7. 100 टक्के..

11 0 0
                                    

साहिल POV. (साहिल च्या मनातून...)

मी, रुही, सीड, भास्कर, कोमल आणि स्वरा आम्ही सगळे पुन्हा एकत्र अंगणात गोळा झालो आणि घरी गेलो.
"आली सगळी बच्चे कंपनी."
सगळ्यांचं लक्ष आता रुही आणि माझ्यावर वर होतं..
रिजा काकू - "चहा किंवा coffee चा अजुन एक round??"
कोमल - काकू मला चालेल coffee.
रुही - मा, मला coffee .
अजून काही होकार आले .. "मा, तू बस मी बघते." असं म्हणून रुही आत गायब झाली. तिच्या मागून मागून कोमल आणि स्वरा सुद्धा गेल्या...
अमरेंद्र काका- " साहिल, तुमचं बोलणं झालं?"
"हो काका, पण विषय पुढे जाणार असेल तर त्याआधी आम्हाला एकमेकांशी नीट बोलणं गरजेचं आहे.काही doubts असतील तर तेही बोलूनच solve होतील.. assumptions ना काही जागा नको द्यायला."
चारू आज्जी-, " बरं मला सांग आता.. काय केलं मागं बागेत जाऊन".. असं म्हणत मिश्किल हसून भुवया उंचावल्या...
अमरेंद्र काका कावरेबावरे झाले.. रिजा काकू खूप कष्टांनी हसू दाबत होत्या..आणि आमच्या आज्जीचा कंट्रोल सगळ्यात आधी गेला..
सगळेच हसायला लागले..
आज्जी - " चारू म्हणजे एक जगावेगळं प्रकरण आहे."
अमरेंद्र काका - हो माझ्या बीपी चं पण तेच एक कारण आहे.
पुन्हा एकदा सगळे हसायला लागले.
तोपर्यंत रूही चहा कॉफी चा tray घेऊन बाहेर आली. सगळ्यांना हवं ते देऊन मला एक coffee चा cup दिला आणि स्वतः पण घेतला.
एकंदरीत coffee आवडती हे मी लगेच notice केलं..
.
आजोबा - चला निघुया .. अमरेंद्र खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून..उद्या परत पूजेला भेटूच.
आम्ही सगळेच उठलो..
अमरेंद्र काका - रुह मनू तुला कुलकर्णी काकांनी यायला सांगितलं आहे का?
" थोड्यावेळानंतर जाऊन येईन मी एकदा. काही arrangements बघाव्या लागतील मला."
मी काही choice नसल्यामुळ आलो बाहेर.. अंधार पडायला लागलेला.. थोड्या वेळात दिसेल ती परत कदाचित.

रुही POV. ( रुहीच्या मनातून..)

हॉल पटकन आवरून टाकला आणि कपडे बदलायला आत आले. साधी जीन्स आणि tshirt.. सुख!
बाहेर आले तर सगळेच आपापलं आवरून बाहेर बसले होते.. मा नं रात्रीसाठी राजमा चावल बनवले होते..आज माझं खाणं नीट झालं नव्हत त्यामुळं लगेच खायला घेतलं..
आमच्या कडे एकंदरीत साहिल खूप आवडला.. वय जास्त आहे असं ऐकल्यावर वाटलं होतं पण भेटल्या नंतर फार काही जाणवलं नाही.. आमच्या height मधे मात्र सॉलिड फरक आहे.. माझ्यापेक्षा एक फूट भर तरी उंच असेल तो..
पण आई बाबा आज्जी सगळेच positive आहेत.. आमचं जेवण झाल्यावर भाई ला कॉल केला त्याला पण सांगितलं.. सुरुवातीला त्याला शॉक बसला..पण त्यानं ऐकून घेतल्यावर बाबांना म्हणाला मी शनिवारी येतो.. भाई पण दोन दिवसांची सुट्टी काढून येतोय..बरेच दिवसात त्याचं पण येणं झालं नव्हतं..
बाबांनी मला साहिल शी कधी काय बोलायचंय ते बोल म्हणून सांगितलं..
" मनू.. आम्हाला तू आमच्याशी मोकळेपणानं बोलायला हवं आहे.. decision हा तुझाच असणार आहे. पण एक लक्षात ठेव की आम्ही तुझ्या बरोबर कायम आहोत. काहीही वाटलं तरी ये बाबा जवळ. ठीक आहे ना बाळा."
बाबा फक्त माझ्यासमोर रडत नव्हते ..मला सगळं कळतं होतं..पण त्यांना साहिल आणि त्याच्या घरचे मनापासून योग्य वाटले होते माझ्यासाठी. आज बाबा खुश होते.. घट्ट मिठी मारली बाबांना.. पण उद्याची थोडी तयारी राहिलेली त्यामुळं बाबांशी गप्पा मारत बसणं शक्य नव्हतं. मग त्यांना रात्री लवकर येते असं सांगून मी माझी उरलेली कामं करायला भक्त निवास मध्ये आले..
सगळे त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये होते..
मी पूजेची तयारी check केली, गुरुजींशी पुन्हा एकदा बोलून घेतलं.. प्रसादाचं जेवण होतं ५० जणांना बोलावलं होतं.. सगळी तयारी बघून घेतली. ज्याची त्याची कामं त्यांना समजावून सांगितली..आणि देवळाच्या सजावटीसाठी देवळात आले.. कुलकर्णी काका पाहुण्यांचं जेवण झाल्यावर देवळात आले तोपर्यंत इथली तयारी होत आलेली ..
"बाळा जेवण झालं का?"
"हो काका.. करूनच आले. झालीए सगळी तयारी.. उद्या परत लवकर यायचं आहे.. "
" हो हो चला.. "
अगं.. असं म्हणत काकांनी एक कागद दिला..
त्यावर मोबाईल number आणि "मगाशी तुझा contact number घ्यायला विसरलो म्हणून माझा देतोय " असा एक msg होता... चिठ्ठी वाचून हसूच आलं.
" मुलगा चांगला आहे बाळा.. आणि घरचे सुद्धा."
काकांकडे बघून फक्त हसले आणि घरी परत आले..

स्वप्नातलं घर حيث تعيش القصص. اكتشف الآن