उडी

666 4 1
                                    

सातव्या इयत्तेत गेल्यापासून एकट्याने रेल्वेचा प्रवास करू लागलो होतो, तेव्हाच्या प्रवासाची एक आठवण.

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नाशिकला माझ्या आज्जी-आजोबांना भेटायला गेलो होतो. जाताना मम्मी आणि लहान भावासोबत गेलो, पण आमच्या इथे क्रिकेटचे सामने असल्यामुळे मी काही दिवसांसाठी ठाण्याला जाण्याचा हट्ट धरला. पप्पा कामामुळे येऊ शकत नव्हते आणि मामा मला ठाण्याला घेऊन जाणार नव्हता, तर अण्णांनी मला एकट्याने ठाण्याला जाण्याची परवानगी दिली.

अण्णा मला पंचवटीमार्गे नाशिक बस डेपोपर्यंत घेऊन गेले. तिथून त्यांनी मला कसाराला जाणाऱ्या एसटीमध्ये बसवून दिलं ते एका अटीवर, ते म्हणजे क्रिकेटचे सामने संपल्यावर पुन्हा गावी यायचं. मी आधीच अट मान्य केली होती. पहिल्यांदाच मी एवढा लांबचा प्रवास एकट्याने करत होतो.

एसटीचा प्रवास एकट्याने सुरू झाला आणि घरातील सर्व मोठ्या मंडळींचे चेहरे डोळ्यासमोर आले.

मम्मी, 'काय अडलंय त्या क्रिकेटमध्ये? गावी आला आहेस तर आराम कर ना! आजी अण्णांसोबत वेळ घालव.'

पप्पा, 'नाशिकला सुद्धा मुलं क्रिकेट खेळतात, तिथे खेळ. मॅचसाठी ठाण्याला यायची काय गरज आहे? अभ्यासासाठी कधी एवढं केलं नाहीस.'

मोठा मामा, 'माझी गाडी घे आणि पाहिजे तेवढा हिंडत बस.'

आज्जी, 'मला कुरोड्या, पापड बनवायला मदत केली असतीस.'

छोटा मामा, 'मॅच जाऊ दे, आपण पांडवलेणीला जाऊ, तिथे पांडव राहिले होते.'

मोठी मामी, 'तू खरंच एकट्याने प्रवास करू शकशील का?'

मी एकट्याने नाशिकहून ठाण्याला जाणं, ते सुद्धा फक्त क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी, ते सुद्धा सातव्या इयत्तेत असताना, हे म्हणजे या सर्व मंडळींना न पचण्यासारखं होतं. अण्णांना मात्र माझ्यावर नेहमी विश्वास असायचा आणि मोठ्यांना त्यांच्याबद्दल आदर, आणि म्हणूनच अण्णांनी मला परवानगी दिल्यावर कोणी काहीही बोललं नाही.

Night WalkOpowieści tętniące życiem. Odkryj je teraz