दान - Part 8

7.9K 27 7
                                    


"दोनशे करोडची डिल. या मूर्खाच्या अतिहूशारीने वाया जाऊ द्यावी कि हा म्हणतोय त्याप्रमाणे एकदा याचे म्हणने ऐकावे?" ऊमा संभ्रमित होती.

निर्णय घ्यायला तसा एका मिनीटात घेता येतो. पण परिणाम एका मिनीटाचे नसतात. ते दूरगामी असतात. ऊमाला सध्या बिझनेस हातचा गेला तर काय? याच्या परिणामाची चिंता जास्त होती. दोघांनी बनवलेले साम्राज्य वाढवण्याची जबाबदारीपण दोघांचीच होती.

"मूरूगन. यू आर क्राॅसिंग द लाईन्स." ती म्हणाली.

"नो. आय एम टॅमिंग द अपाॅर्च्यूनीटी. आल्यापासून नजर आहे माझी तूमच्यावर ऊमाजी. तूमचा निर्णय लवकर कळवा. सेकंड रँक वाले ईतर बेनेफिट्स सहीत रेडी आहेत. बट यू आर वर्थ दॅन दॅट आॅफर म्हणून मी तूमच्याशी बोलतोय." मूरूगन म्हणाला.

ऊमाने मोठा श्वास भरला. काही क्षण तीने डोळे मिटले. क्षितीजचा चेहरा डोळ्यासमोर आला. त्याचा किती विश्वास आहे आपल्यावर. दोन्ही बाबतीत. मी डिल मिळवणारच आणि मी त्याच्याशी आयूष्यभर लाॅयल राहणारच. जेव्हा अशी परिस्थिती येते कि माणसाला एक काहीतरी निवडावे लागते. तेव्हा त्याचे नैतिक अधःपतन होणे हा खरेतर त्याच्यावर अन्याय आहे. ह्या कंडिशनला मी कोणताही निर्णय घेतला तरी तो माझी क्षमता सिद्ध करणार आहे. मग जे जगाला दिसेल तेच मी करायला हवे. माझी डिल वाचवणे माझी प्रायोरिटी असायला हवी.

"ऊमाजी... हॅलो?!" मूरूगन म्हणाला.

"अं... ह हो... आय मीन मी.. व्हाॅट शॅल आय से?" ती चाचरत होती.

"येस आॅर नो टू माय प्रपोजल." तो म्हणाला.

" मूरूगनजी आय रिअली वाँट्र दॅट डील. बट मेक शूअर नो वर्ड विल गो आऊट आॅफ धिस केबिन आणि मला अॅप्रूव्हल आधी हवं." ती मूरूगनला म्हणाली.

"पहीली गोष्ट. ह्यातला एकही शब्द बाहेर घाणार नाही. दूसरं असं. तूम्ही हे अप्रूव्हल अर्न करायचय. सो शो मी बेस्ट आॅफ यूअर्स अँड गेट द अप्रूव्हल बाय यूअर सेल्फ." तो ऊठला आणि केबिनच्या दाराकडे जात त्याने दार ऊघडले.
" मीट मी अॅट हाॅटेल "रॅडीसन ब्लू" अॅट सेव्हन फाॅर डिनर."

दानWhere stories live. Discover now