प्रकरण 11

266 3 0
                                    

 ''ओके सर...'' एवढं बोलून अल्बर्ट मोहम्मदजवळ जातो आणि अभिजीत पाणबुडीच्या खालच्या कक्षामध्ये, तिथे दोन ठिकाणी काचा असतात. या काचा इतक्या मजबूत असतात की, पाणबुडी एखाद्या दगडावर जरी आपटली तरी त्या काचांना जरादेखील तडा जाणार नाही. अभिजीत त्या काचेमधून बाहेर पाण्यामधील वास्तव जीवन पाहतो.

अगदी संथपणे मासे संचार करीत असतात. जेलीफीश, लहान मासे, बेडूक, समुद्री साप, छोटे शार्क मासे अगदी संथपणे पाण्यातून संचार करत होते, हळूच एक जेलीफीश अभिजीत उभा असलेल्या काचेजवळ येते. अभिजीत तिच्याजवळ जातो तोच ती घाबरुन तिथून निघून जाते. नंतर अभिजीतला तिथे कासव दिसतात. एक मोठा मासा आपल्या पिलांना कुशीत घेतल्याप्रमाणे पाणबुडीच्या विरुध्द दिशेने जातो. जरा खाली पाहिल्यावर अभिजीतला तिथे अॅंकर फिश दिसतो, एखाद्या राक्षसासारखा दिसणा-या त्या अॅंकर फिशच्या डोक्यावरुन एक पेशी डोळ्यासमोर आलेली होती, त्यातून प्रकाश निर्माण व्हायचा आणि त्या प्रकाशाच्या सहाय्याने अंधारातून वाट काढत अॅंकर फिश पुढे जात होता. ज्याप्रमाणे पक्ष्यांचा थवा आकाशात मुक्तपणे संचार करत असतो, त्याचप्रमाणे लहान मासे पाण्याखालून एकत्र इकडून तिकडे फिरत होते. इतक्यात त्याला खाली असलेल्या प्रवाळांमधून एक खेकडा वेगाने जाताना दिसतो. समुद्राखालचं ते नयनरम्य वातावरण बघत तो मोहीम, श्रेया, आईवडील, जॉर्डन सर सर्वांना विसरतो.

दुसरीकडे चीन आणि रशिया यांच्या संशोधकांना सॅटेलाईटद्वारे अभिजीतची पाणबुडी अंटार्क्टिकाच्या दिशेने जाताना दिसते. अमेरिकी नौसेना आणि 'इंटरनॅशनल काउन्सिल फॉर द एक्स्प्लोरेशन ऑफ द सी' यांनी मिळून संपूर्ण जगाचा विश्वासघात करत अंटार्क्टिकाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला म्हणून इतर देशांचे वैज्ञानिक, संशोधक आणि सैन्यदल त्यांच्यावर कडाडून टिका करतात. 'अभिजीतच्या टीमला लगेचच मागे फिरायला सांगा नाहीतर आमच्या क्रोधाला सामोरे जा...' असे रोखठोक बोल रशियाचे सैन्यप्रमुख करतात. अमेरिकेने नियमांचा भंग केला असल्याने अमेरिकी नौसेनेच्या अधिका-यांना 'युनेस्को'मध्ये उपस्थित रहायला सांगतात.

Punha Navyane SuruvaatOnde histórias criam vida. Descubra agora