इन्स्पेक्टर विश्वास नांगरे जवळून पाहणी करत होते. आपल्या चौदा वर्षाच्या कारीकीर्दी मध्ये अश्या गुन्ह्यची नोंद नव्हती. त्यामुळे वरवर त्यांना काहीच अंदाज येत नव्हता की खरा हा प्रकार आहे तरी काय ?
समोर एक मृतदेह होता.
पण मृत्यू झाला तरी कसा ??
नैसर्गिक की अनैसर्गिक !!
मृत व्यक्तिच्या छातीवरचे गंभीर घाव त्याच्या मृत्यूचे कारण असु शकेल ??
त्याची अंगातली बनियान त्याच्या शरीराच्या विरुद्ध दिशला पडली आहे.
साधारणत: माणुस झोपताना बनियान काढुन आपल्या उशाशी ठेवतो.
चला हे पण मान्य आहे मृत व्यक्तीने तसे केलेही असेल. पण अजुनही बरेच प्रश्न उपस्थित होतातच आहेत त्याच काय ?
"सर खोली मध्ये संशयास्पद असे काहीच सापडले नाही"
नांगरे आपल्या विचारामध्ये मग्न असताना हवालदार श्यामने आपला रिपोर्ट सांगितला.
"तुला काय वाटतं श्याम..ह्याला कोणी आणि कसं मारलं असेल"
"काहीच समजत नाही आहे साहेब. खिडकीतून किंवा दरवाज्यातुन कोणी जबरदस्ती घुसून आलं असेल असे बिल्कुल दिसत नाही आहे. मग असा निष्कर्ष काढता येईल की मृत व्यक्ती ही खुण्याला ओळखत असावी. परंतु एका प्रश्नाचं उत्तर तर अनुत्तरीतच राहते."
"कोणत्या?"
"कोणी आलंच असेल तर घरच्यांना काहीच खबर कशी नाही. त्यांनी तर घरात कोणी आल्याला साफ नकार दिला आहे. त्यांच म्हणणं आहे काल एवढ्या पावसात आणि वादळात कोण कशाला घराबाहेर पडेल?"
"गुड ..व्हेरी गुड श्याम...नाईस क्वेश्चन. तू तुझं काम व्यवस्थित पार पाडलंयस आणि राहिला प्रश्न घरच्यांचा ...काल जर कोणी खरच आलं असेल तर घरचे खोटं बोलत आहेत. आणि हे लोक जर खरं बोलत असतील तर खुनी नक्कीच दुसऱ्या मार्गाने घरात घुसला असेल"
असे बोलुन नांगरे घरातल्या दोन खिडकीपैकी एका खिडकीकडे वळला. हळू हळू पावले टाकत तो खिडकीजवळ आला आणि खिडकीच्या तावदानाचे निरीक्षण करू लागला.