नमीता भाभी-डबल मजा भाग 4(अंतिम भाग)

2.3K 14 1
                                    

नमीता भाभी-डबल मजा  भाग  4(अंतिम भाग)

बरोबर नऊ वाजता राजने नमिताभाभीच्या बंगल्याची बेल मारली... ती बहुतेक आत तयारच होती कारण काही सेकंदातच दरवाजा उघडला गेला आणि हसतमुख नमिताभाभी दरवाज्यात दिसली... तिने लाल रंगाचा पारदर्शक गाऊन घातला होता आणि आतली काळी ब्रेसीयर आणि पॅन्टी त्यातून दिसत होती... तिच्या बंगल्याच्या दरवाज्याच्या बरोबर समोर एक स्क्रिन होती त्यामुळे रस्त्यावरून कोणाला दरवाजा डायरेक्ट दिसत नसे. त्यामुळे ती दरवाज्यात तशी उभी असलेली कोणाला दिसण्याची शक्यता नव्हती... राजला पाहून ती खूषीत म्हणाली,

"अरे दिप ये पटकन आत... किती वेळ मला असा बघत उभा रहाशील..."

तिने तसे म्हटल्यावर राज आत शिरला आणि नमिताभाभी दरवाजा लावायला गेली तर अचानक दिप तिच्या दारात उभा राहिला... त्याला पाहून तिला वाटले तो राज आहे तेव्हा ती आश्चर्याने दिपकडे पहायला लागली आणि आत शिरलेल्या राजकडे पहायला लागली... तिची गोंधळलेली मुद्रा पाहून राज हसला आणि तिला म्हणाला,

"नमिताभाभी... मी राजला सांगितले की तुम्ही खूप मस्त 'क्रिमवाला केक' आमच्यासाठी आणला आहे तेव्हा तो 'टेस्ट' करायला तो आला आहे... केक खाऊन तो निघून जाईल... आणि मी त्याला सांगितलेय की तुम्हाला तुमच्या बंगल्यातील अडगळीच्या खोलीतील काही सामान हलवायचेय तेव्हा मी तुमच्याकडे नंतर थांबणार आहे... बरोबर ना?" असे बोलून त्याने तिला हळूच डोळा मरला...

नमिताला कळेना हे काय चालले आहे पण तिला त्याच्या बोलण्याला दुजोरा देण्यावाचून गत्यंतर नव्हते तेव्हा ती कसेबसे हसली आणि दारातील 'राजला' म्हणाली,

"हं... हो... दिपला मी तसे म्हटले होते खरे... ये ना राज... आत ये..."

मग दिप आतमध्ये शिरला आणि नमिताने दरवाजा लावून घेतला... राज आणि दिप दोघेही जावू सोफ्यावर बसले आणि नमिताभाभीकडे पाहू लागले... दिपने लाल टि-शर्ट घातला होता आणि राजने निळा टि-शर्ट घातला होता त्यामुळे तिला कळत होते की कोण कोण होते ते... पण प्रत्यक्षात लाल टि-शर्टमध्ये होता तो राज होता आणि निळ्या टि-शर्टमध्ये होता तो दिप होता... 'दिपच्या' नजरेचे नमिताला काही वाटत नव्हते पण 'राजच्या' नजरेने तिला शरम वाटत होती...

नमिता भाभी डबल मजाOpowieści tętniące życiem. Odkryj je teraz