आॅडी क्यू सेव्हनमधे बसलेली ऊमा झेक रिपब्लिक मधल्या एका क्लाएंटच्या डील संदर्भातले पेपर्स वाचत होती. तीच्या सोबत पूढे ड्रायव्हर आणि तीचा पी.ए. दोघे होते. ते काॅन्फरन्सची अरेंजमेंट करण्यासाठी चालले होते.
कालच भारतात येऊन तीने ते पेपर्स लिगल अॅडव्हाईजर कडून बनवून घेतले होते. दोनशे करोडची डिल तीने एकटीने जाऊन क्रॅक केली होती. क्षितीजला केवढा आनंद झाला होता. गेल्या सात वर्षांत त्यांच्या अॅपेक्स टेक्नोलाॅजिज् ने पांगत जाऊन मोठ्या ग्रूपचे रूप धारण केले होते. ऊमाने स्वबळावर क्रॅक केलेली पहीली डिल ती पण ईतकी मोठी.
घरी आल्या आल्या क्षितीजने तीला मिठीत भरत चूंबणाने तीचे तोंड गोड केले होते. पंधरा दिवस क्षितीज आणि त्यांच्या तीन वर्षांच्या जूळ्या मूलांपासून लांब राहील्यामूळे ऊमापण कासावीस झाली होती. तीघांनापण मिठीत भरत तीने आधी स्वतःची मानसिक क्षूधा शांत केली होती.
डील करून झाल्यावर तीला एक टीम मॅनेजर्सची मिटींग घेऊन प्राॅजेक्ट स्टार्ट करण्यासाठीच्या स्ट्रॅटेजी गाईडलाईन्स बनवून रिसोर्सेस वैगरेंचीपण अरेंजमेंट पाहायची होती. पण त्यासाठी तीला आॅफिसमधे ती मिटींग घेण्यापेक्षा बाहेर कूठल्यातरी नव्या फ्रेश वातावरणातल्या रिझाॅर्टमधे ती घ्यावी वाटली. म्हणजे नवीन कामासाठी जास्त ऊत्साहवर्धक वातावरणाने सकारात्मक ऊर्जा मिळावी असे तीला वाटले. तीने तसे तीच्या मॅनेजरला सांगितले. त्याने शहराबाहेरच्या एक दोन रिझाॅर्ट्सची नावे सूचवली.
त्यातले एक नाव होते. लावण्या रिझाॅर्ट. अजय देशमूख त्याचे मालक होते.
"अजय देशमूख? म्हणजे नंदीनीचे मिस्टर." तीच्या मनात ती म्हणाली.
"लावण्या रिझाॅर्ट्स!" ऊमा म्हणाली.
"मॅडम यांना काॅल करू का?" मॅनेजर म्हणाला.
"अं? काॅल... अम्म्.. नाही नको. रादर आय वील प्रेफर टू व्हिजीट ईट मायसेल्फ." ती काही आठवून हसत म्हणाली.
आज ती तिकडेच निघाली होती.
नंदीनी. नंदू. तीची एकेकाळची मैत्रीण, सखी, बहीणीपेक्षा जवळची. तीला लग्नापूर्वीचा तो दिवस आठवला.
"ऊमा!!.. काय ऐकतीये मी? नंदीनी ऊमाच्या रूममधे येत तीला म्हणाली.
"काय? ओह... ते माझं लग्न ठरलं हेच ना? अगं तूला काल रात्रीच काॅल करणार होते मी. पण बिझी लागत होता. तू जिजूंशी बोलण्यात बिझी होतीस आय गेस." ऊमाने सांगितले.
"होका? पण यार तू अचानक का ठरवलंस?" नंदीनीने विचारले.
"अगं माझी चूलत बहीण आहे ना लास्ट ईयर जीचं लग्न झालं? तीने आणलय स्थळ. काल दूपारी त्यांचा काॅल आला. संध्याकाळी बघून गेले आणि पसंती पण झाली. तीच्या नवर्याच्या नात्यातला भाऊ लागतो मुलगा. क्षितीज नाव आहे त्याचं" ती म्हणाली.
"पण ऊमा तूला पसंत आहे हे स्थळ?" नंदीनी जरा खोल स्वरात विचारत होती. ऊमाला काहीशी शंका आली.
"आॅफकोर्स यार. मला छान वाटले ते. एका सर्ह्विस ईंडस्ट्रीत जाॅबला आहेत सेटल्ड आहेत. पण राहायचं नाहीये त्यांना तसं सेटल्ड. असं त्यांनी पहील्या भेटीतच सांगितलं आणि मला नेमकं त्यांच ते वाक्य आवडलं." ऊमा सांगत होती.
"काय? म्हणजे मी नाही समजले." नंदीनी म्हणाली.
"अगं स्वतःचा स्टार्टअप सूरू करायचाय त्यांना. त्यांनी सजेस्ट केले, कि ते आणि आम्ही जेवढा खर्च लग्नावर करणार होतो. तो खर्च दोघांच्याही नावे बँकमधे टाकायचा आणि नंतर स्टार्टअप सूरू करताना आमच्या दोघांच्याही नावे ते कंपनी सूरू करणार." ऊमाने सांगितले.
"बिझनेस? अगंपण जाॅब आहे ना? बिझिनेस ऊभा करता करता तूमचा स्टार्टींगचा काळ कसला हेक्टीक जाईल. देव न करो, पण हे नाही चाललं तर पैशाचा पण लाॅस. ऐक ना ऊमा मला तूला काही सांगायचय." नंदीनी म्हणाली.
"अगं मला त्यांच्या बोलण्यावरून त्यांचा आत्मविश्वास जाणवला. मला नाही वाटत ते फेल होतील. शिवाय मला त्यांनी बिझनेसमधे सूरूवातीपासून ईन्वाॅल्व्ह करायचं ठरवलंय म्हणजे आम्ही एकत्रच काम करणार. ऊलट एकत्र जास्तीत जास्त टाईम घालवू शकू आम्ही. बरं हे सगळं ठिके तू काय सांगणार होतीस?" ऊमाने स्पष्टीकरण दिले आणि तीला विचारले.
"ऊमा तू माझ्या बहीणीपेक्षापण माझ्याशी क्लोज आहेस. म्हणून जेव्हा तूझ्या जिजूंनी मला तूझ्याबद्दल त्यांच्या चूलत भावाबद्दल विचारले, तेव्हा मी त्यांना तूझ्याकडून होकार देऊन टाकला. अगं त्या भावोजींनी तूला माझ्या साखरपूड्यात पाहीलं होतं त्यांना तू खूप आवडलीस. खूप रिच लोक आहेत ते. अगदी माझ्या सासरकडच्यांसारखेच. तूला राणीसारखं ठेवतील. काहीही करावं लागणार नाही. कसलीच वणवण नाही. हवं ते लगेच मिळेल. तू यांना नकार कळव ना प्लीज. आपणही आयूष्यभर जवळजवळ असू." नंदीनी तीला म्हणाली.
"नंदू! अगं एवढी मोठी गोष्ट तू परस्पर कशी ठरवू शकतेस. माझ्या जोडीदाराबद्दल माझी काही ठाम मते आहेत. क्षितीज मला अगदी परफेक्ट वाटतात त्याबाबतीत. एकदम अल्फा मेल. सगळं स्वतःच्या जिद्दीवर मिळवणारे. मला पण सक्षम बनवणारे. बापजाद्यांच्या ईस्टेटीवर कोणीही बसून आयत्या पीठावर रेघोट्या ओढेल. पण स्वतः श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहून जोडीदारालाही त्यात सहभागी करून घेणारा पूरूष मला जास्त ऊजवा वाटतो. क्षितीज मला मनापासून भावले ते याच कारणामूळे. तू त्यांना भेटशील तर तूलापण छान वाटतील ते." ऊमाने तीला खोडत सांगितले.
"ऊमा काय बोलतीयेस अगं? आयत्या पीठावर रेघोट्या वैगरे. मी तूला त्या माणसाच्या वेडापाई होरपळावं लागू नये म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करतीये. नाही सक्सेस झालं तर रडत बसावं लागेल. तूझं भलं कशात आहे तूला कळत नाहीये. चांगलं सूखासीन आयूष्य घालवायला मिळतय ते सोडून कसले नसते ऊपद्व्याप करत बसणारेस. ऐक माझं आलेली संधी घालवू नकोस." नंदीनी वैतागून तीला म्हणाली.
"नंदू माझा निर्णय झालाय. तू ऊशीर केलायस. पूढच्या महीन्यात साखरपूडा आणि दोन महीण्यांनी लग्न आहे. तूझं लग्न पूढच्या आठवड्यात आहे. तेव्हा नंतर माझ्या तयारीसाठी तू मला हवी. जशी मी तूला सजवणारे तशीच तू पण मला सजव तूझ्या हाताने." ऊमी तीला म्हणाली.
"ऊमा माझं ऐकणारच नाहीयेस का तू?" नंदीनीने निर्वाणीचे विचारले.
"नंदू हे म्हणजे काही दूकानातले शाॅपिंग नाहीये. "हा ड्रेस नको घेऊ तो घे" वाली. आयूष्य ज्या व्यक्तीसोबत काढायचय त्याचा विचार करताना मी माझ्या कतृत्वालापण न्याय मिळणारा निर्णय घेतीये. मला पण स्वतः काहीतरी बनायचय. क्षितीज अगदी त्याच विचाराचे आहेत." ऊमा निर्धाराने म्हणाली.
"म्हणजे माझ्या शब्दाची किंमत नाही तूला? कालचा कोण आलेला माणूस तूला महत्त्वाचा वाटतोय. जाऊ देत तूला भिकेचे डोहाळेच लागलेत तर मी तरी काय करू? परत रडत येऊ नकोस माझी मदत लागली तर." नंदीनी फणकार्याने म्हणाली. तीला संताप आला होता.
"अगं अशी काय रागावतीयेस? लग्नाबाबतीत मी माझ्या आईवडीलांना पण माझी मते सांगितली होती. क्षितीज अगदी अनूरूप आहेत मला." ऊमा शांतपणे म्हणाली.
"बस तूझा अनूरूप घेऊन. जाते मी." असे चिडून बोलून नंदीनी निघून गेली.
तेव्हापासून ते आजचा दिवस नंदीनीने ऊमाशी संबंधच तोडून टाकले. ती खूपच आततायीपणाने वागली असे खूद्द तीच्या आईवडीलांचेही मत होते. पण ऊमा तीच्यावर रागावली नाही. जेव्हा लावण्या रिझाॅर्ट्सचे नाव तीच्यासमोर आले तेव्हा तीला राहावले नाही. ती भेटायला निघाली. तीला माहीत होते कि रिझाॅट्सच्या मागेच देशमूखांचा बंगला आहे. तिथे मालकिणबाईंकडून स्वागत कसे होईल याची तीला चिंताच होती. पण नाही नीट झाले तर किमान आपल्याकडून तीच्या नवर्याला थोडा बिझनेस मिळेल असा सद्हेतू तीच्या मनात आला.
रिझाॅर्ट आले. ती गाडीतून ऊतरून आत गेली. आवार प्रशस्त होते. नंदीनीसोबत एकदा ती ईथे आली होती. तेव्हापासून थोडाफार बदल झाला होता. पण त्यापेक्षा जास्त बदल त्यावेळच्या ऊमामधे आणि आताच्या ऊमामधे झाला होता. आॅडीमधून ऊतरलेल्या मॅडम कोण आहेत हे पाहण्यासाठी रिझाॅर्टचा मॅनेजर तिथे आला. तीचा दिमाख पाहून आणि त्याने तीला विचारल्यावर त्याला कळाले कि त्यांच्यासाठी मोठी डिल आहे. ऊमा पंच्याहत्तर ते शंभर लोकांच्या पंधरा दिवसांच्या काॅन्फरन्स मीटसाठी रिझाॅर्टचा काॅन्फरन्स हाॅल आणि डायनिंग हाॅल बूक करणार होती. मॅनेजरने तीला काॅन्फरन्स रूम आणि ईतर सर्व काही दाखवले. ऊमाला ठिक वाटले. पूढची बोलणी करण्यासाठी तीला मालकांशी बोलावे लागेल असे त्याने सांगितले. त्याने काॅल करून त्याचा मालकाला डिल बद्दल सांगितले. श्री. अजय देशमूख पूढच्या पाचच मिनीटांत हजर झाले.
बिझनेस सूटमधल्या ऊमाला अर्थात त्याने ओळखलेच नाही.
"नमस्कार मॅडम." तो हात जोडून ऊमाला म्हणाला. त्याचे ते पोट वाढलेले, थोडे केस मागे गेलेले आणि अकाली प्रौढत्व आलेले ध्यान पाहून ऊमाला तीच्या क्षितीजबद्दल खूपच अभिमान वाटला.
मनातल्या मनात तीने स्कोअरची नोंद केली. "नंदिनी झिरो ऊमा वन."
"नमस्कार. तूम्ही मला ओळखलं नाही वाटतं?" ऊमा म्हणाली.
अजय थोडा निरखून ओळखीची काही खूण दिसते का पाहू लागला. पण तीची एकदम मापातली फिगर. खाली असणार्या स्मूथ फरशीवर दोन ईंचांचे हाय हिल्स घालून सूध्दा सराईत पणे वावरणारी. ग्रे कलरच्या स्कर्टमधे असलेली एवढी पाॅलिश्ड, वेल मॅनर्ड आणि श्रीमंत स्त्री त्याच्या सर्कलमधे कोणीही नव्हती.
"नाही हो. आपण भेटलोय का या आधी कधी?" त्याने गोंधळून विचारले.
"आॅफकोर्स! मी ऊमा! नंदीनीची मैत्रीण. आठवले?" तीने गाॅगल काढत विचारले.
"अं?!! ऊमा?? ओ होहोहो... आठवले .. किती बदलला आहात तूम्ही? मी खरेच नाही ओळखले. साॅरी बरं का?
आणि आता असं अगदी व्यावसायिक रित्या तूमचं स्वागत करणं बरोबर नाही. घरी चला नं ईथे मागेच आहे घर आमचं." तो चपापला होता. थोडं आदरयूक्त संभाषण ठेवत त्याने तीच्याशी बोलायला सूरूवात केली.
"ओह कमाॅन जीजू! अहो जाहो करून काय बोलता? रिलॅक्स. चला मी पण खूप दिवस झाले नंदीनीला भेटले नाहीये." ती म्हणाली आणि अजयसोबत चालू लागली.
अजय तीला घेऊन रिझाॅर्टच्या मागे असलेल्या त्यांच्या बंगल्यावर आला. बंगला ऊमाला माहीत होता.
"नंदीनी ए नंदीनी." त्याने हाक मारली.
एका कोपर्यातल्या आरामखूर्चीवर नंदीनीची सासू बसली होती.
"काय रे? तीला का हाका मारतोयस?" तीने विचारले.
"अगं पाहूणे आलेत." तो म्हणाला.
"मग बसव ना पाहूण्यांना. तीला का हाका मारतोय? पाहूण्यांना समोर सूना नाही जात देशमूखांच्या समजतं ना तूला?" ती म्हणाली.
"अगं तीचीच मैत्रीण आली आहे." अजय म्हणाला.
"होका. मग वर पाठव नं तीला. तू का एवढा ऊड्या मारत सांगायला आलायस?" ती म्हणाली.
"अगं आई काय बोलतेस तू पण..." अजय गोरामोरा झाला होता. तो ऊमाकडे वळला.
"मॅडम... म्हणजे... ऊमा... ऊमा मॅडम.. ती वरती आहे. भेटता का तूम्ही जाऊन? कि बोलावू तीला खाली." अजय खजिलपणे म्हणाला. त्याला तीच्या क्लासीनेसचे दडपण आले होते.
तीला त्याच्या धडपडीचे हसू येत होते. पैशाची, श्रीमंतीची पावरच वेगळी. तीला जाणवत होते. आठ एक वर्षांपूर्वी ती स्वतः नंदीनीचे वैभव बघून दिपली होती. आता तीला त्यात साधेपणा दिसत होता. तीच्यालेखी देशमूख फार काही नव्हते. नंदीनीच्या सूखासीन, आरामदायी आयूष्याची एकंदरीत ऊमाला कल्पना आली. "नंदीनी झिरो ऊमा टू" परत तिच्या मनात स्कोअर झाला.
क्षितीजचा घरावरचा होल्ड त्याच्या आईवडीलांसमोर स्वतःचे म्हणने ठामपणे मांडण्याची सवय. गोष्ट योग्य असेल तर बिनधास्तपणे ती ठामपणे स्विकारण्याची धमक. त्याच्या तूलनेत हा अजय किती नेभळट आहे.
अजय देशमूख घरच्यांच्या दबावाखाली राहात होता. म्हणजे... नंदीनीपण? ती आता निश्चितच ऊमाला झिडकारू शकणार नाही याचा ऊमाला अंदाज आला होता. कारण हे वातावरण नंदीनीला आनंदी ठेवणारे निश्चितच नव्हते.
अजयने हाताने तीला रस्ता दाखवला. "ईकडून वरती जा. आपण तूमचे बोलणे झाले कि बाकिच्या डिल बद्दल बोलू."
"जीजू एक काम करता का? माझे मॅनेजर सोबत आले आहेत तूम्ही त्यांच्याशी सगळं ठरवा. मी नंदीनीबरोबरच वेळ घालवायचा म्हणते." तीच्या स्पष्ट बोलण्यावर अजयने ठिके म्हणत. रिझाॅर्टचा रस्ता धरला.
"विकेट. नंदीनी झिरो ऊमा थ्री." पाठमोर्या अजय कडे पाहात ती हळूच म्हणाली आणि हसली.
ऊमा जीना चढून वर आली. कितीही मोठी झालेली असली आणि व्यावसायिक असली तरी बालपण ते तारूण्याच्या प्रवासात साथ देणार्या तीच्या या नात्याबाबत ती खूप हळवी होती. नंदीनी कशीही वागली तरी ऊमाने राग धरला नव्हता. आता ईतक्या दिवसांनी नंदीनीचीची रिएक्शन काय असेल या विचाराने तीला थोडी धाकधूक वाटतच होती.
ऊमा चालत एका बेडरूमपाशी आली. आत डोकावले. साडी घातलेली. तशीच ऊजळ चेहर्याची. थोडीशी शरिराने प्रौढ झालेली नंदीनी बेडवर असलेला कपड्यांचा पसारा आवरण्यात गूंतली होती.
ऊमाने दारावर टकटक केली.
नंदीनी थोडी दचकली. तीची नजर ऊमावर गेली. ऊमाने काही क्षणच तीचा चेहरा निरखला. डोळे काहीसे खोल गेलेले. पूर्वी असलेले तेज आता नव्हते. कसल्यातरी विवंचनेने चेहरा आक्रसला होता. तीच्या डोळ्यात ऊमाला स्वतःबद्दल ओळख दिसत नव्हती.
"नंदू?!!... मी... ऊमा... अगं.. ओळखलं नाहीस?" ऊमा म्हणाली.
नंदीनीच्या हातातला कपडा खाली पडला.
"ऊ..ऊ..ऊमा? तू?" ती धावत पळत ऊमा जवळ आली आणि भसकन तीच्या मिठीत शिरली.
डोळ्यांत अश्रूंचा पूर आला होता. आत खूप काही साचलेले होते. त्याचा निचरा होण्यासाठी अश्रूंनी वाट मोकळी केली होती. नंदीनी तीला घट्ट जखडून रडत होती. ऊमा कणखर झालेली असल्यामूळे तीला ऊमाळा दाटून आला पण अगदी नंदीनी सारखी ती रडू शकली नाही. मैत्रिणीने स्विकारल्याचा आनंद मात्र भरपूर झाला होता.
YOU ARE READING
दान
FantasyA wife commits sin and drag her husband with her friend in that mud... still felt guilty.