कुलकर्णी काका POV ( कुलकर्णी काकांच्या मनातले विचार.)
रुही बाळानं सगळी तयारी अगदी चांगली केली होती. पुन्हा एकदा खात्री झाल्यावर ती आतमध्ये निघून गेली..आता पाहुण्यांची जबाबदारी माझी!
" सगळ्यांनी पोटभर घ्या..बघा आमच्या ताई खूप छान बनवतात.. कमी जास्त काही वाटलं तर सांगा."
आजोबा - " अरे जास्तच आहे, हे कमी कसलं. "
शारदा - " बाबा ती मुलगी कोण होती ओ?"
"अग ती आपली रूही, अमरेंद्र नेहरूंची धाकटी मुलगी."
" काश्मीर वाले ?"
" हो हो तेच."
"तरीच!"
शाल्मली - " साहिल ,सिद्धार्थ कोणालाही चालेल."
" अगं मला पण तेच आलं डोक्यात .. काय गोड आहे दिसायला.. केस बघितलेस लालसर, हिरवेगार निळसर डोळे, आई तूम्ही म्हणता तसं धारधार नाक...फारच देखणी आहे."
कुलकर्णी काका - " वाहिनी, लोकं पण अतिशय चांगली आहेत .. आणि हे जे बघताय भक्त निवासाचं रूप हे सगळं तिच्यामुळेच.."
" काय शिकली आहे? म्हणजे इथंच असते का बाहेर जॉब वगैरे?"
"आर्टिस्ट आहे.. नुकतंच शिक्षण झालंय आत्ता सध्या full-time इथलं काम सांभाळती आहे शिवाय तिच्या वडिलांना शेती मध्ये मदत करते..त्यांची आंब्याची आणि काजूची बाग आहे."
"अरे वा! फारच छान दिसतोय आवार.."
आज्जी - " शारदा, मुलं आली की बघ काही जमतंय काय.. कनकादित्याच्या अंगणात आहोत.. देवाचाच कौल म्हणायचा."
राजीव - " तुम्ही बायका म्हणजे... आई,काळ बदलला आहे.. आपल्याला माहीत सुद्धा नाही त्यांचं काय चाललंय..कदाचित त्यांनी त्यांचं ठरवलंही असेल."
नितीन -" हे दादाचं खरं आहे." "मुलांना त्यांचं त्यांना ठरवुदे. तेच जास्ती बरं आहे आई. दोघं सुध्दा देशाच्या बाहेर. त्यांना त्यांच्या आवडीने करु दे म्हणजे खूश राहतील."
श्यालमली - "नितीन अरे जर त्यांचं काही नसेल तरच. शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे त्यांच्या.. decision हा त्यांचाच असणार आहे."सगळ्यांचं म्हणणं ज्याच्या त्याच्या जागी अगदी बरोबर आहे पण जर काही प्रयत्नांनी जमत असेल तर रुही बाळासाठी मी नक्की प्रयत्न करीन..चांगल्या विचारांची चांगली माणसं आहेत. स्थिरस्थावर आहेत आणि एकमेकांना जोडून आहेत. दोन्ही चांगली कुटुंबं जोडली जातील आणि रुहीचं सुध्दा चांगलं होईल,अजून काय हवं!
तेवढ्यात राजीव ना फोन आला. मोबाइल वर ते त्यांच्या मुलांना कसं यायचं हे सांगत होते...
पाच दहा मिनिटं गेली आणि समोरून त्यांची मुलं आली..राजीव एअर फोर्स मधून रिटायरमेंट घेतलेले.. त्यामुळं एक वेगळाच रुबाब त्यांच्या आजूबाजूला.. त्यांची मुलं तर चार पावलं वरचढ..मोठा दुबई मध्ये असतो खूप मोठ्या हुद्द्यावर आहे..आणि धाकटा पायलट..दोघंही उंच आणि रुबाबदार..
कोमल - "चल आई आता reaction बघुया."
नितीन - " स्वरा, कोमल जास्ती नको..त्या बिचाऱ्या मुलीला कावरंबावरं करून सोडाल.."
आम्ही सगळेच हसायला लागलो. ..
राजीव नी माझी आणि मुलांची ओळख करून दिली. थोरला साहिल आणि धाकटा सिद्धार्थ.
"Hello everyone "
सिद्धार्थ ने " पॉप्स" म्हणत राजीव ना टाळी दिली आणि शेजारी बसला. " आज्जी, आजोबा प्रवास कसा काय ठीक ना?"
आजोबा - "प्रवास एकदम मस्त." " अरे अभी तो मे जवान हूं..!"थोरला साहिल रुहीसाठी चांगला वाटला मला.. बघू काय होतंय.. देवा कनकादित्या बघ रे बाबा तू..
"भास्कर .. long time man.."
असं म्हणत साहिल भास्कर ला मिठी मारतो..एक एक करत दोघं सगळ्यांना भेटतात.. माझं तिथंच उभ राहणं खरं तर चुकीचं होतं पण मला जाणवलंच नाही.. तसाच बघत राहिलो.किती छान family आहे ही. वडील आणि मुलांचं नातं सुध्दा किती जवळचं आहे.. मित्रसारखे आहेत अगदी.
श्यालमली - "कुलकर्णी दादा.. रूही काही दिसत नाही.. "
ताईंच्या बोलण्याने मी लागलेल्या तंद्रीतून बाहेर आलो.
" ती आतमध्ये असेल.. पुढच्या तयारीसाठी. तुमच्या
रूम ready असतील. तुमचा breakfast झाला की सांगा म्हणजे ती तुम्हाला तुमच्या रूम्स दाखवेल."
शारदा - " ते होईलच ओ, हे एवढं खाणं काय करणार? या तुम्ही सुद्धा आणि रूहीला पण बोलवा."
मला वाहिनींची इच्छा कळत होती..मलाही तेच हवं होतं म्हणा, म्हणून मग मी सुद्धा बोलावलं रूहीला..
थोड्यावेळान रूही आली..आमचं सगळ्यांचं लक्ष होतंच या दोघांकडे .. दोघांनी तिच्याकडं बघितलं पण सिद्धार्थ हु..आ.ssssss म्हणत साहिल कडं बघायला लागला..साहिल मात्र एकटक तिच्याकडंच बघत होता..
रुही आली पण आतून कोणीतरी हाक मारली म्हणून पुन्हा आतमध्ये गेली...
साहिल -" ती कोण ?"
सिद्धार्थ -" ती the Ruhi."दोघांची reaction बघून श्यालमली वाहिनी म्हणाल्या..
" सिद्धार्थ खूप गोड वाटली आम्हाला, ती बघायची का तुला? "
यावर सिद्धार्थ चमकला.. "काकू.. दादा मोठा आहे त्याचं बघ आधी.."
" म्हणजे तुला ती आवडली नाही का कोणी वेगळं आवडतंय?"
" काकू ssss आता मला पकडू नका... "
शारदा -" म्हणजे कोणीतरी आहे."
"Alright ladies and gentlemen... हे मी सांगणार होतो पण आत्ता सांगायचं नव्हतं..पण लपवण्यासारखं सुद्धा काही कारण नाही आहे. तुम्हाला माझी school friend नीती आठवतीए? "
राजीव - मला वाटलंच होतं.. असं म्हणत त्यांनी आपल्या मुलाला मिठीत घेतलं.. शारदा वाहिनी सुद्धा खूप खुश झाल्या.. सगळे आता हसत खेळत गप्पा मारत होते...त्यांच्या गप्पा सुरू झाल्यावर मात्र मी आतमध्ये आलो..
( क्रमशः)
YOU ARE READING
स्वप्नातलं घर
Randomही रूहीची, साहिलची आणि त्यांच्या घरच्यांची गोष्ट आहे. छोट्या छोट्या वागण्यातल्या बदलांनी नात्यांमध्ये किती फरक पडतो याची खरी खुरी गोष्ट. सोयीसाठी नावं बदललेली असली तरी आपल्यातल्याच एका कुटुंबाची गोष्ट. एक सकारात्मक गोष्ट लिहायचा प्रयत्न केला आहे. आण...