पाहशील का रे मला स्वप्नात?
गोड गालात हसत तिने विचारले,
मनातील काहुर तिच्या
नाजुक डोळ्यात आता दाटुन आले........
विचारात मग्न कुठे तो
काहीच न बोलला,
एक नजर बघुन तिच्याकडे
शुन्यात बघत तसाच गप्प राहीला...
अल्लडपणे खेळत होती
हात त्याचा घेऊन हाती,
निरागस त्याचे डोळे वाचण्याचे
प्रयत्न ती करत होती...
भाव विरहीत चेहरा त्याचा
असा तिने कधीच पाहीला नव्हता,
दिवसाला मागे टाकत शांत पावलाने
येत होती हळुच रात्र आता...
वेळेचा भान ठेऊन उठला तो
घाईत बोलतच तेथुन,
शेवटची ही भेट तुझी ठेवेल
ह्रदयात मी अशीच जपुन...
जीवाच्या या ओढीस "आखेरची भेट "
आशा शब्दात त्याने गोवली,
डोळ्यात आश्रु घेऊन ती
तशीच पहात उभी राहीली....
हात पुढे करुन थांबवत होती
दुर दुर जाणार्या त्या सावलीला,
मग स्वत:शीच बडबडली
खुप काही सांगायच होत रे तुला...
प्रेमाला माझ्या जाणुन घेणं
का जमलं नाही आजपर्यंत तुला?
फक्त सांगायचं होतं एवढचं
कायमचीच सोबत तुझी हवी मला.....
कायमचीच सोबत तुझी हवी मला.....

BẠN ĐANG ĐỌC
मराठी कवीता
Thơ caप्रेम, विरह, निसर्ग, पाऊस, समाज,काही न विचार केलेल्या गोष्टी या सगळ्यांना कवितेच्या रुपात मांडण्याचा एक निरागस प्रयत्न...