रूही POV
आज दुपारी प्रसाद असल्यामुळे मा चा स्वयंपाकघरात half-day होता..
मा- काय खूश झाले दोघं.. भावा-भावांचा जीव आहे अगदी एकमेकांवर.. खूप छान आहेत ओ घरचे सगळे..
बाबा - चांगला decision घेतलास बाळा. माणसं चांगली आहेत मनानं..मुलगा सुद्धा उत्तम आहे.
मी हसून फक्त मान हलवली.
ज्जी - "माझा बाबू ...मोठा झाला.. "
"आज्जी, अजून वेळ आहे लग्नाला."
"आता दिवस कसे जातील कळणार सुद्धा नाही.. भुर्र पक्षासारखी उडून जाशील दुबई ला."
वातावरण emotional व्हायच्या आधी विषय बदलायला हवा..
"चला आवरुया आता ... देवळात जायचंय.. कुलकर्णी काका एकटेच आहेत."
बाबा - आता मंडळी सगळी इथंच आहेत तर घाईनं लग्नाचे विषय निघतील असा अंदाज आहे माझा."
आज्जी - नक्कीच निघतील.. फार थांबतील असं वाटतं नाही .. आपलं काय? वर्षभर थांबून तारीख बघायची का कसं?
मा- लग्न ठरल्यावर उगाच वर्ष वर्ष थांबणं नको.. मला तरी ते नाही पटत.
आज्जी - बरोबर आहे ते. मला सुध्दा नाही पटत पण आजकाल करतात तसं..चला त्यांचं म्हणणं बघू मग ठरवू.
बाबा - बोलणी उद्या भाई आला कीच करूया.. रोका पण करू तेव्हा हवं तर.
आई - चालेल.
बाबा - चला मी शेतात जाऊन येतो. साहिल ला दाखवली का नाही बाग?
" नाही बाबा अजून.. आज येऊ."सीड POV
देवळात आल्यावर अख्खी family गोळा झाली... पूजा सुरू झालेली..आज्जी आजोबा पूजेत होते.. त्यामुळं आम्ही तिथंच थांबलो..थोड्यावेळात रुही आली..ती खूप pure आहे.सरळ साध्या मनाची मला वाटतंय म्हणून ती जास्तच सुंदर दिसते.. सुंदर निळ्या रंगाची साडी नेसली होती तिनं.. दादा बघतच राहिला.. कोमल सगळ्यांना गजरे वाटत होती.. कोमल न आता रूही ची वेणी हे स्वतःच target बनवलं..
आत्ता दादाच्या reactions बघणं हा सगळ्यात hilarious प्रकार होता..मी माझा कॅमेरा काढला आणि हे सगळे precious moments capture करायला लागलो.. आमचा उद्या जायचा प्लॅन आम्ही परवा वर केला होता..आणि गरज पडली तर आई बाबा,मी आणि दादा..आम्ही अजून एक दिवस थांबणार होतो..
दादा शक्य झालं तर या vacation मध्येच लग्न करून जाईल..पूजा झाली आणि आम्ही गाभाऱ्यातून बाहेर आलो.. बाहेरच्या दगडी कठड्यावर बसलो...
रुही, कुलकर्णी काका त्यांच्या कामात busy झाले होते..
आज्जी - छान झालं सगळं, देव पावला..
आजोबा - हो.. देवानं यासाठीच बोलावलं असणार..साहिल तुझं काय म्हणणं आहे आता, पुढची तयारी, तारखा सगळं ठरवावं लागेल. तुला तुझी सुट्टी तशी ठरवावी लागेल.
" आजोबा, जर तिच्या घरच्यांची परमिशन मिळाली तर दादा आत्ता सुद्धा करेल लग्न."
सगळे हसायला लागले पण दादाच्या expression सांगत होत्या की ते खरं आहे.
" जर सगळ्यांना ok असेल तर मला थांबायचं नाहीए..तिला काय वाटतंय ते बघू.."
बाबा - आता भेटल्यावर पण पुढची बोलणी होतीलच..आज तिचा भाऊ सुद्धा येतोय.
आई - आता त्यांच्या घरी जाताना साडी घ्यावी तिला.. पण मिळायची काय इथं..
स्वरा - इथं चौकात आहे एक साडीचं दुकान.. आम्ही फिरत होतो काल तेव्हा दिसलं.
काकू - शारदा, चल आत्ता वेळ आहे तर जाऊन येऊया पटकन.
आज्जी - त्यांच्याकडं काय पद्धती आहेत माहिती नाही..त्यासुद्धा करू त्यांना विचारून .. बरं साडी हिरवी मिळत असेल चांगली, तर हिरवी घ्या.. बरोबर हिरव्या बांगड्या , कुंकू, गजरा.. सगळं सवाष्णी चं कौतुक करायचं...
आई, काकू, कोमल, स्वरा.. सगळ्या उठल्या..आणि मी हक्काचा ड्रायव्हर त्यामुळं निघाली आमची वरात..
YOU ARE READING
स्वप्नातलं घर
Randomही रूहीची, साहिलची आणि त्यांच्या घरच्यांची गोष्ट आहे. छोट्या छोट्या वागण्यातल्या बदलांनी नात्यांमध्ये किती फरक पडतो याची खरी खुरी गोष्ट. सोयीसाठी नावं बदललेली असली तरी आपल्यातल्याच एका कुटुंबाची गोष्ट. एक सकारात्मक गोष्ट लिहायचा प्रयत्न केला आहे. आण...