दिसता तुझ्या नजरेत नशा
नजरेने मी उत्तर द्यावे
प्रणयाला तुझ्या प्रणयाने निरुत्तर करावेफक्त माझ्या इशार्याने
तू लाजून चूर व्हावे
प्रणयाला तुझ्या प्रणयाने निरुत्तर करावे. .मदनाचा पुतळा जणू तू
स्पर्शाने रोम रोम शहारावे
प्रणयाला तुझ्या प्रणयाने निरुत्तर करावे. .येता कवेत ओठांवरचे
गुलकंद मी स्पर्शावे. .
प्रणयाला तुझ्या प्रणयाने निरुत्तर करावे. .तुझ्या नजरेतून मादकतेला
फक्त नजरे ने आव्हान मी द्यावे. .
प्रणयाला तुझ्या प्रणयाने निरुत्तर करावे. .देहास तुझ्या चिंब प्रेमात न्
हाऊ मी घालावे. .
प्रणयाला तुझ्या प्रणयाने निरुत्तर करावे. .आतुरतेला दोन जीवांच्या
ओढीत सामिल करावे
प्रणयाला तुझ्या प्रणयाने निरुत्तर करावे. .प्रेम पाझरता दोन जीवांनी
मिलनात आकंठ डुंबावे
प्रणयाला तुझ्या प्रणयाने निरुत्तर करावे. .
![](https://img.wattpad.com/cover/367050008-288-k416976.jpg)