आमच्या शहरातला गणेशोत्सव अतिशय जगप्रसिद्ध आहे. मला आणि निशाला मिरवणूक पाहायला जाम आवडते. आम्ही दहाव्या दिवशी मिरवणूक पाहायला शहरात गेलो होतो. अर्थात मुलाला गर्दीमुळे सोबत नेले नव्हते. अगदी प्राईम टाईम होता. खूपच गर्दी होती. आम्ही अगदी खेटून खेटून हळू पुढे सरकत होतो. अचानक काही कॉलेजच्या मुलामुलींचा घोळका सरळ लाईन करत आमच्याच जोडीला छेदत पुढे गेला. आम्ही आता वेगळे झालो. मला निशा दिसत होती. मी तिला हात हलवून आणि ओरडून माझ्याकडे पाहण्याचा इशारा करू लागलो. तेवढ्यात एक भलताच हात मला हात दाखवू लागला. तो पण निशाच्या जवळून. "विनोद उर्फ बंड्या." माझा मित्र. तो तिच्या मागे उभा होता. त्याने माझ्याकडे टाचा उंचावून हात दाखवला.
अरे हा इथे कसा? मी अशा विचारातच होतो. तेवढ्यात त्याने पाठमोऱ्या निशाला पहिले असावे. त्याने तिच्या जवळ जात तिच्या खांद्यावर हलकेच चापट टेकवली. मिरवणुकीच्या देखाव्यांमध्ये तल्लीन होऊन गेलेल्या निशाने मागे पहिले आणि परत नजर पुढे देखाव्याकडे वळवली. पण पुढच्या क्षणीच तिने मान वळवली आणि डोळे मोठे करून तिने बंड्याकडे पाहिले. तिने छानशी मोठी स्माईल देत त्याचे स्वागत केले. मी गर्दीमध्ये पुरता अडकलो होतो. त्यामुळे मला न त्यांच्याकडे सरकता येत होते न मला त्यांचा आवाज येत होता. पण ते दोघे हसत बोलत होते. मधेच माझ्या दिशेला दोघांनी पाहात स्माईल पण दिली. मी पण मंद हसलो. बंड्या बरोबर तिच्या मागे उभा होता. जिथे मला असायला हवे होते तिथे तो होता. नाईलाज माणसाला बघ्याची भूमिका कशी पार पाडायला लावतो मला कळत होते. माझे लक्ष आता मिरवणुकीकडे कमी आणि त्यांच्याकडे जास्त जात होते. दोघे मिरवणुकीचा आस्वाद घेत होते. गर्दी वाढल्यामुळे दोघांमध्ये अंतर फार नव्हते. म्हणजे बंड्या तिला जवळ जवळ खेटून उभा असावा. त्याने एका कडेने गळ्यातला कॅमेरा हातात धरून फोटो काढणे चालू केले होते. मधूनच तो निशाला एखादा चांगला क्लिक दाखवत होता. त्या क्षणाला मला जाणवले कि दोघे बरेच जवळ होते. माझ्याकडे त्यांनी एकदाही कटाक्ष टाकला नव्हता.