हवेतील गारवा येणार्या पावसाची चाहूल देत होता. पक्षी किलबिलाट करत आपल्या घरट्यांकडे धाव घेत होते. अजून काळ्या ढगांनी आकाशात गर्दी केली नसली तरी त्यांची वाटचाल सुरू होती. उन्हाची दाहकता हळूहळू कमी होत होती. वार्याने आपला वेग किंचित वाढवला होता. झाडांच्या पानांची सळसळाट वरुण देवाच्या आगमनाची सलामीच जणू.
तीने आकाशाकडे नजर वर केली. चेहर्यावर थोडीशी चिंता पसरली. जाण भागच होत. पण पावसाने पाठलाग करून गाठले तर!
तो (पाऊस) यायच्या आधी गेले पाहिजे असा विचार करून ती व तीची आत्ते बहीण दुकानातून बाहेर पडल्या.
नवीन बांगड्या, कानातले डूल, डोक्यावरच्या क्लिप तीने घेतल्या होत्या. माहेरी आली की नेहमीच्या दुकानातून काही ना काही ती घेत असे.त्या दोघी जाण्यासाठी वळल्या आणि तिची व 'त्याची' नजरभेट झाली. खूप वेळे पासून तो तिला न्याहाळत होता. लग्नानंतर जवळपास सात वर्षांनी ती त्याला दिसली होती. त्याने तिला आधीच लग्नाची मागणी घातली होती, पण घरच्यांना तो पसंत नव्हता. हे गाव म्हणजे त्याचे आजोळ.
तीची नजर त्याच्यावर स्थिरावली होती.त्याच्यातही खूप बदल झाला होता. पुर्वी अंगाने सडपातळ असलेला तो आता खूप बदलला होता. व्यायाम करून पिळदार शरीरयष्टी कमावली होती त्याने. 'यालाच आपण नकार दिला होता काय'? ती विचारात पडली. समोर ओळखीच्या व्यक्तीला पाहिल्यावर काहीतरी प्रतिसाद द्यावा म्हणून तो हसला. तीने ही त्याला एक गोड स्माइल दिली. आणि दोघी घराकडे निघाल्या.
तिची छबी त्याच्या नजरे समोरून जात नव्हती. गोरीपान सोनेरी कांती, लांब सडक केस, उंची ही सौंदर्य गुणं तर तिच्या मध्ये लग्ना आधीच होती. लग्नानंतर त्यात आणखीनच भर पडलेली. यौवन अंग आपली प्रचिती देत होते. कोणताही पुरुष तिच्या कडे सहज आकर्षला जाईल असे तिचे सौंदर्य होते.
तो भानावर येऊन तिथून निघून गेला. इकडे हिने जाण्याची तयारी चालू केली.
"शैलजा"!! "अगं पाऊस खूप धरला आहे आजच्या दिवस थांब. उद्या जा." तिची आई तिला समजावायच्या सुरात म्हणाली.
ŞİMDİ OKUDUĞUN
एक पावसाळी रात्र
Romantizmकाही घटना अनपेक्षित पणे घडून जातात. त्या बदलवणे आपल्या हातात नसते. अशीच एक पावसाळी रात्र दोघांच्या नशिबी येते....त्याची ही कथा