विक किरणांचा विकास करुन त्यामध्ये मोठा संहार करण्याची क्षमता विकसीत करण्यात आली. आता जर अणुविस्फोट झाला, तर संपुर्ण जगाचा विनाश निश्चित आहे. त्यात इथे एक नाही तर तब्बल 150 अणुविस्फोट होणार आहेत आणि त्यातून होणाऱ्या संहाराची कुणीही कल्पना करु शकत नव्हतं हे माहीत असल्याने अमेरिका या मोहिमेला विरोध करत होता. पण चीन आणि भारत येथे अणुविस्फोटाची तयारी जोर धरत असते.

Punha Navyane SuruvaatOnde histórias criam vida. Descubra agora