माझं घर!

90 0 0
                                    

खुप मस्त सकाळ होती..घराच्या अंगणात डावीकडं एक छोटीशी विहीर, आजूबाजूला हिरवळ, वेगवेगळ्या पक्षांचा मोहक किलबिलाट.. पडवीच्या समोरून जाणारी पायवाट कुंपणाच्या दरवाज्याला जाऊन मिळणारी. विहिरीच्या बाजूलाच फणसाच झाड, छोट्या मोठ्या फणसांनी लगडलेलं. परसात समृध्दी!  अंब्याचं झाड, चिक्कुची दोन झाडं, पेरूची झाडं, नारळाची तर दहा बारा झाडं, मोगरा, चाफा, रातराणी, कृष्णकमळ, ब्रम्हकमळ.. सुंदर वास भरलेला.. सकाळच्या पडलेल्या धुक्यामुळ वरवरची माती ओली झालेली..हलका मातीचा मोहक वास वाऱ्याच्या झुळकेबरोबर जाणारा..
मला रोज सकाळी पडवीतल्या झोपाळ्यावर बसून हे बघत बसायची एक सवय झाली आहे.. आईची रुही..s s s s अशी हाक ऐकू येई पर्यंत..

मी,आई,बाबा,आज्जी आणि माझा दादा आम्ही एकत्र राहतो. दादा पुण्यात नुकताच जॉब मुळे settle झालाय. ..
" घे" आई न माझी तंद्री तोडत coffee चा माझा special mug दिला..ती आणि मी रोज इथ झोपाळ्यावर बसून मस्त फेटलेली coffee घेतो आणि दिवसाची सुरुवात करतो..१९९० साली काश्मिर मध्ये खूप तणावाचं वातावरण होतं. तेव्हा आमच्यासारखे बरेच जण विखुरले.. माझे आई ,बाबा ,आज्जी आणि आम्ही दोघं भावंडं हीच काय ती आता आमची family. शेतीची आवड असणारे माझे बाबा इथ कोकण पट्ट्यावर स्थायिक झाले माझ्या गावाचं नाव आहे ' कशेळी'. दादा वर्षाचा असताना आई बाबा इकडे आले. हळूहळू जमवत जमवत आता इथ एक छान टुमदार घर आहे. इथल्या ग्रामदैवत कनकादित्याच्या मंदिरा जवळच.. देखणं सूर्य मंदिर आहे हे.. खूप प्रसन्न..शांतं..थंडं.. एक वेगळंच समाधान आहे या आवारात.. म्हणूनच कदाचित आमचा लाडका देव आहे हा. घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर आमची शेती आहे. आंबा, काजू, रान मेवा, काही आयुर्वेदिक औषधी, याच्याशिवाय हंगामी पिके हे असतच. गावात बारावी परेंत सोय आहे. ते करून दादा पुण्याला गेला पुढच्या शिक्षणाला आणि आता तिथंच जॉब मिळाला त्यामुळं तिथंच एक फ्लॅट घेऊन राहतोय.. मी बारावी झाल्यावर जवळच्या गावातून ATD केलं. मला drawing, painting ची खूप आवड आहे. पण drawing मधली degree घ्यायची म्हणलं तर रत्नागिरी किंवा कोल्हापूर ला जावं लागेल. आणि अजूनतरी दादा सारखी दुसऱ्या ठिकाणी जायची मानसिक तयारी माझी आणि माझ्या आई बाबांची कोणाचीच झाली नाही त्यामुळं इथच आहे मी.. देवळाच्या भक्ती निवास मध्ये कुलकर्णी काकांची मदत करते. बाबांना त्यांच्या कामात मदत करते..आणि थोडा वेळ माझ्या कलाकुसरीला देते..
माझं नाव रुहि नेहरू. माझे बाबा आमरेंद्र नेहरू. आई रीजा, आज्जी म्हणजे ' ज्जी' चंद्रकांता आणि दादा अभिनंदन ' भाई '.. अजूनही आई,बाबा आणि ज्जी काश्मिरी बोलतात. दादा पण बोलतो थोडं फार. पण मला अजिबातच येत नाही. दादा आला की मुद्दामून मला चिडवायला त्यांच्याशी काश्मिरी बोलतो.

मनू, आज दुपारी येताना परसातून जरा भाजी तोडून आण रात्री पुरती."
"चालेल काय आणू? दोडका आलाय, कारली पण लागली आहेत कोवळी छान."
" दोन्ही आण मग थोडं थोडं.. कुरकुरीत कार्ले फार आवडतं ग भाई ला..खूप दिवस झाले आला नाही आहे. आज सांगते आता त्याला जमवं आणि ये जरा चार दिवस सुट्टी काढून."
" मा, भाई राधा गेल्यापासून शांतच झालाय. आता दोन वर्ष होऊन गेली तरी अजून पुढं नाही जाऊ शकलेला.
मा, आपण पुण्याला जायचं का सगळे.. थोडा change आपल्याला पण."
" हो हे पण चालेल ..बाबांशी बोलूया.. मागच्या वर्षी गेलो होतो भाईनं फ्लॅट घेतल्यावर..त्यावर जाणं झालं नाही. आता या खेपेला जाऊ तर जरा स्वयंपाकाची जास्तीची भांडी घेऊन जाऊया. तिथं काहीच नाहीए निदान सकाळची चहा coffee ची तयारी झाली तरी पुरेल. रूह आपला induction cook top काढून ठेवायची आठवण कर ग नंतर."

स्वप्नातलं घर Where stories live. Discover now