"श्रेयस, या वर्षी देखील बेस्ट परफॉर्मन्सचा पुरस्कार तुम्हालाच मिळणार आहे. मला पूर्ण खात्री आहे." दीपिका म्हणते.
"हो. मला देखील पूर्ण खात्री आहे. चल आता आपल्याला निघायला हवं. पुरस्कार सोहळा दोन तासांत सुरु होईल." श्रेयस म्हणतो.
"हो बाबा. आधी देवाच्या पाया पडा. देवाला सांगा, या वर्षीचा पुरस्कार देखील मलाच मिळू दे." दीपिका म्हणते.
"पाया पडतो. पण पुरस्कार कुणाला मिळेल हे आधीच ठरलं आहे. आज फक्त तो जाहीर होणार आहे." श्रेयस गंमतीने म्हणतो.
"बघा हा, देवाच्या बाबतीत मस्करी नको." दीपिका जरा खेकसतच म्हणते.
"बरं बाबा. देवा, या वर्षीचा पुरस्कार मलाच मिळू दे." श्रेयस म्हणतो आणि दीपिका त्याच्याकडे बघून स्मितहास्य करते.
"श्रेयस? दीपिका? चला लवकर. आपल्याला उशीर होतोय." श्रेयसची आई बाहेरून आवाज देते. दोघे देवाच्या पाया पडून बाहेर येतात.
"नमस्कार करते आई, यांना पुरस्कार मिळावा म्हणून देवाला प्रार्थना करत होतो." आईच्या पाया पडत दीपिका म्हणते.
"हे बरं केलंस. आता बघ, या वर्षीचा पुरस्कार देखील श्रेयसलाच मिळेल. तू घरात आल्यापासून सगळं किती चांगलं होतंय बघ..." आई म्हणते.
"चला... चला... उशीर होतोय तुम्ही दोघी गाडीमध्ये बसून बोला. बाहेर गाडी उभी आहे, चला लवकर. मी बाबांच्या फोटोच्या पाया पडून येतो." श्रेयस देवघरातून बाहेर निघत म्हणतो.
तिघेही वेळेवर हॉलवर पोहोचतात. श्रेयस काम करत असलेल्या कंपनीमध्ये दरवर्षी पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. कंपनीच्या २६ ब्रांचेस मधून उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येकाला पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. सलग ४ वर्षे हा पुरस्कार श्रेयासला मिळत होता. या वर्षी देखील हा पुरस्कार त्यालाच मिळेल याची अनेकांना खात्री होती.
मनमिळाऊ स्वभाव, मेहनत, काम करत तत्परता दाखवणे, सर्व ब्रांचेस एकमेकांना जोडणे, काम सोपे करणे, कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण ठेवणे, त्यांना सतत प्रोत्साहित करणे आणि कंपनीचा टर्नओव्हर वाढता ठेवणे, या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण कंपनी श्रेयासचा आदर करत होती.
ESTÁS LEYENDO
Night Walk
Historia Cortaआपण वाचत असलेला हा लेखसंग्रह ठरवून लिहिला गेला नाहीये, किंवा या लेखसंग्रहातील लेख देखील एक ठराविक विषय घेऊन लिहिलेले नाहीत. हा लेखसंग्रह म्हणजे माझ्या लहानपणापासून मी लिहिलेले काही निवडक लेख, कथा आहेत. हा लघुकथा संग्रह ३० ते ४० कथांचा सहज करता आला अ...