10. अवघड decision

22 0 0
                                    

रूही POV

साहिल आणि आम्ही तिघं बाहेर आलो पण साहिल नं मला आणि भाईला बोलायला पुढं पाठवलं..
"भाई, तुला काय वाटतंय? मला भीती वाटती आहे थोडी."
"साहजिक आहे नानू, पण साहिल खरंच खूप चांगला मुलगा आहे. कोणता दिखावा नाही. चांगल्या विचारांचा चांगला माणूस..यापेक्षा चांगली family शोधायला efforts घ्यावे लागतील."
"तुला खरंच असं वाटतंय?"
" वाटत नसतं तर मी तसं बोललो असतो बाळा, माझी एकुलती एक बहिण आहेस तू.. आणि या आधी बोललो नाही कधी पण माझी खूप लाडकी पण आहेस."
"Thank you भाई I love you..."
मी पहिल्यांदा भाईला रडताना बघितलं... घट्ट मिठी मारली आम्ही .. थोडा वेळ तसेच थांबलो..कारण आत्तापर्यंत आम्ही दोघं पण रडायला लागलो होतो..
" बास बाळा आता रडू नकोस, काय वाटतंय तुला?"
"कळत नाहीए भाई."
"तुझा होकार आहे ना?"
"हो ... हो लग्नासाठी तयार आहे मी."
"Good मग मला वाटतंय नको थांबायला.. मी already बोललोय साहिल शी. Trust me .. चांगला आहे तो.फक्त बाळा अजून एकच, त्यांची financial background आणि आपली यात प्रचंड फरक आहे. Tension घेऊ नको याचं.पण तुला माहिती असणं गरजेचं आहे."
"O.. ok."
" त्यावर बोलू आपण नंतर. आत्ता लग्नाच्या तरखेचं बघुया आधी."
भाई नं मग हाक मारून साहिल ला पण बोलावलं.
भाई - "साहिल आम्हाला पण चालेल कधी पण.. म्हणजे तू म्हणालास तसं,थांबण्यासाठी काही कारण दिसत नाहीये. तुला ऑफिस मधून कशी सुट्टी manage होतीए ते बघ आणि सांग."
साहिल खुश होऊन माझ्याकडं बघत होता.. साहिल कडे बघून मी पण हसले. मोठा decision होता पण साहिल बरोबर तो घ्यायला मी तयार होते. मला ही इतकी गोड family हवी होती आणि साहिल पण.
साहिल - जानेवारी मध्ये जमेल आत्ता हवंतर engagement करू शकतो.. maximum दीड महिना उरेल हातात तयारी साठी ते चालेल का?
भाई - रोका आज करतोच आहे. बाकी आपल्या घरच्यांना विचारुया ..मग ठीक आहे ..चला जाऊया..काळजी करतील नाहीतर सगळेच.

साहिल POV

सीड नं पुन्हा घट्ट मिठी मारली...
" दादा..m so happy for you two... Congratulations रूही.."
" thank u.."
ती माझ्याकडं बघून गोड हसली ..
बाबा बाहेरच व्हरांड्यात वाट बघत उभे होते. आमचे चेहरे बघून m sure त्यांना अंदाज आला असणार.
"बाबा...चला आत सगळ्यांशी एकत्रच बोलूया."
आजोबा - हां, आले दोघं.. काय ठरलं तर मग.
"आजोबा आम्हाला पण पटतंय सगळ्यांचं.. मग रुही तू सांगतीएस ?"
" नाही नको तूच बोल."
" आजोबा, मला वाटतंय या सुट्टीत जाताना engagement करून जातो आणि मग जानेवारीत मोठी सुट्टी घेऊन येईन..तेव्हा लग्न करू.."
सगळे खूप खुश झाले ... Congratulations देऊन झाले ..एकदम उत्साहाच वातावरण होतं..
गुरुजी पण होतेच त्यामुळं तारखा ठरल्या. पुढच्याच आठवड्यात चांगला दिवस होता तेव्हा engagement करायचं ठरलं. Engagement कोल्हापूरला करायची ठरली मोजक्या लोकांबरोबर. लग्न 6 जानेवारी ला ठरलं.
आजोबा - लग्नाचं कसं काय करायचं मग. कसाबसा महिना आहे हातात.?
रिजा काकू - अरे बापरे..होईल का तयारी? नाहीतर पुढची तारीख घेऊया.
" नको काकू, तुमची सगळ्यांची काळजी कळती आहे मला. पण उशीर नको. मला नाही वाटत माझं सहा - सात महिने लक्ष लागू शकेल आता दुबई मध्ये. आणि होईल सगळं manage. करु आपण."
रुही चे बाबा - ठीक आहे मग. लग्नं मला वाटतंय आपण इथंच कनकादित्याच्या साक्षीनं करुया..ठरलंय सगळं त्याच्याच कृपेनं तर, त्याच्याच आशीर्वादाने होऊदे..तुम्हाला काय वाटतंय?
बाबा - आम्हाला पण चालेल.. लग्न इथं करू.. त्याला आमचे सगळे नातेवाईक आणि स्नेहसंबधी येऊ शकणार नाहीत. त्यामुळं त्यांच्यासाठी कोल्हापूर मध्ये नंतर reception ठेऊया. काय वाटतंय बाबा..
आजोबा - चालेल की. उत्तम आहे.

Vous avez atteint le dernier des chapitres publiés.

⏰ Dernière mise à jour : Apr 21 ⏰

Ajoutez cette histoire à votre Bibliothèque pour être informé des nouveaux chapitres !

स्वप्नातलं घर Où les histoires vivent. Découvrez maintenant