( या आधीच unofficial भेट आणि हा भाग या एकाच वेळेला घडलेल्या घटना आहेत पण वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून.. एकत्र एक भाग खूप मोठा झाला असता म्हणून दोन वेगळे भाग केले आहेत.)
रूहि POV ( रुहिच्या मनातून...)
सगळ्यांना रूम मध्ये settle करून मी घरी आले..आज घाई झाली सकाळी त्यामुळं काही खाल्लं नव्हतं.. आणि आता भयानक भूक लागलेली..
"मा, काय केलंयस ग..भयानक भूक लागलीए"
"आज ज्जी ची फर्माईश..उपासाचं आहे सगळं साबुदाण्याची खिचडी आहे, बटाट्याची भाजी, रताळ्याचा किस, साबुदाणा बटाटा भरीत,चटणी..हे घे.. दही घे हवं तर..आत्ताच फ्रिज मधे ठेवलं बघ.. "
मी दही आणि बाकी जिन्नस घेऊन बसले.. मा च जेवण म्हणजे कधीही एक आणि दोन गोष्टी नाहीत कायम चार पाच जिन्नस..घरात सगळ्यांनी पोट भर आणि समाधानानं खाल्लंय हे महत्वाचं असतं तिच्यासाठी.
इतक्यात कुलकर्णी काकांची हाक आली..
" काय झालं काका? काही problem झाला काय? येताना सगळं बघून आले होते खरं."
"अग काही नाही.. आई बाबा आहेत?"
मा- " या या दादा आत या..दही खिचडी खाता का थोडी? "
"नको वाहिनी उपाध्ये आजोबांनी भरपूर खायला लावलंय..मी येणं केलं खरंतर वेगळ्याच कारणासाठी."
तोपर्यंत बाबा पण आले आतून आवरून...
"उपाध्ये आजोबांना आपली रुही खूप आवडली. त्यांच्या नातवासाठी. बाकीच्या घरच्यांना सुद्धा खूप आवडली आहे. आज संध्याकाळी उपाध्ये आज्जी आपल्या चंद्रकांता आज्जीला भेटायला येणार आहेत. बरोबर तुम्हाला चालणार असेल तर सगळेच येतील.. तुम्ही विचार करून काय ते ठरवून सांगा..."
इतकं सांगून काका गेले
माझी खिचडी तशीच राहिली..आता तर भूक पण गेली... काय झालं आत्ता नक्की..हे काय होतं.. मी फक्त 23 वर्षांची आहे... Seriously..मा- मनू तू खाऊन घे बाळा नंतर बोलूया..
बाबा शांत उभे राहिले आणि तितक्याच शांततेनं त्यांच्या खोलीत निघून गेले .. मा पण त्यांच्या मागं निघून गेली." अहो काही तरी बोला... हे असं अचानक."
" ती आता मोठी झाली आहे, स्थळं तर येणारच.. ती अजून लहान लहान या विश्वात अडकलेलो होतो मी. कधी पटपट मोठी झाली कळलंच नाही"
"ते आहे."
"ही लोकं खूप चांगली आहेत. उपाध्ये आजोबांना आपण इथं आल्यापासून ओळखतोय. "
"खरं आहे तुमचं पण नातवाला नाही ओळखत आपण ..त्याला तर बघितलं सुद्धा नाहीए.. "
"भेटू, पूर्ण विचार करून मग काय ते ठरवू. घाई गडबडीनं काही होणार नाही. थांब कुलकर्णी ला कॉल करतो.
Hello, हा त्यासाठीच केला.. ठीक आहे. चालेल आम्हाला भेटायला.. पण normal भेटूया..हा काही कांदेपोहे कार्यक्रम नसेल.. दोन कुटुंबं फक्त एकमेकांना भेटतील... हां... मुलगा काय करतो?.... Ok... हां... Ok... ठीक आहे भेटू संध्याकाळी..
नाही आता जरा सावरुदे तिला.. तुम्ही दुपारचं बघून घ्या.. जमेल का मी मदतीला येऊ? ... Ok ok ठेवतो मग."
बरचसं तू ऐकलंच आहेस... मुलगा... नाव साहिल आहे. थोडा मोठा आहे. अभिनंदन पेक्षा दोन एक वर्षांनी लहान असेल..
"अरे बापरे बराच मोठा आहे."
" हो..आणि दुबई मध्ये असतो. स्वतःच घर आहे. खुप मोठ्या हुद्द्यावर आहे. पण गेली पाच वर्षे दुबई मध्येच आहे.. भारतात परत यायची शक्यता कमी."
"दुबई.. भारताबाहेर म्हणजे नको वाटतंय मला..एकंदरीत ... ठीक आहे भेटून घेऊया .. मनुशी बोलून येते ..तिच्या साठी सुध्दा धक्का आहे.. आज्जी ना सांगायला हवय."
"मी बोलतो आई शी"
YOU ARE READING
स्वप्नातलं घर
Randomही रूहीची, साहिलची आणि त्यांच्या घरच्यांची गोष्ट आहे. छोट्या छोट्या वागण्यातल्या बदलांनी नात्यांमध्ये किती फरक पडतो याची खरी खुरी गोष्ट. सोयीसाठी नावं बदललेली असली तरी आपल्यातल्याच एका कुटुंबाची गोष्ट. एक सकारात्मक गोष्ट लिहायचा प्रयत्न केला आहे. आण...