8. प्रेम...

116 4 4
                                    


सगळे मला नेहमीच विचारतात,

प्रेम न करता कवीता कशी लिहीतेस?? 

जे ह्रदयात कधी अनुभवलंच नाही

ते शब्दात कसं मांडतेस??



सांगावसं वाटतयं त्यांना केलयं 

मी ही कोणावर तरी प्रेम अगदी जिवापाड, 

जपुन ठेवलं आहे आज ही त्याला 

या ओल्या पापण्यांच्या आड..



प्रेमाचा हा कोमल अनुभव मला 

कधीच जगता नाही आलं, 

काही तत्वांशी सांगड घालताना 

त्याला आपलंस करता नाही आलं...


मनाच्या या पिंजर्‍यात कैद 

त्याला करुन ठेवलं होतं, 

फक्त माझंच असताना ही माझ्या 

डोळ्यापुढे ते पाखरु उडुन गेलं होतं..


माझ्या एकटी शिवाय या भावना 

मी कोणालाचं समजु दिल्या नाहीत, 

लिहुन ठेवलं आहे आज ही त्याला

अगदी तसचं मनाच्या या वहीत... 


प्रेम कधी व्यक्त केलं नाही पण 

ते अनुभवलं अगदी मनापासुन, 

सहन केलं आहे ते दु:ख ही

नकळत त्याच्या विरहातुन....   


कोणासाठी तरी हात माझ्या 

नशीबाचा मी धरला नाही, 

दु:खाचा हा सुरु झालेला खेळ मात्र 

आता कधीच सरणारं नाही... 



निस्वार्थ माझ्या प्रेमाची एक झलक 

आज ही माझ्या नजरेत दिसते, 

आज ही दिवसाची एक प्रार्थना 

त्याच्या सुखासाठी मात्र नक्की असते.... 

मराठी कवीताDonde viven las historias. Descúbrelo ahora