आज आयुष्य इतकं विखुरलं आहे सर्वाचं की,
कळत नाहीये जीवनाचा खेळ कसा मांडावा..?
प्रत्येकांनी आपले वेगळे असे मार्ग निवडले आहेत ,
उमजतच नाहीये हा मनातला आनंद कोणत्या मार्गावर सांडावा...?
परीवार या शब्दात जाणवणारा हर्ष ही आता नाहीसा झाला आहे,
सांगेल कुणी तुटलेल्या या नात्यानां कोणत्या धाग्याचां जोड द्यावा??
दोन क्षण थांबुन मागे वळुन बघण्याचा धाडस केला मी ही,
पण डोळ्यात अश्रुनीं नकळत गर्दी केली आठवुन मायेचा तो विसावा.....
देवाकडे जी प्रार्थना सर्वांच्या सुखासाठी नेहमी असायची,
जोडतात आज ही हात सर्वजण फक्त यासाठी की पैशाचा पाऊस पडावा....
सतत धाव घेणार्या या पिढीकडे बघुन मन माझं हसतं,
मग वाटतं पैसे देउन बिचार्यांना हा आनंद कुठेतरी सापडावा....
अर्त मनांने साद घालुन दोन क्षण विसावा घेण्यास सांगावेसे वाटते,
उद्यासाठी तरतुद हवी असेल तर म्हणतात थांबण्याचा नादच सोडावा
जी नाती जपावी तुझं जवळ राहवी म्हणुन तु रात्रंदिवस मरतोय,
कधी जाणवत नाही का तुला त्या नात्यातील दुरावा??
कमवणे पैसा यात काहीच गैर नाही हे सर्वानांच माहीत आहे,
ज्यांच्यासाठी कमवतो सोबत त्यांच्या एक क्षण तरी जगुण पहावा..
शोध पुन्हा तो मायेचा हात आणि परीवाराची ती आतुट जोड,
मग कुठे कमविणे आणि जगणे या शब्दाचा अर्थ पुर्ण व्हावा...
>

ESTÁS LEYENDO
मराठी कवीता
Poesíaप्रेम, विरह, निसर्ग, पाऊस, समाज,काही न विचार केलेल्या गोष्टी या सगळ्यांना कवितेच्या रुपात मांडण्याचा एक निरागस प्रयत्न...