16.सांग ना सख्या..

76 4 5
                                    

एक प्रवास ,एकच ध्यास,

तुझ्यात अडकून माझा श्वास 

तुझ्या सवे जगायचे

सोडून अनेक माझ्या वाटा, सोबत तुझ्या चालायचे...


एक आस, एकच भास, 

जोडून मन तुझ्या मनास,

स्वप्नीं तुला पहायचे

नको हा एकटेपणा आता, सोबत तुझ्याच रहायचे..


एक कुशी ,एकच खुशी,

वाटते आता जी हवी-हवीशी,

नको आता ना म्हणायचे

प्रत्येक रात्र कुशीत तुझ्या, मला आहे झोपायचे....


एक साथ , एकच हात, 

आता हवा फक्त तुझाच सहवास, 

तुझ्यावीना ना जगायचे

सांग ना सख्या प्रेमाचे हे गीत, सोबत कधी गायचे..


(कवीता आवडली तर लाईक , वोट आणि सगळ्यात  महत्वाची तुमची प्रतीक्रीया  कमेंटद्वारा नक्की कळुद्या)

धन्यवाद..


मराठी कवीताDonde viven las historias. Descúbrelo ahora