सेवक - Part 5

18K 41 13
                                    

" मॅडम.. खाना तैयार है." तृप्तीच्या कानावर आवाज पडला. भुरेलाल बेडरूमच्या बाहेर उभा होता.

समीरला परत ऑफिसला जाऊन अडीच तीन तास झाले होते. तृप्ती तशीच पडली होती. पडल्या पडल्या तिचा डोळा लागला होता.

तृप्ती उठली आणि बेडरूमच्या दाराजवळ गेली. तसा तिला झटका बसला. सकाळचे प्रसंग तिला आठवले. भुरेलालने तिला खुले आव्हान दिले होते. ती किती निष्प्रभ ठरली होती. त्याने तिच्यावर उघड उघड हात टाकला होता. आता ती काय करणार होती? ती आणि भुरेलाल दिवसभर एकत्र असणार होते. तिच्या मनावर प्रचंड दडपण आले होते. कशी काय पुढच्या प्रसंगाला सामोरे जायचे तीला कळत नव्हते.

मॅडम खाना गरम है. टेबल पर रखा है. खा लिजिए गा." भुरेलालचा आणखी एकदा लांबून आवाज तिच्या कानी पडला.

तिने हलकेच दरवाजा उघडला. घरात शांतता होती म्हणजे भुरेलाल बाहेर गेला होता. तिने बाहेर येऊन कानोसा घेतला. बहुतेक बाजारामध्ये गेला असावा. म्हणून ती बाहेर आली. डायनिंग समोर जेवण रेडी होते. तिने वाढून घेतले आणि जेवली. परत बेडरूम मध्ये जाऊन तिने ताणून दिली. मध्ये कधीतरी भुरेलाल आला असावा. पण तिने दार उघडले नाही. ती संध्याकाळी ४ च्या सुमारासच बाहेर आली. तेव्हा तिला दिसले कि त्याने घर सगळे साफ करून ठेवले होते. स्वतःसाठी कॉफी बनवत तिने समीरला कॉल लावला.

त्याने पहिल्या रिंगला उचलला नाहीच. दुसऱ्या रिंग ला कॉल उचलला.

"हॅलो समीर."

"हा बोल तृप्ती."

"उरकतंय कारे तुझं काम लवकर?" तीने विचारले.

"नाही ग. ऑडिटर आत्ता आलाय. इथुंन पुढे मीटिंग चालणार. ह्या लोकांनी त्यानंतर डिनर प्लॅन केला आहे. बहुदा लेट नाईट होईल." त्याने एका दमात सगळी माहिती पुरवली.

"समीर काय रे मला फार भीती वाटते इथे एकटीला राहायला." ती रडवेली झाली होती.

"तृप्ती .. काय आहे हे? यू आर अ ग्रोन अप वूमन यार. लहान मुलांसारखे रडणे शोभते का तुला? मला इथे खूप लोड आहे. प्लिज आता तू मेंटल अडथळा आणू नकोस यात." समीर वैतागत म्हणाला.

सेवकUnde poveștirile trăiesc. Descoperă acum