सहवास-पर्व तिन भाग एक

5.8K 7 0
                                    

शब्द ऑफिस मध्ये बसलेला होता. पावसाच्या धारा कोसळत होत्या. मात्र त्याच्या डोळ्यातील पाऊस त्याने धीर धरून पापणीआड थांबवून ठेवला होता.  

सर, अपूर्वाने क्नोक केलं आणि ती आत आली.
सर चहा सांगू का ?

नाही नको अपूर्वा .

काय झालं सर , का एवढे काळजीत
काही नाही गं . मला वाटते मला परत जावे लागेल
का पण? काही फॅमिली प्रॉब्लेम का ?
नाही , मी हरलोय आज !!
काय झालं सर ? तुम्ही हरू शकत नाही मला सांगा मनावरचा तान थोडा हलका करा. जर यु फील सो !!!

आपण जो फॅशन शो करणार होतो त्यासाठी सर्व आघाडीच्या मॉडेल्स ने नाही म्हटलंय आणि इव्हन कोणतीही मॉडेल हो म्हणत नाही आहे .
का ?
कारण त्याच दिवशी ग्लोबल फॅशन चा फॅशन शो आहे आणि ते सर्व तिकडे जाताहेत
ओह , मग आपण दिवस बदलवू
नाही कारण त्यानंतर आठ दिवसांनी आपल्याला आपले प्रॉडक्ट मार्केट मध्ये आणायचेत जर हा फॅशन शो नाही झाला तर आपले खूप नुकसान होईल
एक मिनिट सर पाऊस पडतोय आपण चहा घ्या काही तरी मार्ग निघेल. मी हरणाऱ्या शब्द शृंगारपुरे ला नाही पहिले आहे

अपूर्वा काळजीत होती पण तिला वेळ हवा होता विचार करायला. ती उठून जाणार तेवढ्यात मार्केटिंग हेड सखी आली आणि आणि ती शब्द ला म्हणाली .

सर मी जॉब सोडतेय. हे माझे राजीनामापत्र .

शब्द ने डोक्यावर हात ठेवला.
पण सखी तू !!!!
सर मला जिंकायला आवडते हरयाला नाही आणि आता ग्लोबल फॅशन जिंकतेय मी पण तिकडेच जाणार.
अगं पण आपण हरलो नाही आहे अपूर्वा लगेच म्हणाली
अपूर्वा तुला नाही कळणार , जर हा फॅशन शो नाही झाला तर आपण डबघाईला येऊ आणि हि कंपनी बंद पडेल. तुला सेक्रेटरी म्हणून कोणी पण जॉब देईल पण मला ? नाही मला जिंकायचं आहे
अपूर्वा तरी म्हणाली एक मिनिट सर चहा घ्या बघू आपण

सखी आणि अपूर्वा निघून गेली  आणि जात असताना शब्द त्यांना पाठमोरे बघत होता हताश होऊन. एक तिच्या विषयात मास्टर होती आणि तिने नांगी टाकली होती एक तिला काहीच माहित नव्हतं आणि ती पूर्ण अशाधारी होती .

आज वटसावित्री होती, आणि अपूर्वा आपल्या मराठमोळ्या पेहरावात आली होती .  चाळिशीतली अपूर्वा उंच सडपातळ, कंच हिरव्या कलरची नववारी  पैठणी  अपूर्वाला साजेशी दिसत होती त्यावर तिने  केसांचा जुडा घातला होता त्यावर नेट लावून त्याला आकारबद्ध केलं होतं. जूड्यावर मोगऱ्याचा गजरा पेरला होता . गळ्यात एकसरी मंगळसूत्र त्यावर  भरजरीत चापलाकंठी, मॅजेन्टा बॅकलेस ब्लॉऊज .. सपाट पोटावरच्या गोल मोठ्या खोलगट नाभिवरील नक्षीदार कंबरपट्टा , मऊशार बाहूंवरचा कातीव मोरपिशी बाजूबंद .. हातात हिरव्या बांगडया .. बोटात मोराच्या आकाराची अंगठी कानात टॉप्स आणि नाकात लयदार नथ .. जर कुणी बघितलं तर बघतच राहावं असं तिचा वेलांटीदार शरीर .. नाजूक, कातीव  पण थोडे जाड डाळिंबी ओठ. खांद्यावर एक हलकासा तीळ.

अपूर्वा ला बघून शब्दच्या मनात एकदम वीज कडाडली. मी बरोबर विचार करतोय ना ? शब्द स्वतःलाच म्हणाला आणि पावसात तल्लीन झाला. 

सहवास- पर्व तिन Where stories live. Discover now