4. पहिली ओळख..

26 0 0
                                    

आतमध्ये आलो आणि रुही दिसली, "रुही बाळा झाली सगळी तयारी?"
" हो काका, रूम ready आहेत. समान सध्या सगळं एकत्र मधल्या चौकात ठेवलंय. नंतर ते आले की ज्यांचं त्यांचं त्यांच्या रूम मध्ये देऊ.. "
"झक्कास... चल मग आता मी तुझी ओळख करून देतो."

रूही POV. ( रूही च्या मनातून...)

काका आणि मी बाहेर आलो तर सगळे गप्पांमध्ये busy होते आणि जोरजोरात हसत होते.. किती छान family आहे.. बरेच जण आहेत. जावा जावा सुद्धा अगदी मैत्रिणी सारख्या दंगा करत होत्या.. आपृप वाटत होतं बघून.. काकांनी सगळ्यांशी ओळख करून दिली...
शाल्मली काकू -" रुही, कुलकर्णी दादा म्हणाले हे सगळं सध्या तू बघती आहेस."
" मी काकांना मदत करते बघायला. बऱ्याच लोकांची मेहनत आहे भक्त निवासाच्या मागं."
आजोबा -  बाळा आई बाबा कसे आहेत?
"अगदी छान आजोबा.. सध्या नोव्हेंबर असल्यामुळे आराम आहे..उन्हाळा सुरू झाला की खूप गडबड ,कामाची घाई सुरू होते."
आज्जी - चंद्रकांता कशी आहे गं..? किती दिवसात भेटले नाही तिला..आज संध्याकाळी येते मी तिला भेटायला ..
" हो नक्की या.. ज्जी एकदम मजेत आहे.. मा बरोबर दिवसभर तीसुद्धा जमेल ते करत असती.."
"चालेल आता तुमचं चालुद्या.. मी निघते..भेटू परत दुपारी..आराम करा..काहीही लागलं तर सांगा.. आज्जी आजोबा, औषधं किंवा इतर काही मदत लागली तरी सांगा..काहीही सांगायला संकोच करू नका."

साहिल POV ( साहिल च्या मनातून..)

मी आजपर्यंत कधीच इतका कुणाकडं attract झालो नाही.. आता दुबई मध्ये settle झालो आहे..नक्कीच permanently नाही पण सध्या तरी मला भारतात तशी equivalent job apportunity नाही.. प्रश्न फक्त पैसा हा नाही आहे..निदान माझा तरी नक्कीच नाही..पण काम करताना challanges असतील तर काम करायला मजा येते..मला work load आणि प्रेशर दोन्ही handle करायला आवडतं..
आत्तापर्यंत काही relationships मध्ये होतो मी.. पण nothing serious.. कारण लग्न आणि माझं life याबद्दल मी खूप clear आहे..
आज तिला बघितलं आणि विसरूनच गेलो की माझे आई बाबा आणि सगळेच आजूबाजूला आहेत. M sure मी जी reaction दिली त्यानंतर आता आई आणि काकूच्या डोक्यात बरीच चक्रं सुरू झाली असतील .. तसंही गेली बरीच वर्ष मला लग्न कर म्हणतायत..मीच पुढं पुढं ढकलत होतो.. कारण तसं कधी कोणी भेटलंच नव्हतं.. आणि लग्न ही मोठी commitment होती.. आज रुहीला बघून पण एक खूप strong pull जाणवला..m sure ती लहान आहे पण still जे मी feel केलं त्याचं कोणतंही practical explanation नाहीए माझ्याकडं.. कदाचित त्यामुळं असेल पण माझी curiosity अजूनच वाढली आहे.
आम्हाला bye म्हणून ती गायब झाली..
पुन्हा दुपारी भेटणारच होतो अर्थात. Now I am looking forward to this vacation..
भास्कर - काय मग ?
मी फक्त एक भुवई उंचावून त्याच्याकडं बघितलं..
काकू - " संध्याकाळी जाऊ शकतो सगळे भेटायला .. "
काका - शाल्मलीsss
काकू - शारदा जाऊया काय गं आईंन बरोबर त्यांची जुनी मैत्री आहे..भेटून येऊया...
काका - शाल्मली चल जरा रूम च बघून येऊया..
यांची नक्की काहीतरी खिचडी सुरू झाली आहे..
God.. यांना शक्य असेल तर कांदेपोहे कार्यक्रम करतील evening ला.
What will be my reaction to that?
Is she attractive? - yes.
कोणाला खुळं बनवतोयस she is gorgeous... most stunning girl I've ever seen..
But I dont know her.. तिचे likes dislikes.. what she expects from her life.. whether we r compatible or not.. many things...
एक एक करत सगळेच आत रूम मध्ये गेले..
मी आणि बाबा मागं उरलो. मी बाबांच्या close आहे.. त्यामुळं त्यांच्याशी बोलू शकेन.. त्यांचं एक mature, logical reasoning असतं जे मी खूप appreciate करतो.. आणि दुसरं ते direct point to point बोलतात..no timepass! त्यांच्या बरोबरच्या गप्पा helps me alot..

बाबा - तू awfully शांत आहेस. All ok?
" Yuppp! Just ..."
बाबा - एकंदरीत ती चांगली मुलगी वाटती आहे.
God! यांना कसं कळलं...
बाबा - " बाप आहे मी तुझा."
आता मी फक्त हसून बघत होतो..
"लग्न हा decision सोपा नाही आहे. नक्कीच नाही..
पण लग्नानंतर हळू हळू ते नातं उलगडत जाण्यात सुधा मजा आहे..तुझी आई अशीच आली माझ्या आयुष्यात. घरचं सगळ बघून वर वर चौकशा करून ठरलं आमचं लग्न आणि झालं रीती भाती प्रमाणं.. अडचणी प्रत्येक नात्यात असतात, येतात ..आम्हालाही आल्या. पण आम्ही सावरलं एकमेकाला.. "
" बाबा हे खूप पटकन होतंय.. m sure तिला काही idea सुद्धा नसेल ..plus ती लहान दिसती आहे थोडी. तिच्यासाठी खूप लवकर आहे."
"हममम... बघू let things happen on its own accord.."
आम्ही दोघं आतमध्ये आलो..
"फार classic architecture आणि interior आहे याचं.. भक्त निवास हे नाव बिलकुल justice करत नाही याला .."
बाबा - true!
रुही समोरून चालत येत होती... God.. heartbeat ऐकू येतायत मला माझ्याच literally.. हे जे काही आहे हे पहिल्यांदा होतंय..

" काका तुमचं luggage room मध्ये ठेवलंय. काकू रूम मध्येच आहेत... तुम्ही साहिल ना? "
मी फक्त होकारार्थी मान हलवली. बाकी काही बोलायला घशातून आवाजच येत नव्हता..
" तुमची रूम वरच्या मजल्यावर आहे.. तुमचं सुद्धा luggage ठेवलंय.. किल्ली रूम मधेच आहे. Have a nice stay!"
एवढं बोलून ती गोड हसली आणि पुन्हा गायब झाली.
Finally m able to breathe again.. बाळा सहिल सगळं logic एका बाजूला आणि हे जे काही मी feel करतोय ते एका बाजूला... God..m in trouble..

स्वप्नातलं घर Onde histórias criam vida. Descubra agora