जीवनाच्या या प्रवासामध्ये एकच मार्ग होता माझा,
निरंतर करत होते प्रवास पण दिसला तो नागमोडी रस्ता कोणाचा?
विचार करत क्षणभर मी थांबुन गेली होती तिथेच,
सांगुन माझ्या मार्गाला चल तु पुढे ,मागुन मी येतेच..
शोधत होती नजर माझी मार्गावर त्या कुणी दिसेल मला,
मी तर स्तब्ध होउन गेले जेव्हा पाहीले या नजरेने त्याला.
चेहरा गोरा,राजसं डोळे,देखण्या राजकुमाराची छबी होती,
एक एक पाऊल टाकुन पुढे येत होता,अन मी तिथे तशीच उभी होती
येऊन असा अलगद पुढे माझ्या तो उभा टाकला,
हाताने बंद करुन माझे डोळे काही तरीच बडबडून गेला
जात होता पुढे तो फिरुन एक स्मीत हास्य देऊन गेला,
त्याच्या हस्याने कळलेच नाही कधी मनी माझ्या स्वप्न येऊन थिजला.
सोबत त्याच्या चालण्याची मनात माझ्या इच्छा झाली,
पण संगतीत आहे त्याच्या कुणीतरी हळुच मज चाहुल लागली..
स्वप्नांचे माझ्या तुकडे झाले चार अन आकाशात या विरुन गेले,
विचारात मी या असताना मन माझे भरुन आले..
अश्रु असे वाहता असता एकदम मन भानावार आले,
स्वप्नांमधुन बाहेर येऊन जीवनांच्या मागच्या पानांवर आले..
मार्ग माझा तिथेच होता मी ही तशीच चालत होती,
स्वप्नं होते की सत्य हे मनाशीच मी बोलत होती

أنت تقرأ
मराठी कवीता
شِعرप्रेम, विरह, निसर्ग, पाऊस, समाज,काही न विचार केलेल्या गोष्टी या सगळ्यांना कवितेच्या रुपात मांडण्याचा एक निरागस प्रयत्न...