राजीव POV. ( साहिलचे बाबा राजीव त्यांच्या मनातून..)
रूही आल्यावर मी तिथून निघालो.. समोरच बाबा आणि कुलकर्णी दादा बोलत बसलेले.. बाबांनी बोलावलच..
"राजीव,काय वाटतंय तुला? साहिल शी बोललास?"
" हो बाबा, आत्ता तेच बोलत होतो.. तरी आजचा दिवस जाऊदे .. वेळ देऊया त्याला, उद्या बघू."
" अरे आपण इथे फक्त उद्याचा दिवस मग भेटणार कधी? मला आणि हिला आता प्रवास सोसत नाहीत रे. आज चंद्रकांता ला भेटायच्या निमित्ताने भेटायचं का?"
" बाबा मला तुमचं म्हणणं कळतंय. पण desperate नको व्हायला.. रूहीला माहिती सुद्धा नसेल. One step at a time.. आधी तिला कल्पना देऊया..तिच्या आई बाबांना माहिती असायला हवं.."
" बरोबर आहे तुझं.."
मी विसरूनच गेलो की कुलकर्णी दादा इथंच होते. "राजीव साहेब.."
" नुसतं राजीव.. दादा,लहान आहे मी तुमच्या पेक्षा."
" राजीव.. बघा तुम्हाला चालणार असेल तर मी आत्ता चाललोच आहे तर विषय कानावर घालतो अमरेंद्र बाबूंच्या."
"चालेल की.. काय बाबा..खुश काय आता."
Emotional झाले बाबा.. वय वाढतं आहे तसे फार emotional होत चाललेत..साहिल POV. ( सहील च्या मनातून...)
खूप सुंदर आहे भक्त निवास आतून सुध्दा.. स्वच्छ.. भरपूर प्रकाश आणि खेळती हवा.. झाडं सुध्दा बरीच लावली आहेत त्यामुळं positive calmness आहे.. undoubtedly pleasant and welcoming experience..
Room मधे आलो तर अजूनच surprise झालो.. precious, हवेशीर, भरपूर प्रकाश.. just the way I like it.. door वर knock झालं आणि सिड आत आला..
"आजोबांनी बोलावलंय..बाहेर coffee lounge मध्ये बसलोय सगळे. तू ok आहेस?"
" Ok आहेस as in?"
" ते seriously तुझ्या आणि रुही बद्दल विचार करतायत."
" I know.. बाबांनी idea दिली."
"मग?"
"मी already ३० आहे.. till the time I had my own reasons.. wanted to achieve something professionally.. financially wanted to get settled.. आता हे सगळं नीट झालंय..so असं कुठलं reason दिसत नाहीए for me to delay the decision... पण offcourse, only if she is ready to accept me .. मी आहे तसा with all my positives and negatives,u know."
" She is a keeper that I can guarantee you... माणसं बघून कळतात थोडीफार मला पण"
" Trust me.. I know.. म्हणूनच second thought देतोय.. "
"चल भाई... " असं म्हणत त्यानं मला bro hug दिली आणि आम्ही बाहेर आलो...स्वरा - मस्तायत room... भारी आहे हे भक्त निवास..हा प्लॅन झाल्यावर घाबरलेले मी.. आता कुठं कसं असणार म्हणून.. भरपूर डास असतील वगैरे वाटलेलं...
कोमल - म्हणून तू ओडॉमोस च्या चार tube घेउन आलीस??
स्वरा हे एक आमच्या घरातलं 24/7 चालणारं entartainment चॅनल आहे..
आजोबा - बरं झालं तू आलास..
"Yess... Here I am.."
"जरा घाई झाली कळतंय मला...पण राजीव बोलला तुझ्याशी.."
"हो आजोबा"
" कुलकर्णींना सांगून मी मगाशी निरोप पाठवला होता..
त्यांनी संध्याकाळी भेटायला बोलावलंय."
For the first time in my life मी घाबरलो...
मी घाबरलो कारण...मला rejection ची भीती वाटली ..अजून कशातच काही नाही आहे . मला स्वतःला सावरयला हवय.. ती नाही म्हणाली तर..
"साहिल..."
"अं... Sorry आजोबा..हो.. ऐकलं.. जाऊया"
बाबा - " so I take it की तू तिचा विचार करायला तयार आहेस.."
" बाबा.. I admit की मी arranged marriage साठी for नव्हतो..आत्ताही complete for नाही आहे.. पण yes तिच्याकडं बघून ती मला एका चांगल्या family मधली चांगली मुलगी वाटली.. still हे जरी असलं तरी अजून इतरही factors आहेत.. तिला मला मी जसा आहे तसं accept करावं लागेल..my work profile.. मी दुबई मधे असणं..तिथं माझी एक life style आहे..friend circle आहे.. मी आत्ता तरी इंडिया मध्ये परत यायच्या विचारात नाही.. यात तिची life 360 degrees मध्ये change होणार आहे..यासाठी तिची तयारी असायला हवी.. "
काका - बघुया आज जाऊन भेटून तरी येऊया.
काकू - आई मग जाताना काय घेऊन जायचं? म्हणजे कसं काय करूया?
आज्जी - त्यांचं म्हणणं आहे की normal भेटणं.. हा काही कांदेपोह्यांचा कार्यक्रम नसेल.. दोन कुटुंबं फक्त एकमेकांना भेटतील...
बाबा - चांगली कल्पना आहे.. कसलं अवघडलेपण नाही, कोणत्या formalities नाहीत.. छान.
आजोबा - त्यामुळं शाल्मली मला वाटतंय आपण फळं किंवा मिठाई असं काहीतरी घेऊन जाऊ.. जुळून येत असेल सगळं तर कांदेपोह्यांचा कार्यक्रम कोल्हापुरात करू..आपल्याकडं.. कसं?
आई - मला पटतंय..
काकू - मला पण..
बाबा - ठीक आहे ठरलं तर मग..
कुलकर्णी काका आले इतक्यात.
"आजोबा दुपारचं जेवण कधी घेऊया सांगा.."
"अरे रुही नाही आली."
" नाही तिला सुद्धा आत्ताच सांगितलं .. अजून लग्नाचा विषय निघाला नव्हता तिच्या साठी.. तुमचं पहिलंच स्थळ आहे."
ती लहान वाटली होती पण ही न्यूज होती मला...
" काका, वाईट वाटणार नसेल तर एक विचारू?"
" हो हो विचारा ना साहिल राव."
सीड पोट धरून हसायला लागला...नंतर सगळेच हसायला लागले.
" काका, पाहिलं म्हणजे मी साहिल... साहिल राव नाही... आणि दुसरं, रुही च वय काय आहे?"
"ती 23 वर्षांची आहे.'
Oh God.. ती खूपच लहान आहे... Now I feel weird ..
"बाबा 7 years age gap... Isn't it too much."
आज्जी - तुझे आजोबा माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठे आहेत ..
स्वरा - geezzzz मी तर दादा म्हणलं असतं..
आता मी सोडून सगळ्यांनी तिला एक look दिला..
"काय मी आपलं माझं मत सांगितलं.!"
कोमल - विचारलंय काय कोणी?
स्वरा रुसून बसली...
काका - माझ्यात आणि शाल्मलीत 6 वर्षांचं अंतर आहे..
बाबा - साहिल.. आपण संध्याकाळी भेटून येऊया.. मला त्यांची ही कल्पना आवडली just दोन कुटुंब एकत्र भेटणं..no formalities nothing.. पुढचं पुढं बघू..
कुलकर्णी काका - ठीक आहे तर मग मंडळी.. जेवायला कधी बसताय सांगा..
आजोबा - आता आहोत इथ तर घास भर खाऊनच घेऊया.. बरं आम्हाला फळं किंवा मिठाई कुठं मिळेल?
कुलकर्णी काका - बोपण्णांच्या दूकानात दोन्ही मिळेल.. रूहीला त्यांचे कंदी पेढे खूप आवडतात.
" बाबा मी जाऊन घेऊन येतो..तुम्ही बसा जेवायला तोपर्यंत आलो. आपल्यासाठी काही आणू? "
आज्जी - पूजेसाठी पेढे हवे आहेत पण ते उद्या ताजे ताजे घेऊ.
सीड - दादा चल मी पण येतो..
आम्ही दोघं निघालो...
इतका सुंदर निसर्ग आहे इथ... स्वच्छ हवा.. याच विचारात कार जवळ आलो तर सीड म्हणाला समोर बघ...
भक्त निवासाच्या बरोब्बर समोर एक मस्त घर होतं..आणि front porch वर जो झोपाळा होता त्यावर डोळे मिटून रुही झोका घेत बसलेली.. शांतपणे.. तिच्याकडं बघूनच शांत वाटत होतं..
त्या सेकंदाला मला माहित होतं, हिनं होकार दिला तर मी तिच्यासाठी काहीही करेन.. anything just to keep her happy..
" दादा... U know what?"
"ह्ममम"
" U r whipped."
त्याला एक irritated look दिला पण आम्ही दोघंही हसणं control करू शकलो नाही..पुन्हा एकदा तिच्याकडं बघून मी बोपण्णा काकांच्या दुकानाकडे निघालो..
रुही साठी पेढे घेतले, चांगली fruits दिसली ती पण घेतली.. तिच्या आई बाबांसाठी काजू कतली घेतली आणि परत निघालो... परत जाताना आपसूकच लक्ष तिच्या घराकडे गेलं..अजूनही ती तिथंच होती.. शांत हळूवार झोका घेत..डोळे बंद करून.. वाटत होतं, तिथंच उभ रहावं आणि बघत बसावं तिच्याकडं.. सीड आला आणि तंद्रीतून बाहेर आलो.
"दादा, ती तुला नाही म्हणू शकते..नको तुझी involvement वाढवुस.. आत्ता नको."
"हे मी मगाच पासून कितीतरी वेळा स्वतःला समजावून सांगितलय.. असं पहिल्यांदा होतंय यार... माझं मलाच कळत नाहीए."भक्त निवास मध्ये आता सगळे आमच्यासाठी जेवायचे थांबलेले..
कुलकर्णी काका -" या या..चला बसा गरम गरम खायला घ्या."
दोन इथच काम करणारी माणसं आली आणि त्यांनी जेवणाच्या डिश आणून ठेवल्या... काकांनी पुन्हा एकदा lavish spread समोर ठेवला होता.. त्यात special म्हणजे... कुळथाचं पिठलं, गरमागरम तांदळाची भाकरी तूप आणि डांगर..class .. मज्जा आली.
आजोबा - अरे कुलकर्णी आता रात्री जेवायला जागा नाही रे बाबा.. फार केलंस तू..
" आजोबा फार नाही इथली खासियत थोडी.. तेवढीच आठवण काढाल नंतर.." चला आता आराम करा.. 5 ला बोलावलंय नेहरूंनी.. 4ला चहा साठी उठवतो..
बाबा - दादा चहा म्हणजे फक्त चहा... त्याच्याबरोबर भरलेल्या ताटल्या नकोत..
"काय दादा तुम्ही.. डाएट बिएट करताय का काय"
हसत गप्पा मारत आम्ही सगळे आमच्या आमच्या रूम मध्ये गेलो..
(क्रमशः)
YOU ARE READING
स्वप्नातलं घर
Randomही रूहीची, साहिलची आणि त्यांच्या घरच्यांची गोष्ट आहे. छोट्या छोट्या वागण्यातल्या बदलांनी नात्यांमध्ये किती फरक पडतो याची खरी खुरी गोष्ट. सोयीसाठी नावं बदललेली असली तरी आपल्यातल्याच एका कुटुंबाची गोष्ट. एक सकारात्मक गोष्ट लिहायचा प्रयत्न केला आहे. आण...