15.ढोंग....

61 5 0
                                    


शब्दांशी खेळणं आता 

रोजचचं झालं आहे, 

कधी स्वत:शी खरं बोलण्याची 

हिम्मत करावीशी वाटते.


रोज स्वत:ला आनंदाची भुल देऊन 

चालण्यास भाग पाडते,

आणि रोज अशीच स्वत:ला

न जाने मी का फसवते?


सकाळची सुरूवात आणि त्या 

दिवसाचा तो शेवट असाच होतो, 

मन माझं बघुन मावळत्या 

संधेकडे, उदासीनतेत हसते.


कळते त्याला ही माझी खोट्या 

दुनियेत जगण्याची  धावपळ, 

रोज धावून सोबत माझ्या

मन मलाच फक्त बघत असते.


कुठे धावतीय याचे किंचतही नसले

भान तरी थांबता येत नाही,

सुखी आयुष्य करण्याचा हा 

ढोंग मी नेहमीच करते....

ढोंग मी नेहमीच करते....  


कवीता अवडली तर प्लीज वोट आणि कमेंट करायला विसरु नका...

मराठी कवीताWhere stories live. Discover now