रुही POV
मा आणि माझ्या गप्पा चालू असतानाच बाबा समोरून आले.. मा लगेच आतून त्यांचा चहा आणायला गेली. "मा, आज कॉफी मस्त झालीए."
मा न माझ्याकडं फक्तं हसत बघितलं. "उद्या तू बनव काय..मला पण मिळूदे आयती कधीतरी.".. मागून बाबा चहाचा कप घेऊन आले आणि हसायला लागले मा बरोबर..माझा चेहरा एवढासा झाला. काय बोलणार आता..!
तेवढ्यात कुलकर्णी काका आले. बाबांनी किटलितून अजून एका कपात चहा घातला..
"काय अमरेंद्र बाबू, कसं काय? नमस्कार वाहिनी."
"काय ग ठके, आज लवकर येतीएस ना..मंडळी दहा साडे दहा पर्यंत पोचतील"
मा न विचारलं, " दादा, आज फार घाई आहे म्हणत होती रुह..कसली घाई गडबड?"
" अहो नेहमीचीच वाहिनी.. आज कोल्हापूरची मंडळी येतायत. दर वर्षी उपाध्ये आजोबा-आज्जी आणि जमेल तसं त्यांची मुलं येऊन जायची. आज पहिल्यांदाच आख्खं कुटुंबं येतंय."
" अरे व्वा मस्त की मग. आजोबा थकलेत आता. चांगली माणसं आहेत पण"
"हो, आजोबांना आता येणं होत नाही म्हणून एक छोटं गेटटुगेदर ठरवलंय त्यांनी.. त्यांची इच्छा होती केव्हा पासूनची.. म्हणायला मोठं कुटुंबं पण प्रत्येक जण कामासाठी इकडं तिकडं गेलेला, जमवलंय पण या खेपेला."
माझी coffee झाल्यावर बाकीच्यांचे कप घेऊन मी आत आले. नोव्हेंबर असल्यामुळे आल्हाददायक गारवा आहे इकडं. माजघरातून बघितलं तर अजून तिघांच्या गप्पा चालू होत्या.. मी पटकन आवरायला गेले..
आमचं घर टुमदार पण छोटस्स.. पडवीतून आत आलं की माजघर म्हणजेच हॉल. शेजारीच स्वयंपाकघर त्याला लागून कोठीची खोली त्याच्या बाजूला मागच्या अंगणात जायचा दरवाजा. स्वयंपाकघराच्या समोर जीना, जीना असा connected आहे की चार पायऱ्या उतरून खाली माझ्या रूम मध्ये जाता येतं आणि तोच जीना चढून वरच्या मजल्यावर पण जाता येतं. वरच्या मजल्यावर मा-बाबा आणि भाई ची रूम आहे.आज्जी ची रूम आणि देवघर हॉल ला लागून आहे..
अरे बापरे, 8 वाजून गेलेत. बरीच कामं तशीच राहिली आहेत..अजून तयारी सुद्धा बघायची आहे लोकं यायच्या आधी.
पटपट अंघोळ आवरून ready झाले. आज थोडं चांगलं म्हणून हिरवा खणाचा सूट घातला..कामात केस आणि सांभाळायला नको म्हणून सागरवेणी घातली आणि बाहेर आले. As expected काका अजुनी इथंच!! एकंदरीत कोकणी माणसाच्या गप्पा आणि चहा काय संपत नाही..
"काका आता उपध्येंना काय इथच बोलवूया काय ?"
"अरे अरे अरे! वाजले ...वाजले किती?"
" 9 वाजून गेले. यायची वेळ झाली त्यांची."
तेवढ्यात काकांचा मोबाईल वाजला..
" हॅलो, .. हो बोलतोय.. हो या की या.. सगळं तयार आहे. .. ok.. चालेल.. काही काळजी करू नका.. या या वाट बघतोय."
आम्ही सगळेच काकांकडे बघायला लागलो...
" पहिली गाडी आली..बोपण्णांच्या दूकानाजवळ आहेत. नातवंडं वेगळ्या कार नी येतायत."
"चला मग काका."
" मा, बाबा येते..."
" सांभाळून जा ग बाळा."
" रिजा, घरा समोर चालली आहे ती.."
" पद्धत आहे ओ बोलायची"..
हसत हसत मी काकांच्या मागून निघाले. भक्त निवास गेल्या काही वर्षात खूप develope झाला. आता नाव भक्त निवास असलं तरी आम्ही एका सुंदर रिसॉर्ट सारखं ठेवलंय .. जांभ्या दगडाच बांधकाम शक्य तितकं इको फ्रेंडली.. कुलकर्णी काकांनी मला भक्तनिवास मध्ये काहीही करण्याची मुभा दिली आणि तितकाच भक्कम support पण केला..
मिनी बस आली तेवढ्यात..एकामागोमाग एक माणसं उतरायला लागली. आजोबा आज्जी दिसले मस्त वाटलं!..
पटकन नमस्कार केला..
"अरे.. रुही खुश रहा बाळा.. सगळं मनासारखं होऊदे!"
" काय हो, ही अजूनच गोड दिसायला लागली आहे."
" काश्मिरी origin आहे तो.. !"
मला असं कोणी कौतुक केलं की अवघडल्या सारखं होतं..खूप छान आणि खूप awkward असं काही तरी मधलं feeling असतं..यावर सोप्पा उपाय..just एक pleasant smile.
कुलकर्णी काकांनी सगळ्यांचं welcome केलं आणि त्यांना घेऊन आम्ही आत आलो ..
सगळ्यांना काही मी ओळखत नव्हते. फक्त आजोबा आज्जी आणि त्यांचा छोटा मुलगा नितीन काका. बाकी आज त्यांचा मोठा मुलगा राजीव , सून शारदा आणि नितीन काकांची बायको शाल्मली, त्यांच्या दोन मुली कोमल आणि स्वरा. कोमलचा नवरा भास्कर आणि मुलगा ओजस सुध्दा आले आहेत. मोठा मुलगा, राजीव काका यांना सुद्धा दोन मुलं आहेत. ते दोघं separate car नी येतायत..त्यांना यायला अजून अर्धा तास लागेल ..
कुलकर्णी काकांनी मंडळींना डायनिंग area मध्ये नेलं. देवळाच्या मागच्या बाजूला कठड्या खाली अरबी समुद्र आहे. त्यामुळं भक्त निवास ला एका बाजूनी खूप छान view मिळतो.. आज त्यांच्या breakfast ची सोय गार्डन मध्येच गझिबो मध्ये केली आहे.. गार वारा आहे.. समोर सुंदर खळखळणारा समुद्र.. आणि breakfast साठी कांदा बटाटा भजी, कांदे पोहे, भाज्यांचं उप्पिट, बरोबर टोमॅटो चटणी आणि खोबऱ्याची चटणी आणि फक्कड मसाला चहा.. माझ्यासारख्यांना on demand special coffee!!
सगळ्या arrangements पुन्हा एकदा check करून मी पुढच्या तयारीसाठी आतमध्ये गेले..
VOUS LISEZ
स्वप्नातलं घर
Aléatoireही रूहीची, साहिलची आणि त्यांच्या घरच्यांची गोष्ट आहे. छोट्या छोट्या वागण्यातल्या बदलांनी नात्यांमध्ये किती फरक पडतो याची खरी खुरी गोष्ट. सोयीसाठी नावं बदललेली असली तरी आपल्यातल्याच एका कुटुंबाची गोष्ट. एक सकारात्मक गोष्ट लिहायचा प्रयत्न केला आहे. आण...