" हे माझे मिस्टर आणि आमच्या अॅपेक्स ग्रूपचे सर्वेसर्वा क्षितीज." ऊमा अजय आणि नंदीनीला क्षितीजला भेटवत म्हणाली.
"नमस्ते सर." अजय म्हणाला.
"हे अजय काॅल मी क्षितीज. डोण्ट बाॅदर" क्षितीज त्याचा हात हातात घेत म्हणाला. अजय समोर क्षितीज भलताच आडदांड वाटत होता. नंतर त्याने नंदीनीकडे वळत तीचा हात हातात घेण्यासाठी पूढे केला. नंदीनीने पण अभावितपणे हात पूढे केला.
"हाय नंदीनी. प्लेजर टू मिट यू." नंदीनी लाजत हसत होती कि हसत लाजत होती तीलाच कळले नाही. पण तीच्या तोंडून शब्द फूटत नव्हता. क्षितीजच्या व्यक्तीमत्त्वाने तीला भारले होते. काॅन्फरन्सचा आज पहीला दिवस होता. त्यासाठी दोघेही थोडे लवकर रिझाॅर्टवर आले होते. सर्व अरेंजमेंट्स दाखवून झाल्यावर त्यांना अजयने चहा साठी घरी बोलावले.
नंदीनीने त्या दिवशी क्षितीजला पहील्यांदा समोरासमोर पाहीले. त्याची ऊंची. प्रमाणबध्द पण दणकट शरिरयष्टी. बोलताना येणारा गंभीर पण भरीव आवाज. चर्येवरची शांतता. चालण्या बोलण्यातला रूबाब. क्षितीज एक जातीवंत नर होता. नंदीनीची नजर सतत क्षितीजकडे चोरट्यासारखी वळत होती. क्षितीज नाॅर्मल होता. नंदीनी भलेही सूंदर असली तरी तो सूंदर स्त्री दिसली कि तीच्याबद्दल कामुक भावना तयार करणार्यातला नव्हता.
नंदीनीची नजर ऊमाने ओळखली. बोलताना क्षितीजची नजर तीच्यावर नसेल तरच ती त्याच्याकडे पाहात होती. असं आपण तेव्हाच करतो जेव्हा आपल्याला नजरेच्या गूंत्याची भिती वाटत असते. कि न जाणो समोरच्याला आपल्या नजरेतून मनातले भाव कळले तर? ऊमाने नंदीनीच्या नजरेचा पाठलाग करत हे ताडलेच. अजयकडे पाहता नंदीनीच्या दृष्टीने क्षितीज खूपच ऊमदा होता. पण क्षितीज मात्र निर्लेप होता. तो सभ्यपणे सर्वांशी नजर मिळवत त्याच्या सवयी प्रमाणे बोलत होता. ईजी राहणे त्याची सवय होती.
"माय ईनोसंट जंटलमन हजबंड." ऊमा मनात म्हणाली. तीला माहीत होते क्षितीजकडे स्त्रीया खेचल्या जातात पण त्याचा ईंटरेस्ट संसार, काम आणि ऊमा यातच होता.
त्यात परवाच्या रात्री पडलेल्या स्वप्नामूळे न जाणो का नकळतपणे ऊमाला असे वाटत होते कि, नंदीनीच्या दूःखाचा तोडगा क्षितीजशी कनेक्टेड आहे.
ESTÁS LEYENDO
दान
FantasíaA wife commits sin and drag her husband with her friend in that mud... still felt guilty.