सहवास-पर्व तिन भाग पाच

2.1K 4 0
                                    

२०९ मध्ये पार्टी चालू होती. सर्वजणी एक एक पेग डाउन झाल्या होत्या आणि मयुरा तर पहिल्याच पेग मध्ये झोपी गेली होती श्वेताला पण दुसरा पेग जड जात होता. रागिणी आणि आरती नॉन ड्रिंकर होत्या त्या चहा पिऊन मज्जा करत होत्या अपूर्वाने तिसरा पेग घेतला आणि  तिला  तो जड गेला   आणि इकडे प्रेम शब्द ला समजावून सांगत होता . 

शब्द  कुणीही स्त्री परफेक्ट सिइझ मध्ये नसते मग मॉडेल का परफेक्ट ? मग कपडे का परफेक्ट त्यांना त्याच्या इंपर्फ़ेक्ट साईझ ला साजेसे परफेक्ट कपडे हवेत. आपण परफेक्ट मॉडेल दाखवून त्यांच्यातील न्यूनगंड वाढवतो असं नाही का वाटत तुला ? 

अरे पण प्रेम त्या परफेक्ट बघूनच तर ते कपडे घेतात. म्हणजे त्याना ते पर्फेक्शन चं फीलिंग येते. शब्द त्याला आपला कन्सेप्ट सांगत होता 

नाही त्यासाठी त्या डायट करतात मग तब्येत खराब करतात आणि शेवटी काय कुठलीही स्त्री चांगली तेंव्हा दिसते जेंव्हा ती जशी आहे तशी समाधानाने स्वतःला स्वीकारते. आपण म्हणूयात "परफेक्ट अपेरेल्स फॉर इंपर्फ़ेक्ट पीपल "   आपण त्यांच्यातील जसं आहे तसं रूप त्यांना ऍसेप्ट करायला लावूयात याचा दुसरा फायदा म्हणजे आपल्याला मॉडेल्स ची जरुरत पडणार नाही आणि आपण आपल्या काही अश्या साधारण स्त्रियांना प्रोमोट करू. त्यातून आपला प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि लोकांना जसं आहे तसं सुंदर दिसता येईल. आता मला सांग एखाद्या पुरुषाचे पॉट थोडे सुटलेले आहे म्हणजे  दिसतो आणि त्यांनी जिम लावला कि आपण त्याला एक टमी टकर द्यावे आणि त्याचे पोट नॉर्मल शाप मध्ये दाखवून त्याला आपल्या स्लिम फिट मध्ये फिट करावे ? प्रेम बोलत होता 

हे बघ मला तुझा पटतंय , शब्द म्हणाला 

हे बघ आपण डायट चे गैरफ़ायदे सांगायला सुरुवात करू जे आहेत आणि त्यातून आपण आपल्या परफेक्ट फॉर इंपर्फ़ेक्ट रेंज ला प्रोमोट करू. एक सांग तुझं लक्ष होत कि नाही माहित नाही पण अपूर्वा सुंदर दिसते ? दिसते ना ? प्रेम ने अनपेक्षित प्रश्न विचारला 

सहवास- पर्व तिन Where stories live. Discover now