निर्णय - भाग ३

9K 12 4
                                    

काका कशासाठी, का ? असले सर्व प्रश्न विचारून थकले. पण मी फक्त त्यांना भेटा एवढेच बोलले. जिथे आमचे शिबीर होते ते ठिकाण भाड्याने घेतलेली एक आश्रम शाळा होती. ती २ मजली होती. खालच्या मजल्यावर आम्हा सर्वांची व्यवस्था होती. जेवण झाल्यावर मी काकांना गाठले. त्यांना फक्त सांगितले की मी वरच्यामजल्यावर जात आहे काहीवेळात तुम्ही तिथे पोहचा. त्यांनी मान डोलावली. संध्याकाळी जेवणानंतर शक्यतो शिबिरात काही कार्यक्रम असला तर तो अटेंड करणे ऐच्छिक होते. त्या दिवशी कोणतेतरी व्याख्यान होते. सर्व जण तिकडे गेले. मी पहिल्या मजल्यावर गेले. वरती अंधुक दिसत होते. थोडासा खालचा उजेड पडला होता. मी एक रूम चेक केली. रिकामी होती. नुसत्याच जुन्या गाद्या टाकल्या होत्या. काही कपाटे पण होती. जे करायचे डोक्यात होते मी त्याची तयारी केली. परत व्हरांड्यात येऊन थांबले. थंडीचे दिवस नव्हते पण अंगात थरथर होती. खरेच सांगते तुझा विचार एक क्षणही मनात आला नाही.

काहीवेळाने मला चाहूल लागली. जिन्यातुन काका वर आले. हळूहळू चालत येणारी त्यांची खुजी कृश मूर्ती माझ्या नजरेस पडली. माझीपण धडधड वाढली कारण मलाही हे सहज नव्हते.

"काका या माझ्या सोबत." ते जवळ आल्यावर मी म्हणाले. मी निघाले तसे ते माझ्या मागे आले. मी "ती" खोली उघडून आत गेले. काका पण आले. आत बराच अंधार होता. पण मागच्या खिडकीच्या झरोक्यातून उजेडाची हलकी तिरीप येत होती. मी भिंतीकडे पाहात होते आणि ते माझ्याकडे. शेवटी मी ब्रेक केले. मी त्यांना म्हणाले कि तुम्ही तुमचे आयुष्य असेच उपवासात घालवले. तुमच्या मनाच्या दुःखावर माझ्याकडून काही फुंकर घालता आली तर मला बरे वाटेल. ते माझ्याकडे बघत होते.

मी हात पसरले आणि त्यांना म्हणाले,"काका भोगून घ्या माझं सारं काही."

तो माणूस धजत नव्हता त्यामुळे मलाच पुढाकार घ्यावा लागणार होता. मी माझ्या अंगातून माझा टी शर्ट काढला. आयुष्यातले पहिले व्यभिचारी वर्तन माझ्याकडून सुरु झाले होते. पण मला कोणालातरी सुख पुरवायचे होते म्हणून मी ते करत होते. माझ्या शरीराकडे तो माणूस बघत होता. त्याचा श्वास जड झाला होता. त्याच्यासाठी अतिशय अनपेक्षित असलेली गोष्ट त्याच्यासोबत घडत होती. मी सरळ त्यांच्या जवळगेले आणि त्यांच्या शरीराला माझे अंग भिडले. माझ्यापेक्षा अर्धा एक फूट बारीक अशा त्या व्यक्तीला माझे ब्रा मध्ये बंदिस्त मोठे स्तन डोळ्यांसमोर दिसत होते. ज्यांना स्पर्श करायला आतुर आहोत असे कित्येक पुरुषांच्या नजरा मला सांगायच्या ते स्तन. तुझी इस्टेट. मी त्यांना खांद्यांना धरून माझ्या छातीला लावले. त्यांचे तोंड माझ्या स्तनांमध्ये घुसले. मी त्यांना जोरकस मिठी मारली. त्यांना उत्तेजित करून त्यांची क्षुधा भागवणे एवढेच माझ्या मनाने त्याक्षणी ठरवले होते. त्यांचा चेहरा आणि हात माझ्या छाती आणि पाठीवर फिरू लागले. माझ्या त्वचेच्या तलमतेने शेवटी त्यांना प्रतिसाद द्यायला भाग पाडले.

निर्णयWhere stories live. Discover now