स्त्री ... भाग - ३

3.2K 8 4
                                    

एक दिवस विठ्ठल काकांच्या घराबाहेर गर्दी जमा झाली होती. पूर्ण गावच जमा झाला होता. सर्वजण एकाच गोष्टीची चर्चा करत होते.

"लय वंगाळ झालंय राव..आता म्हातारा- म्हातारीचं काय व्हणार. पोरगं खूप चांगलं व्हतं. पण अचानक असं इपरीत काय घडलं असलं की पोराचा जीवच जावा"

तेव्हा सात जणांची पोलीसांची टीम घटना स्थळी दाखल झाली. " जागा द्या, जागा द्या ...बाजूला व्हा जरा" लोकांना दरडावत गर्दी पांगवत विठ्ठलकाकांच्या घराजवळ पोचले.

टीम चे नेतृत्व करणारा एक जाडा पोलीस ऑफिसर पोटाची ढेरी हलवत पुढे आला आणि घरातल्या एका सदस्याला त्याने विचारले.

"क्राईम कुठे झालाय? हे विठ्ठल काका कोण आहेत ?

त्या सदस्याच्या तोंडातुन एक शब्द फुटत नव्हता. चेहऱ्यावरचा रंग असा उडाला होता की त्याने जे दृश्य घरात पाहिले होते. त्याची कल्पना त्याने स्वप्नातही केली नव्हती. खुप भयानक होतं ते.

थरथरत्या हाताने त्याने विठ्ठलकाकाच्या घराकडे बोट केले.

पोलीस ऑफिसर ने त्याला डोळ्याने पुढे जाण्याचा इशारा केला. त्या सदस्याची घरात जाण्याची इच्छा नव्हती. पण त्या पोलीसाने खाकी आवाजात त्याला दम भरला तसा तो पुढे पुढे चालू लागला.

ऑफिसरने चार कर्मचाऱ्यांना गर्दी जवळ थांबवले. आणि दोन पोलिसवाल्यांना सोबत घेऊन तो माणसाच्या मागे मागे जाऊ लागला.

छोट्याश्या गल्लीतुन पुढे सरकत ते डाव्या बाजूला वळले. पुढे दहा पावले चालत जाऊन एका गोठ्याजवळ तो मनुष्य थांबला. गोठ्यात २ गाइ आणि ३ म्हशी बांधल्या होत्या. साफसफाई पूर्ण केली होती.

"हे कोणाचं घर आहे?" ऑफिसरने विचारले.

"विठ्ठल काकांचच हाय." तो सदस्य म्हणाला.

"तु कोण लागतो त्यांचा ?"

"म्या भाचा लागतो त्यांचा. चार दिस फिराया आलो व्हतो"

"हम्म, आज किती दिस झाले ? "

"जी दोनच दिस झालेत.

स्त्री Where stories live. Discover now