स्त्री... भाग- १३

923 7 2
                                    

दोन दिवसानंतर एक शुभ मुहूर्त पाहून गुरुजीनी एक अनुष्ठानचा शुभारंभ केला. तसे त्यांना एक विशेष प्रकारचा यज्ञ करण्याची इच्छा होती. परंतु काही विचार करून आपल्या या अनुष्ठानाला एका भिन्न स्वरूपात करण्याचा निश्चिय केला.

जप करण्यासाठी त्यांनी चंदन ला आपल्या बाजूला बसवले. आणि स्वतःही जप करताना ध्यानस्थ झाले.

कुठल्याही प्रकारची विघ्न बाधा, विशेषतः अज्ञात अदृश्य कुठले आक्रमण झाल्यास त्यांचा सामना करण्यासाठी त्यांनी गोपू ला पहाऱ्यावर ठेवले.

गुरुजी आणि गोपू ने मिळून पर्णकुटीच्या चारी बाजूला मंत्रुन जागा पवित्र केली. पर्णकुटीच्या बाहेर धनंजय आणि आणखी गावातील १०-१२ लोकांना गुरुजीनी गस्त घालण्याचे आदेश दिले. जेणेकरून कोणी स्त्री, पुरुष वा जनावर गुरुजींच्या अनुष्ठानात विघ्न घालु नये.

धनंजय आणि इतरांवर कोणी वाईट शक्तीचे नियंत्रण होऊन कुठली हानी करू नये म्हणुन गुरुजींनी विशेष पर्याप्त व्यवस्था केली होती.

अनुष्ठान प्रारंभ करण्यात आले.

मंत्रजपाला सुरवात झाली.

पर्णकुटी मध्ये गुरुजी, गोपू आणि चंदन सतर्क झाले.

पर्णकुटीच्या बाहेर धनंजय आणि इतर गावकरी सुद्धा सावध झाले.

कधी कुठली शक्ती हावी होऊन लोकांना नुकसान पोहचवू नये ह्या गोष्टींची भीती तर होती. परंतु गुरुजींच्या शक्तीवर सर्वाची अगाध विश्वास आणि श्रद्धा होती.

गोपू अधिक सतर्क होता. परंतु बाहेरच्या लोकांसारखा भयभीत बिल्कुल नव्हता.

ह्या प्रकारच्या अनिष्ट शक्ती बरोबर तो आधी सुद्धा लढला होता. स्वभावाने तो एक धाडसी तरुण होता. गुरुजींच्या मार्गदर्शना खाली बऱ्याच तंत्र मंत्र विद्यामध्ये प्रारंगत होता.

गुरुजींच्या समोर पाच ताजे तवाने फळ ठेवले गेले होते.

काही वेळापूर्वीच त्यांना पाण्यानी स्वच्छ धुवून घेतले होते.

स्त्री Donde viven las historias. Descúbrelo ahora