निर्णय - भाग १

20.1K 31 3
                                    

"मी सुजय देशमुख राहणार पुणे. माझ्या पत्नीसमोर आज दिनांक २०/०५/२०१९ रोजी हे मान्य करतो कि , इथून पुढे माझी पत्नी निशा हिच्या खाजगी आयुष्यात डोकावणार नाही. तसेच तिला जर वाटले कि ... कि कोणासोबत विवाहबाह्य संबंध ठेवावेत, तर तिच्या एका विवाह बाह्य संबंधाला माझी काहीही हरकत असणार नाही."

"बस बस.." एवढेच हवे होते. निशा म्हणाली आणि तिने मोबाईल चा रेकॉर्डर बंद केला.

"हम्म..." मी पुढे एवढेच बोलू शकलो.

" सुजय हे स्टेटमेंट बोलणे वेगळे आणि जगणे वेगळे. तुला खरेच असे वाटते ना कि तू हे पचवू शकशील?" निशाने विचारले.

"निशा... तुझ्या सोबत मी जो अन्याय केलाय, तो पहाता मला हीच शिक्षा योग्य आहे. आय विल ट्राय.." मी अपराधी मनाने उत्तरलो.

"सुजय... माझे तुझ्यावर गॉड नोज का एवढे प्रेम आहे... मी हे काही करेनच असं नाही... पण कधी कधी मनाची अवस्था अशी होते की तुझा खूप राग येतो. सूड उगवावासा वाटतो. जे काही तू माझ्याशी वागलास त्याचीच टेस्ट तुला द्यावी वाटते. परत एकदा सांगते. मी असे काही करेनच असे सांगता येत नाही. तरीपण असे काही घडलेच तर माझ्या मनाला ही गोष्ट खाऊ नये म्हणून मी हि परवानगी घेतली आहे." निशा म्हणाली.

"निशा.. तुझा राग मधून मधून उफाळून येणे स्वाभाविक आहे. तुझ्या मनाची ही अवस्था मीच केलीये. पण खरेच सांगतो. मला मनापासून खूप पश्चाताप आहे ह्या गोष्टीचा." मी तिला जवळ घेत म्हणालो. तिने माझ्या खांद्यावर डोके ठेवले.

"आय लव्ह यू सुजय."

" आय लव्ह यू निशा."


****


त्या दिवशी माझ्याकडून माझ्या पत्नीने असे काही मागितले कि माझ्या डोक्यामध्ये भयंकर वादळ उठले. ती तसे काही मागण्याची कधीच शक्यता नव्हती. पण माझी खाज मलाच नडली. माझे आणि निशाचे लग्न ठरवणारी माझी आणि तिची एक सामायिक मैत्रीण होती. सोनम

सोनमचे लग्न आमचे लग्न ठरवताना नुकतेच झाले होते. लग्न आधी तिचे जे काही "मॅटर्स" होते ते सगळे मला ठाऊक होते. मी तिचा खूपच क्लोज मित्र होतो. आम्हाला कधीही एकमेकांबद्दल तसली ओढ वाटली नाही. निर्भेळ मैत्री होती आमची. जेव्हा तिने निशाला मला भेटवले त्या पहिल्या भेटीतच निशा मला जाम भावली. ती होतीच तशी. खूप सुंदर. आम्ही तिघे एका कंपनी मध्ये कामाला होतॊ. मी थोडा सिनिअर होतो. कामा निमित्त माझ्या आणि सोनमच्या भेटी झाल्या आणि आम्ही घट्ट मित्र झालो. निशा तिच्या डिपार्टमेंटला नंतर जॉईन झाली. त्यामुळे तिची आणि सोनमची मैत्री झाली. निशाचे सौंदर्य, तिची मार्दवता अशी काही होती कि कंपनीमध्ये तिच्यासाठी बऱ्याच एलिजिबल यंगस्टर्स मध्ये शर्यत लागली. पण माझ्याकडे सोनमचे वाईल्ड कार्ड असल्यामुळे माझा नंबर डायरेक्ट वरती म्हणजे ओळखीत लागला.

पुढचं काम मग तितकं अवघड नसते. माझ्याकडे माझा चार्म होता. खूप साऱ्या गोष्टींमधला इंटरेस्ट, माझी स्केचिंगची हॉबी.. माझे ट्रेक्स.. फिजिकल फिटनेस सर्व काही निशाला देखील अपील झाले. लवकरच सोनम साईडला होऊन आम्ही दोघे क्लोज आलो. पुढं मग सगळ्या गोष्टी अगदी अपेक्षेप्रमाणे झाल्या. मी तिला प्रपोज करायच्या आधी तिनेच मला प्रपोज केले. मग मी माझ्या आणि तिच्या दोघांच्याही घरी बोललो. तिच्या घरून होकार मिळाला. माझ्या घरी पण काही विरोध वैगरे झाला नाही. आमचे छान मोठे लग्न झाले. आमच्यावर प्रेमाचा वर्षाव होत होता. तर काहीजण जळत पण होते. लग्नानन्तर निशाला पुढचे शिक्षण घ्यायचे होते, म्हणून तिने जॉब सोडला. तिच्या सोबत गोवा करून आलो. नंतर बेडमध्ये जमेल तेवढ्या वेळा एकमेकांना प्रणयधुंद करत शृंगाराच्या नशेत रात्री घालवू लागलो.

तिची फिगर.. तिची कांती.. मादक सुंदर चेहरा. खूप आखीव रेखीव आणि घडीव मुर्ती असल्यासारखी निशा लग्नानंतर आणखीच सुंदर दिसू लागली. तिच्याकडे मान वळून न पाहणारा पुरुष विरळाच. तिच्या कॉलेजमधल्या एक दोन जणांनी तर तिला अविवाहित समजून प्रपोज पण केले होते. निशाला अशा गोष्टींची सवय असल्यामुळे तिने सहज हॅण्डल केले. तिने मला हि गोष्ट भीत भीत सांगितली. मला ह्या गोष्टींचा कधी राग येत नसत. स्त्रीकडे पुरुषाने आकर्षित होणे नैसर्गिक आहे. नुसते कोणी विचारले म्हणून काय झालं? मी माझा हा विचार निशाला पण समजावला. तिला माझा आदर ह्या गोष्टींमुळे जास्त वाटत होता कि, मी कधीच माझे वागणे तिच्यासोबत टिपिकल नवर्यांसारखे ठेवले नव्हते. तिला कुठेही जायचे यायचे असेल तर माझ्या परवानगीची गरज नाही असे मी तिला आधीच सांगितले होते. घरात पण सगळी कामे दोघेही वाटून करत असू. कारण घर दोघांचे आहे आणि दोघांनी एफर्ट घ्यायचे हे मी तिला लग्नाआधीच सांगितले होते. एकंदर आमची केमेस्ट्री दृष्ट लागण्याजोगी होती.

पुढील ४ - ५ वर्षांत आम्हाला एक मुलगा झाला. निशाने काही काळ घरी थांबून मग मुलगा ३ वर्षांचा झाल्यावर एका ठिकाणी लेक्चरर म्हणून नोकरी धरली. मुलाला माझे आईवडील पाहात होते. आमच्या इमारत वजा घरात आईवडील पहिल्या मजल्यावर आणि माझा संसार दुसऱ्या मजल्यावर सुरु होता. खाली पार्किंग आणि गार्डन होते. निशाचे रुटीन बसले होते. मुलगा शाळेत जायला लागला होता. आमचे आयुष्य एका रेषेत चालले होते. निशा पूर्वीसारखीच रसरशीत दिसत होती. तिच्या सौंदर्याला मातृत्वामुळे आणखी झळाळी आली होती. ती आता सौंदर्याने लगडलेली अप्सरा झाली होती. तिचा मूळचा गोरा रंग आणखी खुलला होता. तिच्या मापांमध्ये सगळीकडून २-२ इंचांची भर पडली होती. पोट हलकेच सुटले होते. तिची नॉर्मल डिलेव्हरी झालेली असल्यामुळे पोटावर टाके किव्वा स्ट्रेच मार्क्स वैगरे नव्हते. ३४-३०-३६ च्या मादक फिगरची माझी बायको पाहून माझ्या नात्यातील, मित्रमंडळींमधील कित्येक पुरुष तिच्याशी बोलायला तिच्यासोबत थोडासा वेळ घालवायला सतत उत्सुक असत. तिचा स्वभाव पण मनमिळाऊ असल्यामुळे तिला लोकांचे वावडे नव्हते.

तिच्या बऱ्याच ओळखी झाल्या होत्या. आम्ही बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी मॉल्स वैगरे मध्ये जायचो तेव्हा किमान डझन भर तरी पुरुष निशाला मनात ठेऊन घरी जात असतील. तिच्याकडे रोखून पाहणारा पुरुष पहिला की मी मुद्दाम तिला जास्त खेटायचो. अशी चार चौघांना अस्वस्थ करणारी स्त्री माझी बायको आहे याचा मला अभिमान वाटायचा. निशाचे लक्ष कधीच माझ्यावरून दुसरीकडे जाणे शक्य नव्हते.

पण मी मात्र सुंदर बायको असून सुद्धा माझं स्किल दुसरीकडे वापरायचा प्रयत्न करत होतो. खरेतर माझा आत्मविश्वास कधीच वाढला होता. जेव्हा निशा प्रेग्नन्ट होती तेव्हा माझे २ स्त्रियांसोबत शारीरिक संबंध आले होते. त्यांना मी अगदी काही दिवसात माझ्याकडे वळवू शकलो. एक माझ्या नात्यातली स्त्री होती तर दुसरी निशाची कॉलेज मैत्रीण होती. त्यांच्याकडून फक्त शारीरिक सुखाचा आनंद घेण्याच्या इराद्याने मी त्यांना जवळ केले. माझे प्रेम निशाच होती. निशाकडून मिळणाऱ्या नियमित शरिरिक सुखाला चटावलेल्या शरीराला तिचा दुरावा सहन झाला नाही. ह्या स्त्रिया माझ्याकडे वळायचे कारण पण खरेतर निशाच होती. कारण अशा सुंदर स्त्रीचा पती असलेल्या माझ्यामधे काही क्वालिटीज सरासरी पुरुशांपेक्षा जास्तच असण्याची शक्यता त्यांना वाटली होती. अर्थात मी त्यांना समाधान दिले त्याची पोच मला वेळोवेळी मिळाली. तो व्यभिचार सुरक्षित पणे मी अजूनही मनात जपून ठेवला आहे. निशाला त्याचा सुगावा लागला नाही.

पण एका ठिकाणी मात्र मी अडकलो. सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण माझं बऱ्यापैकी होत. वाचनाची फार पूर्वी पासून आवड असलेल्या मला, माझा शब्दसंग्रह चांगला असल्यामुळं चुरचुरीत गप्पा चांगल्या पैकी मारता येत होत्या. मुळात माझी विनोद बुद्धी चांगली आहे . त्यामुळे मेसेजिंग ग्रुपवर किव्वा सोशल साइट्स वर मी माझ्या व्यक्तिमत्वाची छाप लगेच पाडत असे. निशाला ह्या गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट नव्हता. ती होती सगळीकडे पण तिचा वापर अतिशय कमी होता. त्यातून ती माझा मोबाईल कधीच चेक करत नसे.

सोनम. कंपनीमध्ये तिची दुसऱ्या डिपार्टमेंटला बदली झाल्यापासून तिचा माझा कॉन्टॅक्ट फार नव्हता. कधी भेटली तर बोलायचो. कॉल्स वैगरे तर बंदच झाले होते. आम्ही एका ट्रेनिंग मध्ये एकमेकांना भेटलो. बऱ्याच काळानंतर तिचा माझा कॉन्टॅक्ट वाढला. कंपनीच्या ऑफिशिअल चॅट साईट वरून आमच्या गप्पा रंगू लागल्या. सुरुवातीला खेळीमेळीचे होते सर्व काही. पण नंतर मात्र तिच्या आणि माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे होऊ लागले. त्यात मला असे कळले की तिच्या वैवाहिक आयुष्यात खूपच अडचणी होत्या. तिचा नवरा तिला अतिशय वाईट वागणूक देत होता. त्याला कारण होते कि, तिच्या गतायुष्यात झालेल्या काही गोष्टी त्याला समजल्या होत्या. पण म्हणून त्यानं तिला तसे दर्जाहीन वागवणे मला पटले नाही. मी तिला काहि सल्ले दिले. ज्यामुळं तिने तिच्या नवऱ्याला चांगला धडा शिकवला. तिचा नवरा गुजरातला जॉब पाहून तिकडं राहायला गेला. कारण दरम्यान खूप काही गोष्टी झाल्यामुळे त्यांनी नात्यामध्ये काही काळ ब्रेक घ्यायचे ठरवले. तिला मुलबाळ नव्हते. थोडक्यात तिचा संसार काहीच फलद्रुप नव्हता. आमचे त्या संदर्भात बऱ्यापैकी बोलणे होत होते.

अशाच एक गाफील दिवशी सोनमने मोबाईलच्या मेसेंजरवर केलेला मेसेज निशाने वाचला. मग तीन सगळेच मेसेजेस वाचून काढले. संध्याकाळी जेवणानंतर रात्री तिने तो विषय काढला. माझा आणि तिचा त्यावरून वाद असा झाला कि सोनम तिची पण मैत्रीण होती मग तिने एवढ्या वर्षांनंतर संपर्क ठेवला तो फक्त माझ्याशी तिच्याशी नाही. त्यात तिला वावगे वाटले. आणि मी सुद्धा ह्याचा उल्लेख निशापाशी केला नाही हेही तिला चुकीचे वाटत होते. मला तिचे म्हणणे पटले. रादर मी केलेली चूक मला समजली. मी तिची माफी मागून तो किस्सा तिथेच संपवला होता.

काहि दिवस मी सोनमला टाळले. पण तिला माझी सवय झाली होती. ती मेसेजेस किवा कॉल करतच होती. मग तो दिवस आला. मी ऑफिस मध्ये होतो. मला सोनमचा कॉल आला.

"सुजय ऐकणं ..मला न थोडी कण कण आहे. मला घरी सोडतोस का? आज मी कार आणली आहे पण मला चालवणे शक्य नाहीये." सोनम म्हणाली.

आजवर मला सोनम बद्दल तसे आकर्षण वाटले नव्हते. पण त्यादिवशी तिच्या घरात मिळालेला तो एकांत आणि ती निवांत वेळ ह्याने ते साधले. आमच्यात भयानक प्रकारचे कामुक वादळ आले. त्यात आम्ही दोघेही जोरकस पणे प्रवाहित झालो. मला कळत नव्हते कि माझी उत्तेजना नक्की कशात आहे. सोनमच्या शरीरातून निघणाऱ्या कामुक लहरींमुळे मी उत्तेजित झालो आहे कि बायकोने बजावून सुद्धा मी हे पापकर्म करतोय हि भावना मला जास्त उद्दीपित करत होती. सोनम सोबत संध्याकाळ पर्यंत रत होऊन मी तिची आणि स्वतःची तृप्ती करून घेतली. त्यानंतर हे वाढले. आम्ही दोघे जमेल तेव्हा आणि जमेल तसे शृंगाररसात बुडू लागलो. तिच्या घरी जागा आणि वेळ दोन्हीपण पुष्कळ होते. ती भले निशाइतकी सुंदर नव्हती. पण ती वेगळी स्त्री होती. शिवाय विवाहित स्त्री अविवाहित स्त्री पेक्षा जास्त सुख देते हे मला अनुभवाने माहित होते. माझ्या मते त्याचे कारण असते कि शृंगारात नवऱ्यासमोर स्त्री सर्वांगाने मुक्त होऊन सामील होत नाही. तिला तिची प्रतिमा तिथे सोज्वळ ठेवायची असते. पण तिला जर परपुरुषासोबत अशी संधी मिळाली तर ती सर्वांगाने अनुभव घ्यायला तत्पर असते. सोनम माझ्यासोबत प्रणय करताना स्वतःला झोकून देत असे. जुनी जाणती मैत्रीण असली तरी तिच्यासोबत प्रणय नवा नवा होता. मलाही तिच्या शरीराची चटक लागली होती.

एके दिवशी मी सकाळी १० वाजता ऑफिस कलिग्स सोबत कॉफी पीत बसलो होतो. तेव्हा निशाचा कॉल आला.

"हा निशा बोल." मी म्हणालो.

४-५ सेकंद शांततेत गेले. "निशा?" मी परत एकदा फोन वर हाक मारली.

"सुजय... सुजय.. तुझं आणि सोनमचं काय चालूये?" माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या अशा अचानक आलेल्या प्रश्नाने माझे अवसानच गळाले.

मी ग्रुप पासून थोडा लांब येत निशाला विचारले. "काय... काय चालूये निशा? असं का विचारत आहेस?" माझे भंबेरी उडाली होती.

" सगळं माहित झालंय मला सुजय.. तुझ्या तोंडून फक्त कबुली घ्यायची आहे मला." निशा म्हणाली.

" निशा...अगं ... मी ... तिच्याशी फक्त बोलतो... मैत्रीण आहे ना जुनी..." मी बचाव करण्याचा प्रयत्न करून पहिला. पण निशाने मला जे काही सांगितले त्यामुळे मी काहीही बोलायच्या लायकीचा राहिलो नाही.

तिने माझं व्हाट्स ऍप स्कॅन केले होते. ती तिच्या मोबाइलवरून माझे सर्व मेसेजेस वाचू शकत होती. इतक्यात मी घरी जाताना सोनमचे मेसेजेस डिलीट करून जात होतो. पण काहीतरी माझ्याकडूनच चूक झाली होती ज्यामुळे निशाला संशय आला. माझ्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता.

निशाने ह्यावेळी मात्र मला सोडून द्यायची धमकी दिली. त्या रात्री ती घरी आलीच नाही. तिने तिच्या वडिलांकडे जाऊन सगळे सांगितले. मी सासर्यांशी बोललो. त्यांना सांगितले की मी फक्त मैत्रीच्या नात्याने सोनमशी बोलत होतो. निशाला आवडत नव्हते म्हणून मी तिला सांगितले नाही. माझ्या नशिबाने निशाणे जेवढं संभाषण व्हाट्स अप वर वाचलं होतं. त्यात कुठेही आमचा भेटायचा उल्लेख नव्हता. किंवा कसलेही लूज बोलणे नव्हते. मी सोनमला रात्री मेसेजेस करून निशाला आपण कॉन्टॅक्ट मध्ये आहोत हे सांगितले. पण आमच्या शारीरिक संबंधांचे तीला कळले नाही हेही सांगितले.

पुढचा जवळजवळ एक महिना प्रचंड तणावाखाली गेला. अगदी निशाने वकिलांकडे जाऊन कायदेशीर गोष्टींची चौकशी सुरु केली होती. मुलाला पाळणाघरात ठेऊन तिने रूम पाहायचे प्रयत्न चालू केले होते. तिचे आई वडील तिला माझ्याबाजूने आणि आमच्या संसाराच्याच बाजूने गोष्टी पटवून देत होते. मी बरीच आर्जवे आणि विनंत्या करून करून हळूहळू तिचे मन वळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. तिने हे सगळे व्हायच्या आधी एका योग शिबिरासाठी नाव नोंदवले होते. तिच्या वडिलांनी तिला तिकडे जाण्याचा सल्ला दिला. जेणेकरून ती एकटी जरा शांत डोक्याने विचार करू शकेल आणि तिच्या धगधगत्या मनाला पण काहीकाळ शांतता मिळेल. शिबीर १५ दिवसांचे होते. ती किमान त्यासाठीतरी तयार झाली. पंधरा दिवस ती तिकडे राहून आली. तिथल्या वातावरणाने म्हणा किंवा केलेल्या योग साधनेने म्हणा. तिच्या मनाची अवस्था शांत झालेली मला जाणवली. माझ्याबाबतीत असलेला राग संपूर्ण गेलेला नसला तरी तो काहीसा कमी नक्कीच झाला होता. काम घर आणि मुलगा ह्यात ती दिवस घालवत होती. पुढचे आणखी पंधरा दिवस असेच अबोल्यात गेले. अर्थात मी जमेल तितकं बोलण्याचा प्रयत्न करत होतो. ती आता सोडून जायच्या गोष्टी करत नव्हती इतका बदल मला पूरे होता.

आणखी काही दिवसांनी आमची गाडी परत रुळावर येऊ लागली. अगदी एका बेडवर झोपण्यापर्यंत आम्ही पोहोचलो. काही दिवसांनी आमच्यात संबंधही आला. मला जीव भांड्यात पडल्याचा अनुभव आला. ह्या सर्व दिवसात मी एक गोष्ट मनाशी पक्की ठरवली. पुन्हा कधीही विवाह बाह्य संबंध ठेवायचे नाही. सोनमशी मी सगळे संबंध संपवले. मला पुन्हा माझ्या पहिली वाहिल्या प्रेमाचा ध्यास लागला होता. निशाच्या दुखऱ्या मनाला उभारी देण्याव्यतिरिक्त मला इतर काहीही सुचत नव्हते. माझे प्रयत्न यशस्वी झाले होते. निशा परत आधीसारखे वागत होती. हा... मधून मधून उशीर वैगरे झाला किंवा फोन बीजी लागला तर ती उलट तपासणी घेत असे. मला त्यात काहीही वाईट वाटत नव्हते कारण तिचे तसे बदललेले वागणे मला सहन करणे क्रमप्राप्त होते.

तिच्या वागणुकीत आणखी एक बदल घडलेला मला जाणवला. ती पूर्वी कामावर जाताना पोशाख असा करायची कि त्यात थोडाही सैलपणा किंवा सवंगपणा डोकावत नसे. आताशा पण तसे नव्हते. तरीपण तिच्या ड्रेसिंग आणि देहबोली मध्ये थोडासा बोल्डनेस आला होता. ती तिच्या लूक्स बद्दल थोडी जास्त काळजी घेऊ लागली होती. पूर्वी प्रमाणे सोबर पंजाबी ड्रेस न वापरता हल्ली ती शॉर्ट कुर्ती आणि लेगिन्स वर भर देऊ लागली होती. आठवड्यातून एकदा तरी साडी घालून छान नटून कामावर जाऊ लागली होती. पार्लरच्या भेटी पण वाढल्या होत्या. एकंदरीत तिच्यातला बदल मला जाणवत होता. पूर्वीपेक्षा जास्त मादक दिसू लागली होती. स्लिव्हलेस तिने तिच्या कॉलेज मध्ये कधीही वापरला नव्हता. पण आता तिचे ब्लाउज किंवा कुर्ती बऱ्याचदा स्लिव्हलेस असत. तिने अंडरगार्मेंटचे कलेक्शन पण बदलले होते. जाळीदार आणि फॅन्सी ब्रा पॅन्टीज नी तिचे वॉर्डरोब काबीज केले. तिचे स्वतःचे रूप पालटले होते. केसांना कलर केला होता. हाय हिल्स वापरू लागली होती. त्यामुळे तिचे टाईट लेगिंनमधले नितम्ब आणखी उठावदार होऊन पाहणार्याला अस्वस्थ करत असे. तिचा बदल तिच्या व्हायला अटीट्युडला अगदी सूट करत होता. मला वाटत होते कि हा सर्व बदल माझ्यासाठी आहे मी खुश होतो. 

क्रमश:

निर्णयWhere stories live. Discover now