स्त्री...

8.3K 19 2
                                    


दिनुने घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 'टक टक' केले
आणि त्याच्याबरोबर त्याने बाहेरून आवाज दिला.

"बाईसाहेब , म्या हाय ...दूधाचं भांड घेऊन या जरा"

दिनूचा आवाज देऊन होताच दुसऱ्या मजल्यावरुन मालकीण बाईंचा आवाज ताबडतोब घरात घूमला.

"बंटी ..ये बंटी..दूधवाला दारावर आलाय बघ..जरा दूध घे बाळा.

पण बंटीकडुन काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

एकदा- दोनदा आवाज देऊनही बंटीचा काहीच आवाज आला नाही. तशा मालकीण बाई तडकुन खाली आल्या.

"ओफ्फ..ह्या मुलाला फक्त खायचं आणि झोपायचं माहिती आहे. एक काम धड ऐकत नाही. बाजूने ट्रेन जरी गेली तरी ह्याच्या डोळ्याच्या पापण्या काय उघडणार नाही"

त्याच्यानंतर काहीच मिनटात छण छण पैंजणीचा आवाज जिन्यावरुन खाली उतरताना आला.

रेश्मा...

रेश्मा इनामदार नाव होतं ह्यांच.

गोरा आणि गहूवर्णीय च्या मधला रंग, सुंदर गोल चेहरा, भरगच्च शरीर, मोठे बटबटीत डोळे, त्यावर कोरीव काम केलेल्या भुवया, दोन्ही हातात हिरवा चुडा खचखचून भरला होता. अध्ये मध्ये नक्षीदार सोन्याच्या बांगड्यानी हात शोभून दिसत होते.

स्वयंपाकघरात प्रवेश करत रेश्माने मोठेसं पातेलं हातात घेतलं आणि जलद गतीने तिची पावले मुख्य प्रवेशद्वारा कडे वळू लागली.

दरवाजा उघडला..

आणि..

पातेलं समोर ठेवून म्हणाली.

"हे घ्या दादा, लवकर भरा पातेलं, मला आधीच उशीर झालाय.

खाली बसून पातेलं घेण्यासाठी दिनूने आपला हात पुढे केला. त्याची नजर वर रेश्मा वर जाताच त्याचे डोळे चमकतात.

रेश्माचे सौन्दर्य काही लपण्यासारखे नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता उघड्या छातीने गाऊन वरच दिनूच्या समोर ती उभी होती. साधारणत: तिच्या कडुन अशी चुकी व्हायची नाही. पण घाईगडबडीत तिने आज काहीच विचार न करता दरवाजा उघडला होता. ३६ सी आकाराची तिची दोन्ही कबुतरे बाहेर येण्यास उतावीळ होत होती. गाऊनचा खोल गळ्यामुळे 'व्ही' शेप सारखी दिसणारी स्तनाची घऴ मंत्रमुग्ध करणारी होती.

स्त्री Where stories live. Discover now